1 day ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीला (Vidhan Sabha Election) अवघे काही दिवस शिल्लक असताना सध्या राज्यभरात सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते हे मोठमोठ्या सभा घेताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील खेड आंबेगाव जुन्नर या तीनही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे सभा घेणार आहेत ते सभेमधून कशा पद्धतीने तोफ डागणार आहेत याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. आज अमित शाहांच्या धुळे, परभणी आणि चाळीसगाव येथे सभा होणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पालघरमध्ये आज दोन जाहीर प्रचार सभा होणार आहेत.   

Nov 13, 2024 13:50 (IST)

Live Update : नाना पटोले कोणतीही बॅग न घेता सभास्थळी, निवडणूक अधिकारी तपासणीशिवाय परतले

घाटंगी येथे काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर घाटंजी येथे उतरले. निवडणूक आयोगाचे आठ जणांचे पथक तपासणीसाठी सज्ज होते. मात्र नाना पटोले कोणतीही बॅग न घेता सभास्थळी आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना बॅग न तपासताच परतावं लागलं. 

Nov 13, 2024 13:39 (IST)

Live Update : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचे बॅनर फाडले

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचे बॅनर फाडले

मलंगड परिसरात चार ते पाच ठिकाणी बॅनर फाडण्यात आले, या प्रकरणात भाजपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.  

Nov 13, 2024 13:28 (IST)

Live Update : धुळ्याच्या दोंडाईचामधून अमित शाह Live

Nov 13, 2024 12:46 (IST)

Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या सामानाची आचारसंहिता पथकाकडून तपासणी

देवेंद्र फडणवीस यांच्या सामानाची आचारसंहिता पथकाकडून तपासणी 

देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथं हेलिकॉप्टरमधून उतरताच पथकाने तपासणी केली

Advertisement
Nov 13, 2024 12:07 (IST)

Live Update : सोन्याच्या भावात गेल्या 3 दिवसात तब्बल 2 हजार 600 रुपयांची घसरण

सोन्याच्या भावात गेल्या 3 दिवसात तब्बल 2 हजार 600 रुपयांची घसरण

तर चांदीच्या भावात 3 हजार रुपयांची घसरण 

3 दिवसात सोन्याचे भाव 77 हजार 900 रुपयांवरून 75 हजार 300 रुपयांवर 

चांदीचे भाव 94 हजार रुपयांवरून 91 हजार रुपयांवर 

जळगाव सुवर्णनगरी आज सोन्याचे भाव 75 हजार 300 रुपये तर चांदीचे भाव 91 हजार रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही प्रमाणात स्थिरता निर्माण झाल्याने सोन्याच्या भावात देखील घसरण झाल्याची तज्ज्ञांची माहिती

Nov 13, 2024 12:06 (IST)

Live Update : अजित दादा यांची पाथरी विधानसभेच्या मानवत तालुक्यात सभा!

पाथरी विधानसभेचे उमेदवार राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मानवत येथे सभा घेणार आहेत, राजेश विटेकर हे राष्ट्रवादीचे विद्यमान विधानपरिषद आमदार आहेत.  तर पाथरी विधानसभेत त्यांची थेट लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्याशी होणार आहे.

Advertisement
Nov 13, 2024 12:05 (IST)

Live Update : तर गावागावात पाईपलाईने दारू विक्री होणार, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमरावतीच्या दर्यापुरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळतय बंडखोर रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा या सभा घेत आहेत. दर्यापूरात ठाकरेंच्या सेनेकडून दारू विक्री करणाऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलय. त्यामुळे गावागावात पाईपलाईने द्वारे दारू विक्री होणार असल्याने उद्धव ठाकरेंनी महिलांचे भविष्य आणि त्यांच्या मुलांच्या डोक्यावरील वडिलांचा हात उठवण्याचं काम केलय, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय. एक बँक बुडवणारा आणि दुसरा दारू विक्री करणारा उमेदवार असल्याने काय निवडावं याचा निर्णय मतदारांना करायचाय, असं भावनिक आवाहन देखील नवनीत राणा यांनी महिलांना केले आहेत.

Nov 13, 2024 12:03 (IST)

Live Update : पालघर, बोईसर नागझरी परिसरात दगड खान व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे

पालघर, बोईसर नागझरी परिसरात दगड खान व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे

आयकर विभागाकडून पालघरमधील उद्योजकांवर कारवाई 

भाजप महायुती सरकारकडून आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप