जाहिरात
Story ProgressBack

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला  

मुंबई कोस्टल रोडचा (Dharmaveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj) दुसरा बोगदा 10 जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Read Time: 3 mins
Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला  

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा (Dharmaveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj) दुसरा बोगदा 10 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध मान्यवरांच्या पाहणीनंतर खुला झाला आहे. दर आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस मार्ग राहणार सुरू तर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे मार्ग राहणार बंद राहील. मरीन ड्राइव्हपासून उत्तरेला भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक (लोटस जेट्टी) आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) या तीन मार्गांपर्यंत प्रवास करणे आता शक्य होईल. तसेच किनारी रस्ता प्रकल्प मार्गे उत्तरेकडे प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे याकरिता बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा टप्पा देखील 10 जुलै 2024 पासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे 

(नक्की वाचा: कामावरुन निघाली, दादरहून लोकल पकडली, झोप लागली अन् डोळे उघडताच धक्का बसला!)

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) (Mumbai Coastal Road) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे देखील वेगाने पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवार (10 जून 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर लगेचच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

यानंतर मंगळवारी (11 जून 2024) सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 16 तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी नियमितपणे खुला करण्यात येणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहील. तर शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यास सोयीचे व्हावे, यासाठी हा मार्ग बंद राहील.

(नक्की वाचा: धक्कादादायक! IAS ऑफिसरच्या मुलीनं 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं आयुष्य)

वाहतुकीचा भार कमी व्हावा, मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सुखकर व्हावा, या हेतूने टप्प्या-टप्प्याने मार्ग खुले करण्यात येत आहेत.  यापूर्वी 11 मार्च रोजी वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. या सुरू करण्यात आलेल्या वाहतूक मार्गाचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

(नक्की वाचा: जबरदस्त षट्कार ठोकला अन् जमिनीवर कोसळला, परत उठलाच नाही; अंगावर काटा आणणारा Video)

आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे 6.25 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील बोगद्याचा वापर करता येणार आहे. या बोगद्यांवरून उतरून किंवा प्रवेश करून वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.

 मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची ठळक  

  • रस्त्याची लांबी- 10.58 किलोमीटर
  • मार्गिका- 8 (4+4) (बोगद्यांमध्ये 3+3)
  • आंतरमार्गिका- 3, आंतरमार्गिकांची एकूण लांबी- 15.66 किलोमीटर
  • भराव टाकून बनवलेला रस्ता– 4.35 किलोमीटर
  • पुलांची एकूण लांबी– 2.19 किलोमीटर
  • बोगदा– दुहेरी- प्रत्येकी 2.07 किलोमीटर 
  • भूमिगत वाहनतळ- 4, एकूण वाहन क्षमता– 1, 856 
  • एकूण भरावक्षेत्र– 111 हेक्टर
  • खुली/हरित जागा: 70हेक्टर
  • सागरी संरक्षण भिंती/पदपथ– 7.47 किलोमीटर
  • विहार क्षेत्र (प्रोमीनेड) – 7.50 किलोमीटर
  • प्रकल्पाचा खर्च-  अंदाजित रुपये 13, 983 कोटी, बांधकाम खर्च रुपये 8, 429 कोटी
  • कामाची सुरुवात:  13 ऑक्टोबर 2018 
  • पूर्णत्वाचे नियोजन: ऑक्टोबर 2024

बोगद्याची वैशिष्ट्ये 

  • मावळा या बोगदा खणणाऱ्या यंत्राच्या (TBM) सहाय्याने, भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास 12.19 मी.) (अंतर्गत व्यास 11 मीटर)
  • दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे जुळा बोगदा.
  • भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायूविजन प्रणाली.

प्रकल्पाचे फायदे 

  • अंदाजे 70 टक्के वेळेची बचत, 34 टक्के इंधन बचत.
  • ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत
  • बसेससाठी स्वतंत्र मार्गिका
  • भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी
  •  एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.

IMD Rain Forecast | मान्सून मुंबईत दाखल, पुढील 3-4 दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Live Update : विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांचं आंदोलन
Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला  
raj thackeray birthday tejaswini pandit writes instagram post to wish him on his birthday
Next Article
मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! तेजस्विनी पंडितची इन्स्टा पोस्ट चर्चेत
;