कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाकडून करण्यात आलंय हे आवाहन

Advertisement
Read Time: 2 mins

- राकेश गुडेकर, रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी आजपासून पावसाळी वेळापत्रक लागू होत आहे. हे वेळापत्रक 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे, त्यामुळे गाड्यांचा वेगही मंदावणार आहे. दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असलेल्या भागातून गाड्यांच्या वेगावर नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेकडून दरवर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते. या बदलामुळे प्रवाशांनी आपण प्रवास करत असलेल्या गाडीची वेळ प्रवासापूर्वी तपासून घ्यावी, असs आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

(नक्की वाचा: Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 जूनपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट)

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, मार्गावर चिखल माती येणे, पावसाचे पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा बदलाव्या लागतात तर काही गाड्यांच्या फेऱ्या बदलाव्या लागतात.

(नक्की वाचा: Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी आज होणार खुला)

या कारणामुळेच कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर वेळी वंदे भारत एक्सप्रेस सहा दिवस तर तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालवण्यात येणार आहे. कोकण कन्या, तुतारी, वंदे भारत, जन शताब्दी, तेजस, मांडवी अशा गाड्या नव्या वेळापत्रकानुसार अर्धातास ते एक तास लवकर धावणार आहेत.

(नक्की वाचा: कामावरुन निघाली, दादरहून लोकल पकडली, झोप लागली अन् डोळे उघडताच धक्का बसला!)

IMD Rain Forecast | मान्सून मुंबईत दाखल, पुढील 3-4 दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Topics mentioned in this article