'लाडक्या बहिणी'चा रात्रभर बँके बाहेर मुक्काम, नंदुरबारमध्ये काय घडलं?

आदिवासी जिल्ह्यात तर भयंकर स्थिती असल्याचे दिसून येत आहे. या भागात बँकांची संख्या कमी आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नंदूरबार:

सध्या सगळीकडे लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिलांची गर्दी होत आहे. मात्र या योजनेसाठी ई केवायसी करावी लागत आहे. या प्रक्रीयेत अनेक ठिकाणी अडचणी आल्याचे समोर आले आहे. महिलांनी त्यासाठी बँका बाहेर गर्दी केल्याचे या आधीही दिसत आहे. आदिवासी जिल्ह्यात तर भयंकर स्थिती असल्याचे दिसून येत आहे. या भागात बँकांची संख्या कमी आहे. त्यात तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर एका फेरीत काम होत नाही. अशा वेळी महिलांना बँक बाहेरच मुक्काम करण्याची वेळ आल्याचे चित्रही समोर आले आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकारने मोठा गाजावाजा करत महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी आहे. तालुक्याचा ठिकाणी असलेल्या बँकामध्ये लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने चकरा माराव्या लागत आहे. पण एका फेरीत काम होत नाही. त्यात दररोज येण्या-जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नाही. अशा वेळी घरून भाकरी बाधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुकामी थांबत आहे. याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे .

ट्रेंडिंग बातमी -  भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत  ई केवायसी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलानी बँकेची खाते उघडली आहेत. मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहे.  मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठ्या असल्याने अनेकांना रिकाम्या हातानी परत जावे लागत आहे. दररोज येऊन परत जाणे हे आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांचा नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुकामी राहण्याचा पर्याय निवडलेला आहे. त्याचे विदारक चित्र नंदूरबारमध्ये दिसून आले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?

सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी. गावपातळीवर उपाय योजना करणे अपेक्षित आसताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना करणे गरजेचे आहे. सध्या या महिलांना रात्रीचा मुक्काम बँकेच्या गेट बाहेर करावा लागत आहे. गावातील महिला एकत्रीत येवून रात्रभर बँकेबाहेर झोपत आहेत. सकाळी लवकर उठून त्या केवायसीसाठी रांगेत उभे राहात आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि बँकेच्या वेळा यामुळे ही वेळ आली आहे. शिवाय वारंवार तालुक्याच्या ठिकाणी येणे ही त्यांना परवडत नाही. शेवटी बँके बाहेर मुक्काम करणेच या लाडक्या बहीणींनी पसंत केले आहे.