राहुल तपासे, सातारा
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. "माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन," अशी तक्रार त्यांनी यापूर्वी आपल्या वरिष्ठांकडे केली होती. अखेर काल रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
(नक्की वाचा- Pune News: NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन आठवड्यात दुसरी घटना, खळबळ)
डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण होते, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र, पोलीस आणि आरोग्य विभागातील वाद, तसेच त्यांच्यावर सुरू असलेली चौकशी यामुळे त्या मानसिक तणावाखाली असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एका कर्तव्यदक्ष डॉक्टराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा समोर आला आहे. कामाचा ताण, प्रशासकीय अडचणी आणि विविध प्रकारच्या दबावामुळे आरोग्य कर्मचारी अनेकदा मोठ्या तणावाखाली काम करत असतात. प्रशासनाने अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वैद्यकीय संघटनांकडून केली जात आहे.