कोरियाचे उपकरण बुलढाण्यात पडलं, बघ्यांची गर्दी अन् गावकऱ्यांची तारांबळ; अखेर...

कोरियातील उपकरण कोसळल्याची चर्चा संपूर्ण गावात झाली ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर... 

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी: बुलढाणा जिल्ह्यातील एका गावामध्ये आकाशातून मोठ्या फुग्यासोबत एक रहस्यमय उपकरण आकाशातून खाली पडले. या उपकरणावर कोरियन भाषेतील मजकूर लिहल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरियातील उपकरण कोसळल्याची चर्चा संपूर्ण गावात झाली ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर... 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील  मौजे अंतरी खेडेकर (तालुका चिखली जिल्हा बुलढाणा) येथे सकाळी ग्रामस्थांना रहस्यमय उपकरण सापडले असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे उपकरण एका मोठ्या फुग्याला जोडलेले होते तसेच त्यावर कोरियन भाषेतला मजकूरही लिहल्याचे आढळून आले.

नक्की वाचा: महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला! कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे; मोठी अपडेट समोर

स्थानिक ग्रामस्थांनी त्या मजकुराचे गूगल भाषांतर केले असता हे हवामान उपकरण असून ते कोरियन हवामान खात्याकडून वापरण्यात येते असा मजकूर आला आहे. मात्र, कोरियातील बलून बुलढाण्यात कसे पडले? आणि तसे होणे कसं शक्य आहे? अशी चर्चा यावेळी रंगल्याचे पाहायला मिळाले. हे उपकरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

 सदरीस उपकरण आकाशातून पडलेले असून  हवामान खाते यांच्याकडून  सोडण्यात आलेले आहे का? याबाबत विचारणा केली असता महत्वाचा खुलासा झाला. ते उपकरण कोरियन असून सध्या भारतीय हवामान खात्याकडून वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ज्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

एकीकडे ढगाळ वातावरण, पाऊस पडण्याचा अंदाज अशातच पावसाऐवजी ही भलतीच वस्तू पडल्याने गावकरी चांगलीच भयभीतही झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, हे उपकरण भारतीय हवामान खात्याचेच असून याआधीही अनेक ठिकाणी अशा प्रकार ते उपकरण कोसळल्याचा प्रकार घडला होता. 

Advertisement

महत्वाची बातमी: जयंत पाटलांना डावललं? जितेंद्र आव्हाडांसह नवख्या रोहित पाटलांना ताकद; शरद पवारांनी काय साधलं?

Topics mentioned in this article