2 months ago
मुंबई:

बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे फरार संचालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना कर्जतमधून अटक करण्यात आली आहे. आज कल्याण कोर्टात त्यांना हजर केले जाणार आहे. शिवाय  नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस असून सर्वत्र घटस्थापना केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी आणि महायुती यांच्यात जागा पाटपाची चर्चा आजही होत आहे.  तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हिजबुल्ला आणि इस्त्रायल यांच्या जोरदार धुमश्चक्री सुरच आहे.

Oct 03, 2024 13:24 (IST)

बदलापूरमध्ये भाजपच्या अंतर्गत बैठकीत गोंधळ

भाजपा आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. त्यावेळी हा गोंधळ झाला. गोंधळामुळे निरीक्षकांना बैठकच रद्द करावी लागली.

Oct 03, 2024 12:47 (IST)

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाला परवानगी

दसरा मेळाव्यासाठी 12 ऑक्टोबरला ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली आहे. ठाकरे गटाकडून 14 मार्च 2024 रोजी मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. या मैदानासाठी कोणाचे ही पत्र न आल्याने ठाकरे गटाला आज शिवाजी पार्कची परवानगी देण्यात आली आहे

Oct 03, 2024 12:03 (IST)

पुण्यातील वानवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार

पुण्यातील वानवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्कूल व्हॅनमध्ये चालकानेच दोन चिमुरडींवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी 45 वर्षीय नराधम चालकाला वानवडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या व्हॅन चालकाने  सहा वर्ष चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर  गेल्या चार दिवसापासून चालत्या व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केले. 

Oct 03, 2024 10:59 (IST)

मध्य आणि पश्चिम रेल्वेची आता नव्या वेळापत्रकानुसार सेवा

मध्य रेल्वेवर पाच ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रका नुसार लोकल सेवा धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर 12 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी होईल. या वेळा पत्रकानुसार दादर स्टेशनवरची गर्दी कमी होणार आहे. मध्य रेल्वेवर 24 लोकलचा परळपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. 11 लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून धावणार आहेत. तर सहा लोकल ठाण्याऐवजी कल्याणपर्यंत धावतील. तर पश्चिम रेल्वेवर 12 नव्या लोकल फेऱ्या सुरू होतील. 

Advertisement
Oct 03, 2024 10:55 (IST)

नागपूर शहरातील 'आपली बस' ची चाके थांबलेली

वेतन, बोनस आणि भत्ते यांच्या मागणीसाठी आपली बसचे चालक आणि वाहक आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  तसेच नवरात्री निमित्त कोराडी मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनाही त्याचा  फटका बसला आहे. 

Oct 03, 2024 10:06 (IST)

पुण्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

पुण्यात बापानेच लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकरा वर्षाच्या मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केले आहेत. शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोटच्या मुलीवर बापाकडून एक वर्ष लैंगिक अत्याचार सुरू होता. 

Advertisement
Oct 03, 2024 09:43 (IST)

महिलांसाठी आता शक्ती नंबर उपलब्ध

सामान्य माणूस तक्रार करण्यासाठी घाबरतो. यासाठी शक्ती अभियान तक्रारपेटी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पेटीत महिला आपल्या अन्यायाबाबत तक्रार करू शकता. शिवाय एक कॉल प्रॉब्लेम सॉल यासाठी शक्ती नंबर उपलब्ध करण्यात आला आहे. 9209394917 या क्रमांकाची सेवा 24/7 ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

Oct 03, 2024 09:23 (IST)

शेअर बाजार गडगडला

शेअर बाजारात जोरदार आपटी. सेन्सेक्स 800 तर निफ्टी 290 अंकांनी गडगडला. मध्य आशियातील तणाव आणि सेबीचे F&O या दोघांचाही बाजाराला फटका बसला आहे. 

Advertisement
Oct 03, 2024 08:58 (IST)

देशभरात ऑक्टोबर हिट जाणवणार

देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रात अजूनही मान्सून आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर मान्सून महाराष्ट्रातून माघार घेणार आहे. ऐन थंडीच्या काळातही पावसाळा जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान प्रशांत महासागरात 'ला निना' सक्रिय झाल्यास सरासरीपेक्षा जास्त थंडी पडेल. 

Oct 03, 2024 08:42 (IST)

तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रौत्सवाला सुरूवात

तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. 

Oct 03, 2024 08:11 (IST)

उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार? दुपारी पत्रकार परिषद

उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता शिवसेनाभवन दादर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Oct 03, 2024 07:50 (IST)

जपानमध्ये विमानतळावर मोठा स्फोट

जपानमध्ये विमानतळावर मोठा स्फोट झाला आहे.  दुसऱ्या महायुद्धातल्या बाँम्बचा स्फोट झाल्याचं उघड झालं आहे. टोकिओच्या एअरपोर्टवर बाँबस्फोट झाला आहे. यात जीवितहाणी झालेली नाही. 80 विमानं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. हा बाँम्ब अमेरिकन बनावटीचा होता. 

Oct 03, 2024 07:44 (IST)

दूध येत नसल्यानं डॉक्टर महिलेची बाळासह आत्महत्या

संभाजीनगरमध्ये बाळासाठी दूध येत नसल्यानं डॉक्टर महिलेची बाळासह आत्महत्या, काही काळापासून नैराश्यात असल्याचं झालं आहे उघड.

Oct 03, 2024 07:38 (IST)

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भगदाड

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.