महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.4 कोटींहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात यापुढे महिलांना पुढील हफ्ता मिळणार नाही. कारण लाडकी बहीण योजना अस्थायी रुपात निलंबित करण्यात आली आहे. काय आहे त्यामागील कारण?
निवडणूक आयोगांनी दिले आदेश...
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचार संहिता लागू असताना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजनांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
नक्की वाचा - मर्दांचा पक्ष असाल तर आव्हान स्वीकारा! आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार?
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला आणि बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी आवश्यक निधी रोखण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र महिलांना निवडणुकीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकणार नाही. यादरम्यान राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र पाठवले होते. त्यामुळे आता डिसेंबरचा हफ्ता येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
योजना का रोखली?
मतदारांना सरळसरळ आर्थिक निधी पुरवल्या जाणाऱ्या किंवा त्यांना प्रभावित करणाऱ्या योजना तत्काळ बंद करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक पदाधिकारी कार्यालयाने सर्व प्रशासकीय विभागांना जारी केलं आहे. सोबतच आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांची समीक्षा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कालिंगमने सर्व विभागांकडे याबाबत विचारणा केली. महिला आणि बाल कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी मोठी रक्कम देत आहे. राज्यात आचार संहिता लागू केल्यानंतर निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजना अस्थायीपणे निलंबित करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world