सुनील कांबळे, लातूर
जीवदान देणाऱ्या डॉक्टरने आपल्याच कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पगाराचे पैसे मागितल्याने डॉक्टरने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी असं गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा देखील झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाळू भारत डोंगरे अस मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटल मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी डॉ. प्रमोद घुगे यांच्यावर अपहरण आणि अॅट्रोसिटीसारखे दोन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात बाळू डोंगरे याला आपल्यावरील सर्व गुन्हे अंगावर घेण्यास सांगितले होते आणि त्याला बसून पगार देण्याचे आश्वासन डॉक्टरांकडून देण्यात आले होते.
(नक्की वाचा- दोन उत्तपे कमी देणे पडले महागात; हॉटेल मालकाला ग्राहक आयोगाचा दणका)
या प्रकरणात बाळू डोंगरे याला अटकही झाली होती. त्यानंतर आपल्या कामाचे पैसे मागण्यासाठी बाळू डॉ. घुगे यांच्याकडे गेला होता. त्यावेळी बाळू याला बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
(नक्की वाचा- खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?)
लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात डॉ. प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.