Kolhapur News: अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरामध्ये ड्रेसकोड, देवस्थान समितीचं भाविकांना आवाहन

Ambabai Temple and Jyotiba Temple : भाविकांमधून सुद्धा हा ड्रेसकोड नियम लागू होणं गरजेचं होतं अशा प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरामध्ये ड्रेसकोडचं आवाहन करण्यात आलेला आहे. धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे परिधान करणं टाळावं, असं आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या अनेक वर्षांपासून या ड्रेसकोडबाबत चर्चा होती. आता देवस्थान समितीने याबाबतचे परिपत्रक काढलं असून या ड्रेस कोडचा नियम पाळावा, अशी विनंती देवस्थान समितीकडून करण्यात येत आहे. 

भाविकांमधून सुद्धा हा ड्रेसकोड नियम लागू होणं गरजेचं होतं अशा प्रतिक्रिया येत आहेत. तसेच आपली संस्कृती टिकावी यासाठी असे नियम होणे गरजेचे आहे, अशा देखील प्रतिक्रिया भाविकांमधून आहेत.

(नक्की वाचा-  Viral News : 'दमलेल्या बाबाची कहाणी'; उन्हातान्हात चिमुकलीला सोबत घेऊन फूड डिलिव्हरी)

देवस्थान समितीच्या परिपत्रकात काय म्हटलं?

करवीर निवासिनी महालक्ष्मी/अंबाबाई देवस्थान कोल्हापूरकडे तसेच केदारलिंग (जोतिबा) देवस्थान वाडी रत्नागिरी, पन्हाळा येथे काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करुन मंदिरामध्ये प्रवेश करतात. काही मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांसाठी ड्रेसकोड करण्यात आलेला आहे. करवीर निवासिनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असून, या मंदिराचे महत्व फार आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Shirdi News: दुबईतून शिर्डीत आले 'गोल्डन ॐ साई', साईभक्ताकडून भरभरुन दान, किंमत किती?)

तरी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता, पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावे. मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करुन व त्याचे पालन करुन पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावे. असे देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने नम्र अहवान करण्यात येत आहे. सदर सूचनाचे पालन करुन देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करावे ही विनंती.

Topics mentioned in this article