जाहिरात
11 hours ago

Breaking News : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर विरोधकांकडून EVM बाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

Live Update : उद्या गुरुवारी विदर्भात कसं असे वातावरण?

12 डिसेंबर गुरुवारी विदर्भात सर्वत्र आंशिक धुक्यासह अंशतः किंवा अधिकांश ढगाळ वातावरण राहणार असून गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 9 अंश राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्हयातील किमान तापमान 10 डिग्री तर यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान 11 आणि वाशिम येथील किमान तापमान 12 डिग्री राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमान 26 ते 30 डिग्री दरम्यान असेल.

Live Update : नवी मुंबईत इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नवी मुंबई कोपरखैरणे येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू 

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.

Live Update : सीएसएमटी परिसरात बसखाली येऊन एकाचा मृत्यू

सीएसएमटी परिसरात बसखाली येऊन एकाचा मृत्यू

Live Update : भाजप खासदार डॉ.अनिल बोंडेंनी दिल्लीत घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट..

भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी दिल्लीत घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट..

दोघांच्याही भेटीचं छायाचित्र आल समोर..

अनिल बोंडेंची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशा चर्चा सुरू असताना नार्वेकर-बोंडे भेटीला विशेष महत्त्व..

नार्वेकरांची अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या, अनिल बोंडे यांचं ट्विट

Live Update : राहुल नार्वेकर आज सायंकाळी 4 वाजता अमित शाह यांची घेणार भेट

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

राहुल नार्वेकर आज संध्याकाळी ४ वाजता अमित शाह यांची घेणार भेट

Live Update : नाशिक जि.प. शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण सेवक भरती केल्याचा ठपका

बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षणसेवक भरती करून फसवणूक केल्याप्रकरणी  नाशिक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.नदरम्यान या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचा खुलासा बच्छाव यांनी केला आहे.

Live Update : परभणी येथील घटनेचे पुण्यात पडसाद

परभणी येथील घटनेचे पुण्यात पडसाद 

पुण्यात आंदोलन करत वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको 

परभणी येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे विटंबना केल्याच्या निषेधार्थ पुण्यात वंचितच आंदोलन

पुण्यातील बाबसाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंचित कडून रास्तारोको

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार 

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याची माहिती

राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार 

मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती 

नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता.

Live Update : परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड, संतप्त महिलांकडून तोडफोड

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड, संतप्त महिलांकडून तोडफोड

सांगलीत भीषण अपघात, 2 लहान मुलांसह तिघांचा मृत्यू

सांगलीच्या कवलापूरजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. मृ्तांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश. दुचाकी आणि वडाप वाहनांमध्ये हा अपघात झाला. दिपाली विश्वास म्हारगुडे (28 वर्ष), सार्थक (7 वर्ष) आणि राजकुमार (5 वर्षे) अशी मृतांची नावे. तर जखमी विशाल दादासो म्हारगुडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ऑईल कंटेनरला अपघात, महामार्गावर वाहतूक कोंडी

 मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ऑईल कंटेनरला अपघात होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.  यावेळी  रस्ता निसरडा झाल्याने वाहतूक रोखण्यात आल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. गुजरातच्या दिशेने जात असलेल्या ऑईल कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर रस्ता दुभाजकात उलटला होता. कंटेनरमधील ऑइल कंटेनर मुंबई वाहिनीवर पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आला असून रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती आणि रेती टाकल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

पुष्पा 2 चित्रपटाला धुळ्यात शिवप्रेमींचा विरोध; छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट लावण्याची मागणी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट विविध चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. धुळ्यात देखील पुष्प चित्रपटाआधी हा चित्रपट सुरू होता. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट काढून त्या ठिकाणी पुष्पा-2 या चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. धुळ्यातील शिवप्रेमींनी विरोध केला असून छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. या मागणीसाठी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

दिल्लीला जाण्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

दिल्लीला जाण्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

काल रात्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली

राज्यमंत्रीडळाचा विस्ताराची चर्चा दिल्लीत होणार असून, महाराष्ट्र मध्ये नेत्यांची चर्चा अद्यापही सुरु आहे

मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार? CM फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे दुपारनंतर दिल्लीला जाण्याची शक्यता.  दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा.  अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न.  मात्र खाते वाटपावरून रस्सीखेच सुरूच. आज संध्याकाळपर्यंत दिल्ली मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार?

सतीश वाघ खून प्रकरण, अजून दोन जण पोलिसांच्या ताब्यात

सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी २ जणं ताब्यात

सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या आणखी २ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी २ जणं होते

आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला

आत्तापर्यंत या प्रकरणात आता ४ जणं पोलिसांच्या ताब्यात

एसटी महामंडळाकडून पुण्यात उभारण्यात येणार नवी 35 चार्जिंग स्टेशन्स

एसटी महामंडळाकडून पुण्यात उभारण्यात येणार नवी 35 चार्जिंग स्टेशन्स 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून शहरात 35 चार्जिंग स्टेशन्स  उभारण्यासाठी मंजुरी 

पुणे विभागात इलेक्ट्रिक बसची संख्या सातत्याने वाढत असल्याने आधिकचे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार

स्वारगेट बस स्थानकात 15 तर दापोडी एसटी वर्कशॉपमध्ये 20 चार्जिंग पॉईंट बसवण्यात येणार 

नव्या चार्जिंग स्टेशनमुळे दिवसाला 500 बसची चार्जिंग करता येणार

आसाराम बापूला उपचारांसाठी पुन्हा पुण्यात आणलं जाणार

आसाराम बापूला उपचारांसाठी पुन्हा पुण्यात आणलं जाणार

आसाराम बापूला तिसरा पॅरोल मिळणार 

राजस्थान उच्च न्यायालयाकडून आसारामला 17 दिवसांचा पॅरोल

पुण्यातील खासगी रुग्णालयात आसाराम बापूवर उपचार केले जाणार

आसारामला उपचारासाठी 15 दिवस आणि प्रवासासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली

रत्नागिरीत रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा राजकारण तापणार?

रत्नागिरीत रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते, माजी आमदार आणि रिफायनरी समर्थक प्रमोद जठार यांनी १२ डिसेंबरला रत्नागिरीत रिफायनरी समर्थकांची बैठक बोलावली. तर दुसरीकडे राजापूरमधील शिवसेनेचे स्थानिक आमदार किरण सामंत यांनी रिफायनरी हा मुद्दा माझ्यासाठी संपलेला विषय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जठार यांच्या बैठकीबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही, त्यांनी का बैठक लावली याची माहिती घेतो असं आमदार किरण सामंत यांनी म्हटलं. 

विदर्भात पुन्हा गारठा परतला, सर्वच जिल्ह्यांचे तापमान 5 ते 7 अंशांनी घसरले

विदर्भाचे तापमान पुन्हा घसरले असून थंडीचे हे आवर्तन पुढील दहा दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान 5 ते 7 अंशाने घसरले आहे. बुलढाणा येथे विदर्भातील सर्वात कमी 11.4 अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

नागपूर शहराचे किमान तापमान अवघ्या चोवीस तासांत चक्क 4 अंशांनी कमी झाले असून 12 डिग्री वर आले आहे. 

 

ही गारठ्याची स्थिती किमान 10 दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आमदार उत्तम जानकर यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट

आमदार उत्तम जानकर यांनी दिल्ली येथे घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट 

मारकडवाडी प्रकरणासंदर्भाने आमदार उत्तम जानकर यांची दिल्ली वारी 

दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेक नेत्यांची जानकर यांनी घेतली भेट 

अरविंद केजरीवाल यांचीही आमदार उत्तम जानकर यांनी घेतली भेट 

राहुल गांधी यांच्यासोबत अरविंद केजरीवाल देखील मारकडवाडी येथे येणार असल्याची चर्चा

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो-पिकअपची धडक, एकाचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी मंचर जवळील कळंब येथे आयशर टेम्पो आणि पिकअप यांची समोरासमोर धडक. पिकपचा चालक जागीच ठार तर इतर दोघे जण गंभीर जखमी. या अपघातातील जखमींना मंचर मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करत आहेत.

रवी राणांना मंत्रिपद मिळावं यासाठी अंबादेवी एकविरा देवीकडे कार्यकर्त्यांचं साकडं

रवी राणा यांना मंत्रिपद मिळावं यासाठी अंबादेवी एकविरा देवीकडे साकडं, अमरावती अंबादेवी महाआरती करून रवी राणांना मंत्रिपद मिळावं यासाठी आराधना, रवी राणा नेहमी समाजासाठी झटतात, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी रवी राणा सातत्याने प्रयत्न करतात, राज्यात विकास व्हावा यासाठी रवी राणांचा महायुतीला पाठिंबा, महायुतीत होणाऱ्या विकासामध्ये रवी राणां यांना मंत्रिपद मिळावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com