जाहिरात

Ro Ro service : कोकणवासियांसाठी चांगली बातमी; रो-रो सेवेत आणखी 3 स्थानकांवर थांबे

कोकण रेल्वेवरील रो-रो प्रकल्पाअंतर्गत आणखी तीन स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

Ro Ro service : कोकणवासियांसाठी चांगली बातमी; रो-रो सेवेत आणखी 3 स्थानकांवर थांबे

Konkan Ro Ro service at 3 more stations : कोकणवासियांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेवरील रो-रो प्रकल्पाअंतर्गत आणखी तीन स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही मुख्य स्थानकं असल्याने कोकणवासियांना याचा लाभ घेता येणार आहे. 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने विशेष कार ऑन रोड ही योजना सुरू केली होती. मात्र या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणीची अंतिम मुदत वाढवूनही पहिली सेवा 23 ऑगस्ट रोजी कोलड, नांदगाव रोड आणि वेर्णा येथून फक्त सात प्रवाशांसह निघाली. परिणामी कोकण रेल्वेने यामध्ये आणखी तीन स्थानकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मराठी माणसाचा ऐकलं असतं तर सत्तरच्या दशकातच सुरू झाली असती अंडरग्राउंड मेट्रो, तपशील वाचून ठोकाल सॅल्यूट

नक्की वाचा - मराठी माणसाचा ऐकलं असतं तर सत्तरच्या दशकातच सुरू झाली असती अंडरग्राउंड मेट्रो, तपशील वाचून ठोकाल सॅल्यूट

15 ऑक्टोबरसाठी कोकण रेल्वेने 35 वा स्थापना दिन साजरा केला. यावेळी त्यांनी रो-रो सेवेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. यापुढे सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे नव्याने थांबे करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने रो-रो सेवा सुधारण्यासाठी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर ही तिन्ही महत्त्वाची स्थानके जोडण्याची योजना आखली असून या विस्तारासाठी साधारण 7,700 कोटींची आवश्यकता असल्याची माहिती आहे. 

रो-रो ट्रेनमध्ये 10 डब्यांचे वॅगन आणि दोन प्रवासी कोच आहेत. यामध्ये एक वातानुकूलित कोच आहे. कोलाड-वेर्णा मार्गासाठी एका कारच्या वाहतुकीचा खर्च 7,875 आणि कोलाड-नांदगाव मार्गासाठी 5,460 आहे.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com