- लातूर जिल्ह्यातील बोंबळी बुद्रुक गावातील शेतकरी दाम्पत्याला बैल नव्हता म्हणून स्वत: मशागत करत होते
- मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत प्रशासनाला बैल देण्याचे निर्देश दिले होते
- प्रशासनाने दिलेला बैल आजारी होता आणि त्याच्या उपचारासाठी दाम्पत्याला अतिरिक्त खर्च करावा लागला
विष्णू बुरगे
बैल घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे शेतकरी दाम्पत्याने आपल्यालाच औताला जुंपले. त्यानंतर शेतीची नांगरीणी केली. लातूर जिल्ह्यातील बोंबळी बुद्रुक गावची ही घटना आहे. त्याच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शिवाय शेतकऱ्याची काय स्थिती आहे हे सर्वांसमोर पुन्हा एकदा आहे. यानंतर त्याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. शिवाय या दाम्पत्याला बैल देण्याचे आदेश दिले. प्रशासनाने एक बैल उपलब्ध करुन ही दिला. पण झालं भलतचं. या दाम्पत्यावरचा भार कमी होण्या ऐवजी तो आणखी वाढला. त्याला कारण ही तसेच होते. जो बैल प्रशासनाने दिला तो आजारी होता. त्याच्या उपचारावरच या दाम्पत्याला खर्च करावा लागला. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती त्यांची झाली. त्यांनी आता आपल्याला चांगली बैलजोडी मिळावी अशी मागणी केली आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बु. येथील शेतकरी दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वीज कोसळून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःच्या खांद्यावर औताचा जू ओढत शेतीची मशागत केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी थेट निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासन हरकतीत आलं होतं. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या कुटुंबाला मदत करण्यात आली. मदत म्हणून त्यांना एक बैल देण्यात आला.
बैल मिळाला. आता सर्व काही ठिक होईल. आपली अडचणी दुर होईल. शेतीची मशागत व्यवस्थित होईल असं या दाम्पत्याला वाटत होतं. पण थांबा. तसं काहीच झालं नाही. अगदी त्याच्या उलटं झालं. प्रशासनाने या दाम्पत्याला जो बैल दिला तो आजारी होता. झालं तिथेच या दाम्पत्याला झटका बसला. पैसे नव्हते म्हणून त्यांना नवा बैल विकत घेता येत नव्हता. जो बैल मिळाला तो आजारी होता. पण त्याला टाकून ही देता येत नव्हते. उलट त्या बैलाच्या उपचारासाठी या दाम्पत्याला खर्च करावा लागले. असा दावा आता या दाम्पत्याने केला. जो बैल दिला गेला तो दुसऱ्या बैला सोबत काम करू शकत नाही. ताळमेळ नसल्याने दोन्ही बैल जखमी झाल्याचं ही त्यांनी सांगितलं.
मदत मिळाली पण अडचण कायम असल्याचं या दाम्पत्याने सांगितलं. हौसाबाई गायकवाड यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आजारी बैल मिळाला आहे. त्या ऐवजी आम्हाला सरकारने बैल जोडी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जो बैल दिला गेला त्याला औऊताला जुपता येत नाही. बैलांची जोडी जमत नाही. त्यामुळे दोन्ही बैल जखमी झाले आहेत. त्यामुळे आता काय करावं ते समजत नाही. आम्हाल बैल जोडी मिळावी अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं. बाकी आमची काही मागणी नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान आजारी बैल शेतकऱ्याला देवून त्याची चेष्ठा केली गेली असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
शेतकऱ्यांबाबत असलेली सरकारची अनास्था पुन्हा एकदा दिसून आली आहे. लातूर जिल्ह्यात एक शेतकरी दांपत्य स्वतः नांगर ओढतानाची बाब समाज माध्यमांमध्ये आली. खरंतर शेतकऱ्यांवर अशी वेळ येते याची सरकारला शरम वाटायला हवी, पण सरकारने या शेतकरी दांपत्याला एक बैल दिला. हा बैल दिल्यानंतर छान… pic.twitter.com/2yi9YzbCXb
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 12, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world