
त्रिशारन मोहगावकर, लातूर: फेसबुक लाईव्ह करत एका तरुणाने छातीत सुरा खूपसून घेऊन आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? असे अनेक सवाल आता उपस्थित होत असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तरुणाने फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करत असल्याचे सांगत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. भरत बालाजी सागावे (वय ३२) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अंबुलगा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
लग्नानंतर दोन महिन्यांनी नवविवाहित तरुणाला प्रेयसीनं पळवलं! धक्कादायक प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ
भरत अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुक लाईव्ह करत होता. “मी आत्महत्या करत आहे” असे सांगत त्याने काही वेळानंतर छातीत सुरा खुपसला. नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन बंद करून टाकला होता
दरम्यान, शोध घेतल्यानंतर तो पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला. त्याला तात्काळ लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच काही वेळात त्याचा मृत्यू झाला.
नक्की वाचा : Pune : घरी बसणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणे जीवावर बेतले! सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील महिलेचा टोकाचा निर्णय )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world