
Viral Swiggy Delivery Person : झोमॅटो, स्विगीच्या अनेक डिलिव्हरी बॉयना मेहनत करताना तुम्ही पाहिले असेल. काही लोक सायकलवरून डिलिव्हरी करतात, तर काही लोक पायी डिलिव्हरी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, एका डिलिव्हरी बॉयचा फोटो समोर आला आहे. जो त्याच्या 2 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन डिलिव्हरीला जातो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीईओ मयंक अग्रवाल यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट पोस्ट केली ज्यामध्ये त्याने स्विगी डिलिव्हरी बॉय पंकज आणि त्याची लहान मुलगी टुन टुनची इमोशन स्टोरी शेअर केली आहे. मयंक यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, स्विगीकडून जेवण ऑर्डर केले तेव्हा पंकज नावाचा डिलिव्हरी पार्टनर ते घेऊ जेव्हा तो ऑर्डर घेण्यासाठी त्याच्या इमारतीतून खाली आला तेव्हा त्याला दिसले की डिलिव्हरी बॉयसोबत बाईकवर एक गोंडस छोटी मुलगी बसली होती.
जेव्हा मयंक पंकजशी बोलले तेव्हा कळाले यांच्या 2 वर्षांच्या मुलीला डिलिव्हरीच्या वेळी सोबत घेऊन यावं लागतं. कारण घरी तिची काळजी घेण्यासाठी कुणीही नसते. तिच्या आईचे बाळंतपणाच्या वेळी निधन झाले आणि तिचा मोठा भाऊ अभ्यासासाठी संध्याकाळच्या वर्गात जातो.
(नक्की वाचा - Road Accident : बहुतांश बाईकस्वार हा नियम मोडतात, एक चूक अन् मीरज-कोल्हापूर रस्त्यावर तरुणाचा मृत्यू)
मयंक अग्रवाल यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी पंकजची परिस्थिती समजूत घेण्याची विनंती केली. पंकजचा निर्णय हा पर्याय नव्हता तर जबाबदारी होती. मुलाच्या सुरक्षिततेबद्दल कोणीही चिंता व्यक्त करण्यापूर्वी, कृपया समजून घ्या की तो असे का करत आहे. कारण त्याच्याकडे कोणताही पर्याय नाही. मला आशा आहे की स्विगीमधील कोणीतरी हे वाचेल आणि त्याला पाठिंबा देण्याचा मार्ग शोधेल", असं मयंक यांनी लिहिले.
(नक्की वाचा- आता काश्मीरबाबत नाही तर पाकव्याप्त काश्मीरबद्दल चर्चा करू! PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे)
मयंक अग्रवाल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाली. लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने लिहिले की, 'आपल्या समाजाने अशा कष्टाळू लोकांना कधीच योग्य आदर दिला नाही. हे आमच्यातील सर्वोत्तम आहे. आणखी एकाने लिहिले की, 'अडचणीत रडण्याऐवजी, त्याने परिस्थितीशी लढणे अधिक महत्त्वाचे मानले.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world