Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या, पाहा नवीन वेळापत्रक

मुंबई CSMT-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा आता आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार असून, या ट्रेनमध्ये आता 16 डबे जोडले जाणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी

Vande Bharat Train : कोकणात प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, कोचची संख्या वाढवण्यासोबतच तिच्या फेऱ्यांची संख्याही वाढवली जात आहे.

मुंबई CSMT-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा आता आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार असून, या ट्रेनमध्ये आता 16 डबे जोडले जाणार आहेत.

(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

कोकणात सध्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावत होती. आता, 22 ऑक्टोबरपासून या वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवा वाढवण्यात येत आहेत. ही ट्रेन आता शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस चालवली जाईल. वंदे भारत ट्रेन सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे.

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीचा हाहाकार! 24 तासांत 60 हून अधिक ठिकाणी लागली आग)

सुधारित वेळापत्रक

ट्रेन क्रमांक 22229 (मुंबई CSMT ते मडगाव, गोवा)

  • मुंबई CSMT वरून सकाळी 5:25 वाजता सुटेल
  • मडगाव गोवा स्टेशनवर दुपारी 1:10 वाजता पोहचेल

ट्रेन संख्या 22230 (मडगाव, गोवा ते मुंबई CSMT)

  • मडगाव स्टेशनवरून दुपारी 2:40 वाजता सुटेल.
  • मुंबई CSMT येथे रात्री 10:30 वाजता पोहचेल.

Topics mentioned in this article