
सुनील कांबळे, लातूर
Latur Accident News : लातूरच्या उदगीरमधील करडखेल पाटी येथे कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही माजी सैनिक मित्र कर्नाटकमधील बिदर येथे सैनिकांच्या कॅन्टीनमध्ये खरेदीसाठी गेले होते. मात्र घरी परतत असताना तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील दोघेजण चाकूर तालुक्यातील सुगाव येथील रहिवास असून एक जण लातूर येथील रहिवासी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले विठ्ठल बाबुराव येचवाड (वय 56 वर्ष) बब्रुवान मेकले (वय 57 वर्ष), यादव काळे (वय 58 वर्ष), हुजूर दिलुखा पठाण सर्व चाकुर तालुक्यातील सुगाव येथील रहिवाशी आहेत. हे चौघेजण कर्नाटक राज्यातील बिदर शहरातील सैनिकांच्या कॅन्टीनमध्ये खरेदीसाठी गेले होते. सकाळी कॅन्टीनमधून खरेदी करून ते परत चाकूर तालुक्यातील सुगावकडे निघाले होते.
(नक्की वाचा- VIDEO : पट्टा, काठी, लाथा-बुक्क्या; मुलांना रिंगण करुन मारलं, अहिल्यानगरच्या निवासी शाळेतील प्रकार)
उदगीरपासून पुढे जवळपास 17 किलोमीटरवर असलेल्या करडखेल पाटीजवळ ट्रक आणि कार मध्ये भीषण अपघात झाला. यात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर हुजूर पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार)
अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. दरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world