जाहिरात

वंदे भारत एक्सप्रेसला आता कोल्हापूरात थांबा, पुणे- कोल्हापूर प्रवास होणार सुसाट

मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अद्याप दुहेरीकरण झाले नाही. त्यामुळे वंदे भारतसह नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे.

वंदे भारत एक्सप्रेसला आता कोल्हापूरात थांबा, पुणे- कोल्हापूर प्रवास होणार सुसाट
कोल्हापूर:

कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची सेवा कोल्हापूरकरांना मिळणार आहे. हुबळीहुन मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत रेल्वे आता कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीये. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 15 सप्टेंबर पासून ही सेवा सुरु होईल. मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अद्याप दुहेरीकरण झाले नाही. त्यामुळे वंदे भारतसह नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे. पण हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर मार्गे जाणार, ही आश्वासक सुरुवात असल्याचं महाडिक यांनी सांगितलं. लवकरच कोल्हापूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची आशा आहे, अशी माहिती ही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केंद्रातील मोदी सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडं लक्ष दिलं आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस, अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाली आहे. वेगवान आणि आरामदायी अशी वंदे भारत एक्सप्रेस सध्या प्रवाशांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाली आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. खासदार धनंजय महाडिक सातत्यानं कोल्हापूर मधून वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. 

ट्रेंडिंग बातमी - पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल

त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आलं आहे. वंदे भारत ट्रेन आठवड्यातून तीन दिवस हुबळी ते पुणे या मार्गावर धावते. ही ट्रेन हुबळीहून मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर पर्यंत यावी अशी त्यांनी मागणी केली होती. त्यासाठी ते सतत पाठपुरावा करत होते. त्यामुळेच आता त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. आता हुबळी ते पुणे मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन कोल्हापूरातून पुढे जाईल. ही ट्रेन आल्याने कोल्हापूर ते पुणे हा प्रवास सुसाट होईल. कोल्हापूरातून पुण्यात पाच तासात पोहोचता येणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लिव्ह इनमधल्या प्रेयसीला मारलं, रिक्षात टाकलं, आईच्या घरासमोर सोडलं, पुढे काय झालं?

ही ट्रेन प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे. या काळात कोल्हापुरातून कसा प्रतिसाद मिळतो ते पाहीले जाईल. जर चांगला प्रतिसाद असेल तर ही ट्रेन कायमस्वरूपी राहाणार आहे. मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अजुन दुहेरीकरण झालेले नाही. त्यामुळे नव्या गाड्या सुरू करण्यात अडचण येत आहे. दरम्यान ही वंदे भारत ट्रेन सकाळी सव्वा दहा वाजता कोल्हापूरात येईल. तर साडे दहाला पुण्याच्या दिशेने रवाना होईल. तर पुण्यातून संध्याकाळी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस, पाच तासात कोल्हापूरला पोहोचणार आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
वंदे भारत एक्सप्रेसला आता कोल्हापूरात थांबा, पुणे- कोल्हापूर प्रवास होणार सुसाट
supreme-court-stays-ngt-order-dhol-tasha-troupes-ganpati-visarjan-pune
Next Article
पुणेकरांनो, वाजवा रे वाजवा..गणेशभक्तांसाठी सुप्रीम कोर्टानं रद्द केला बंदीचा 'तो' आदेश