14 hours ago

Maharashtra News : शनिवारी 6 सप्टेंबर, अनंत चतुर्दशीपासून मुंबईत सुरू झालेली विसर्जनाची मिरवणूक रविवारी, 7 सप्टेंबरला रात्री 9 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाने संपली. यंदा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकही बरेच तास लांबली. यावरुन पुणे पोलीस प्रशासनावर तारेशे ओढले जात आहेत. दोन दिवस पुण्याच्या रस्त्यांवर डीजेचा दणदणाट सुरू होता. यामुळे ढोल-ताशाच्या पारंपरिक मंडळाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सोशल मीडियावरुन केला जात आहे. दुसरीकडे (lalbaugcha raja visarjan) लालबाग राजाचं विसर्जन वगळता मुंबईतील विसर्जन सुरळीत पार पडलं. यानिमित्ताने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गणेशोत्सवातील सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांचे मानले आभार मानले. '12 ते 16 तास सलग ड्युटी बजावणं, उन्हात वा पावसात तासनतास उभं राहणं, गर्दी व वाहतुकीचे नियोजन करणे, लोकांच्या भावना समजून घेऊन संयमाने संवाद साधणे, अशा कठीण परिस्थितीतही पोलिसांच्या चेहऱ्यावर जाणवणारा कर्तव्यभाव खरंच कौतुकास्पद आहे,' असे मंत्री कदम म्हणाले

Sep 08, 2025 15:52 (IST)

LIVE Update: आयुष कोमकरच्या अंत्यविधीला कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून त्यांचा मारेकरी गणेश कोमकर याच्या मुलगा आयुष कोमकर (१८) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 

या घटनेनंतर पुण्यात पुन्हा टोळी युद्ध पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. आयुषच्या आईच्या फिर्यादीवरून आंदेकर टोळीतील बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल झाले असून यश पाटील व अमित पाटोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयत आयुषच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर कारागृहातून पॅरोलवर आणण्यात येणार आहे. अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी येथे पार पडणार असून या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Sep 08, 2025 15:46 (IST)

Nepal Protest LIVE Update: नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण, गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी विरोधात जमाव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आहे. या जमावाला पांगवण्यासाठी झालेल्या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Sep 08, 2025 13:54 (IST)

LIVE Updates: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी पाठिंबा द्या, काँग्रेसची उद्धव ठाकरेंकडे मागणी

विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, काँग्रेसची उद्धव ठाकरेंकडे मागणी 

यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि उपनेते अमीन पटेल हे आज मातोश्रीवे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत 

अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता काँग्रेसमधून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब

Sep 08, 2025 13:10 (IST)

LIVE Update: शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक

शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक 

एनडीए तील घटक पक्षांच्या खासकारांची भाजप बैठक घेत आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं जाईल.

अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली बैठक 

खासदार आणि लोकसभा गटनेते  शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू 

या बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित

Advertisement
Sep 08, 2025 12:40 (IST)

Nagpur News: नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरात 130 वर्ष जुनी भिंत कोसळली

नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरात 130 वर्ष जुनी भिंत रविवारी रात्री कोसळल्याने काही वाहनांचे नुकसान झाले आहे.  मात्र, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने एक मोठी दुर्घटना टळली. जवळच्या मारवाडी चाळवर ही एम्प्रेस मिलची भिंत कोसळली. यात चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले. 

सुदैवाने, भिंत कोसळण्याच्या वेळी तेथून जाणारा एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली. भिंत कोसळण्याची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

Sep 08, 2025 11:14 (IST)

Live Update : रत्नागिरीतील मिरकवाडा येथे मच्छिमार करणारी बोट मध्यरात्री बुडाली

मिरकवाडा येथे मच्छिमारी करणारी बोट मध्यरात्री बुडाली

 मिरकरवाडा येथे ब्रेक वॉटरच्या आतमध्ये बोटीला अपघात 

बोटीतील सहा जण बुडाले; 4 जणांना वाचवले तर 2 जण अद्याप बेपत्ता

 मोठ्या लाटेचा तडाका बसल्यामुळे बोटीला अपघात

अमीना आयशा असं बोटीचं नाव

Advertisement
Sep 08, 2025 11:10 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज

मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज

डिस्चार्जनंतर अंतरवाली सराटीत जाऊन घेणार दर्शन

त्यानंतर नारायणगड येथे जाऊन करणार दर्शन

त्यानंतर दोन वर्षाच्या आंदोलनानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच घरी जाणार

Sep 08, 2025 11:06 (IST)

Dharashiv LIVE Update News: नृसिंह शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात मद्यपीचा धुडगूस

 धाराशिवच्या तेरखेडा येथील नृसिंह शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात मद्यपीने गोंधळ घातलाय. हा संपूर्ण गोंधळ जवळील एका सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जवळपास दोन तास हा गोंधळ सुरू होता. दरम्यान या  मद्यपिविरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये आरोपीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Advertisement
Sep 08, 2025 11:06 (IST)

LIVE Update: मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज

मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज 

डिस्चार्जनंतर अंतरवाली सराटीत जाऊन घेणार दर्शन 

त्यानंतर नारायणगड येथे जाऊन करणार दर्शन 

त्यानंतर दोन वर्षाच्या आंदोलनानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच घरी जाणार

Sep 08, 2025 10:21 (IST)

Live Update : अमरावती शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी संरक्षणासाठी आणले चक्क बाउन्सर....

अमरावती शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी संरक्षणासाठी आणले चक्क बाउन्सर....

-दहा बाऊन्सरच्या उपस्थितीत शिक्षक बँकेची वादळी सभा....

-देशाचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या सभेत बाऊन्सर आणल्यामुळे शिक्षक बँकेची सभा वादात...

-सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बाऊन्सरचा उपयोग, संचालक प्रभाकर झोड यांचा आरोप...

-बाऊन्सरच्या उपस्थितीत शिक्षक बँकेची सभा घेण्यात आल्याचा व्हिडिओ आला समोर....

Sep 08, 2025 10:05 (IST)

Live Update : 17 सप्टेंबरपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा - मनोज जरांगे पाटील

17 सप्टेंबरपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा - मनोज जरांगे पाटील

Sep 08, 2025 09:25 (IST)

Live Update : टेकडातल्ला येथील पाण्याच्या टाक्या बनल्या शोभेच्या वस्तू...

तालुक्यातील जाफराबाद  ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकडातल्ला येथील पाणीपुरवठा योजना अंतर्गत पाण्याची टाकी व घरोघरी नळ बसवण्यात आले पण या नळांना आजपर्यंत पाणी आलेच नाही परिणामी गावाला दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते .  याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. गावातील महिलांना  विहिरीतून काडलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत आणावे लागत आहे. या अतिदुर्गम आदिवासी भागात शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती आहे.

Sep 08, 2025 09:24 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड पाटी येथे भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात 

गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड पाटी येथे भीषण अपघात 

अपघातात तीन जण जागीच ठार 

स्कार्पिओ आणि दुचाकीचा झाला अपघात

सजन राजपूतसह दोघांचा मृत्यू

Sep 08, 2025 08:17 (IST)

Live Update : गडचिरोलीतील जहाल माओवाद्याला हैदराबादमधून अटक

गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत, खून आणि चकमकीच्या अनेक घटनांमध्ये सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्याला हैदराबाद (तेलंगणा) येथून अटक केली आहे. हा माओवादी गेल्या सहा वर्षांपासून गडचिरोली डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अटक करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय २५, रा. बांदेपारा, जि. बिजापूर, छ.ग.) आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Sep 08, 2025 08:15 (IST)

Live Update : जळगावात आंबेमोहोर 140 रुपये किलोवर, बासमती 70 ते 80 रुपये किलोवर

जळगाव बाजारपेठेत तांदुळाचे दर वधारले असून आवक कमी व मागणी जास्त असल्याने तांदुळाच्या भावात वाढ झाली आहे. आंबेमोहोर तांदुळाचे भाव तब्बल 140 रुपये किलोवर गेले असून बासमती तांदुळाचे भाव 70 ते 80 रुपये किलो झाले आहे. तर कालीमुछ , सुगंधी चिनोर, वाडा कोलम , इंद्रायणी तांदुळाचे भाव 50 ते 75 रुपयांच्या घरात गेले असून गतवर्षी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात सरासरीपेक्षा तांदुळाचे उत्पन्न कमी झाल्याने परिणामी तांदळाची आवक घटली आहे. डिसेंबरच्या शेवटी नवीन तांदूळ बाजारात येईपर्यंत तांदुळाचे भाव वाढलेलेच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

Sep 08, 2025 08:14 (IST)

Live Update : जळगाव शहरातील नारायणी पार्क परिसरात भरदिवसा घरफोडी

जळगाव शहरातील नारायणी पार्क परिसरात असलेल्या श्री अपार्टमेंटमध्ये बंद घराची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असून चोरी करणारे दोन चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाले आहे. भर दिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Sep 08, 2025 08:13 (IST)

Live Update : भरधाव कारची ई-रिक्षाला धडक; 9 महिला मजूर जखमी, साकोली जवळील महामार्गावरील घटना

शेतात निंदणाचे काम आटोपून निघालेल्या महिला मजुरांच्या ई-रिक्षाला भरधाव कारने धडक दिली. त्यात ९ महिला मजुर जखमी झाले. सदर अपघात काल सायंकाळी साकोली जवळ महामार्गावर घडला.

 मोहघाटा येथील महिला मजुर हे साकोली शेतशिवारात पोद्दार शाळेजवळ एका शेतात निंदणाच्या कामाला आले होते. दिवसभर काम आटोपून सायंकाळी गावाकडे ई-रिक्षाने  निघाल्या. त्यावेळी नागपुरकडे जाणारी  कारने ई-रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षामधील चालकासह ९ महिला मजुर जखमी झाले. अपघात घडताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना भंडाऱ्याला हलविण्यात आले आहेत.

Sep 08, 2025 08:12 (IST)

Live Update : गर्भाशयातील तीन किलोची फायब्रॉईड गाठ काढण्यात वालावलकर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांना यश

रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका महिलेच्या गर्भाशयातील तीन किलोची फायब्रॉईड गाठ काढण्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांना यश आलं आहे. या महिलेला वर्षभरापासून  मासिकपाळीचा त्रास, पोटदुखीचा त्रास होता. वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणी झाली आणि त्यात ही गाठ गर्भाशयातील फायब्रोइड असल्याचं निष्पन्न झालं. लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण गर्भाशय, दोन्ही अंडाशय आणि नलिका काढण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया स्त्री रोगतज्ञ डॉ.रक्षा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वैष्णवी गोरे आणि डॉ. निहारिका राऊळ यांच्या सहाय्याने पार पडली. शस्त्रक्रिया दीड तास चालली आणि त्यांच्या पोटातून आठ महिन्यांच्या गर्भासारखी दिसणारी तब्बल ३.७७५ किलोची ३० X  ३० सेंटिमीटर मोठी गाठ काढण्यात डॉक्टरना यश आलं. आता महिलेची तब्बेत सुधारत असून पोटदुखी आणि मासिक पाळीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे.

Sep 08, 2025 08:11 (IST)

Live Update : हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला डॉल्फिन

दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला. गंभीर जखमी अवस्थेतील डॉल्फिनला वाचविण्यासाठी मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले.

हर्णेतील स्थानिक मच्छीमारांना मृतावस्थेत हा डॉल्फिन दिसला. हा डॉल्फिन गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी मच्छीमारांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविता आले नाही. या घटनेची माहिती परिसरात पसरताच डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर लोकांनी गर्दी केली होती.  या घटनेची माहिती मिळताच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी काही नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हर्णे समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वीही डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने समुद्री जीवांचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.

Sep 08, 2025 06:50 (IST)

Live Update : एकनाथ शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

एकनाथ शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का 

अजित पवारांचा जिल्हा अध्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

संभाजीनगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज होणार प्रवेश सोहळा

Sep 08, 2025 06:41 (IST)

Live Update : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे सपाटीच्या भागात जमिनीतील पाणी पातळीत वाढ

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील रेट पाडा या परिसरात भूगर्भ पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे रेट पाडा येथील शेतकरी वसंत वडवी यांच्या शेतात असलेल्या उपनलिकेमधून अखंड पाण्याच्या जोरदार फवाऱ्यासह पाणी बाहेर उडत असून या उपनलिकेला जोडलेल्या पाईप मधून देखील एक सारखे पाणी बाहेर निघत आहे परिसरात तील पाणी पातळीत वाढ झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून असे पाणी ट्युबवेल मधून पाण्याची पंप बंद असले तरी देखील पाणी बाहेर निघत आहे. एकंदरीत जमिनीतून निघणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

Sep 08, 2025 06:40 (IST)

Live Update :सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दरेकरांचाही करण्यात आला सत्कार

कोकणातील तरूण नोकरीसाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जातो, तो इथेच राहिला पाहिजे. इथल्या मातीत व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा झाला पाहिजे, यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, इथे 'पाच मॉडेल प्रक्रिया उद्योग' उभे राहिले पाहिजेत, तुम्ही पुढाकार घ्या. याकरिता मुंबई बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांना दिली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या ७८ व्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार प्रवीण दरेकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष झाल्याबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांचा चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.