जाहिरात

वडिलांना तिकीट न मिळाल्याने मुलाचा भलताच निषेध, लातूरमध्ये NCP आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर केली लघवी

Latur Zilla Parishad Election 2026: लातूरमध्ये एका व्यक्तीने वडिलांना जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने भलत्याच पद्धतीने निषेध नोंदवलाय.

वडिलांना तिकीट न मिळाल्याने मुलाचा भलताच निषेध, लातूरमध्ये NCP आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर केली लघवी
"Latur Zilla Parishad Election 2026: लातूरमध्ये घडला किळसवाणा प्रकार"
Canva

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्या वडिलांना तिकीट न दिल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे (अजित पवार) आमदार संजय बनसोडे (former Maharashtra minister and NCP MLA Sanjay Bansode) यांच्या लातूर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचे घटना समोर आलीय. बुधवारी (21 जानेवारी 2026) ही घटना घडलीय. उदगीर तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उमेदवारी न दिल्याने लघवी करून निषेध

उदगीरच्या निळेबन मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मधुकर एकुरकेकर यांना 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न दिल्याने त्यांच्या मुलाने अशा पद्धतीने निषेध नोंदवल्याचे म्हटलं जातंय.   

अन्याय केल्याचा आरोप

मधुकर एकुरकेकर यांचा मुलगा नितीन एकुरकेकर यांनी पक्षनेतृत्वाने अन्याय केल्याचा आरोप केलाय. पण ते इथंवरच थांबले नाहीत तर त्यांनी बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघवी करून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी या निषेधाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता; पण वाद निर्माण झाल्यानंतर तो व्हिडीओ हटवण्यात आलाय.

Maharashtra Local Body Election 2026:  राज्यात पहिला उमेदवार बिनविरोध, 'या' ठिकाणी शिवसेनेनं खातं उघडलं

(नक्की वाचा: Maharashtra Local Body Election 2026: राज्यात पहिला उमेदवार बिनविरोध, 'या' ठिकाणी शिवसेनेनं खातं उघडलं)

निळेबन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागणाऱ्या मधुकर एकुरकेकर यांच्या समर्थकांचा दावा आहे की, अनेक वर्षे स्थानिक पातळीवर प्रामाणिक काम करूनही पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

(Content Source PTI)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com