13 days ago
मुंबई:

विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.  त्यामुळे पक्षांकडून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी यंदाची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून जोर लावला जात आहे. दरम्यान आजपासून शिंदे गटाच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. 
 

Nov 03, 2024 16:02 (IST)

Live Update : परतीच्या पावसाचा फटका कोकणातील पर्यटनालाही, गणपतीपुळे परिसरातील वीज 2 दिवसांपासून गायब

परतीच्या पावसाचा फटका कोकणातील पर्यटनालादेखील बसतोय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोकणातील प्रसिद्ध अशा गणपतीपुळे परिसरातील वीज दोन दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे व्यावसायिक पुरते हवालदिल झाले आहेत. पर्यटकांना देखील त्याचा फटका बसतोय. व्यवसायावरती होत असलेल्या परिणामामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. जनरेटर असेल किंवा इन्व्हर्टर यांच्या वापरावर देखील मर्यादा येत आहेत. दिवाळीचे पहिले दोन दिवस घरच्यांसोबत एन्जॉय केल्यानंतर आता गणपतीपुळे मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी हळूहळू वाढतेय. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सध्या भाविक रांगेत उभे असल्याचे चित्र आहे.

Nov 03, 2024 13:41 (IST)

Live Update : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाऊबीज

भाऊबीजेला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं औक्षण केलं. 

Nov 03, 2024 13:22 (IST)

Live Update : मनोज जरांगे यांच्याकडून आज पाच वाजता उमेदवारांची घोषणा

मनोज जरांगे यांच्याकडून आज पाच वाजता उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. यासाठी जरांगे यांची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान या बैठकीत काही मतदार संघांची नावे देखील आता समोर येत आहे. ज्यात संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री ल, कन्नड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर बीड आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. त्यामुळे जरांगे यांच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मतदार संघ निश्चित केले जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय जरांगे घेणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Nov 03, 2024 13:15 (IST)

Live Update : बारामतीत हिंजवडीसारखं आयटी पार्क उभारण्याचं स्वप्न - युगेंद्र पवार

Advertisement
Nov 03, 2024 13:12 (IST)

Live Update : उल्हासनगरच्या महिलेकडून योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

उल्हासनगरच्या इशरत फातिमा खान नावाच्या महिलेने मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला मेसेज पाठवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

Nov 03, 2024 13:09 (IST)

Live Update : तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा पराभव, मुंबई कसोटी सामना न्यूझीलंडने 25 धावांनी जिंकला

तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा पराभव, मुंबई कसोटी सामना न्यूझीलंडने 25 धावांनी जिंकला

कसोटी मालिकेत न्यूझीलंडला 3-0 असं निर्भेळ यश

भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

WTC फायनलसाठी भारताचा रस्ता आता अवघड

Advertisement
Nov 03, 2024 13:08 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

आज कोणते उमेदवार द्यायचे याबाबत निर्णय घेता येणार आहे. जे निवडून येणार आहे, तेवढेच मतदारसंघ लढायचे. जो उमेदवार आम्हाला लेखी देईल किंवा व्हिडिओग्राफी करून देईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल तरीही चालेल. त्याला निवडून आणण्यासाठी जोर लावला जाईल. थोड करायचं पण नीट नेटक करायचं. आमच्या पुढे मोठा राक्षस आहे त्याची वाट लावायची आहे. आज आम्ही निर्णय घेणार आहोत. 

Nov 03, 2024 12:53 (IST)

Live Update : मनसे नेते नितीन सरदेसाई हे आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीसाठी

मनसे नेते नितीन सरदेसाई हे आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीसाठी 

विधानसभेत आम्ही ठाकरे यांना भाजप समर्थन करणार आहे

मात्र त्याआधी सदिच्छा भेट घेण्यासाठी प्रसाद झाड यांच्या निवासस्थानी नितीन सरदेसाई आले आहेत

Advertisement
Nov 03, 2024 12:01 (IST)

Live Update : फटाक्यांचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला, तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

फटाक्यांचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला, तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

फटाक्यांचा वाद एका 23 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलाय. तरुणाची भर रस्त्यात रात्री निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसदमधील वसंतनगर येथील ही घटना आहे. फटाके फोडण्याचा वाद झाल्याने विशाल लोखंडे या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आदित्य आठवले या तरुणास अटक केली आहे. त्याच घटनेचा व्हिडिओ आता पुढे आला आहे

Nov 03, 2024 11:59 (IST)

Live Update : शरद पवार इंदापूरात दाखल, नाराज नेत्यांसोबत चर्चा करणार

शरद पवार इंदापूरात दाखल, नाराज नेत्यांसोबत चर्चा करणार

Nov 03, 2024 11:29 (IST)

Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद Live

Nov 03, 2024 11:25 (IST)

Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 नोव्हेंबरला मंगळवेढ्यात सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 नोव्हेंबरला मंगळवेढ्यात सभा

पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन

मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Nov 03, 2024 10:15 (IST)

Live Update : बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाने अमरावती विधानसभेत उतरवला उमेदवार...

बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाने अमरावती विधानसभेत उतरवला उमेदवार...

प्रहार पक्ष तर्फे डॉ.सय्यद अब्रार यांना उमेदवारी..

अमरावती विधानसभेत मुस्लिम मतांची मोठी संख्या...

अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रात मुस्लिम मतांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे, या क्षेत्रात सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. सय्यद अब्रार यांना आमदार बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाने विधानसभेचे उमेदवारी दिली आहे.. अब्रार यांनी बच्चू कडूंचा आभार मानत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. काँग्रेसचे सुनील देशमुख, महायुतीच्या सुलभा खोडके आणि प्रहारचे डॉ. सय्यद अब्रार यांच्यात या मतदारसंघात थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे. 

Nov 03, 2024 10:14 (IST)

Live Update : उद्धव ठाकरे मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडणार, अंबाबाईंच दर्शन घेऊन ठाकरेंची पहिली सभा

उद्धव ठाकरे मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडणार, अंबाबाईंच दर्शन घेऊन ठाकरेंची पहिली सभा

उद्धवसेनेचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी कोल्हापुरात येत आहेत. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्याच दिवशी आदमापूर (ता. भुदरगड) येथे त्यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नियोजनाच्या तयारीला लागले आहेत. राधानगरी मतदार संघाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत.

Nov 03, 2024 10:13 (IST)

Live Update : शेंदुरजना घाट शहरात रेड्याची मिरवणूक, वर्षानुवर्षाची परंपरा कायम..

शेंदुरजना घाट शहरात रेड्याची मिरवणूक, वर्षानुवर्षाची परंपरा कायम..

अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट शहरात रेड्याची मिरवणूक काढून पूजन केले जाते.. वर्षानुवर्षाची ही परंपरा आजही जोपासली जाते. दिवाळीतील गोधनाचा दिवस हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो.. यावेळी दिवाळीच्या पाडव्याची परंपरा कायम राखत रेड्याची सजावट करतात.. फुलांच्या माळांनी व मोरांच्या पंखांनी साज केला जातो.. ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण शहरातून ही मिरवणूक काढली जाते.. दरम्यान नागरिक देखील आपल्या परंपरेनुसार नृत्य सादर करतात.. त्यानंतर धनगवडी मंदिरात रेड्याला पूजेसाठी नेले जाते.. ही वर्षानुवर्षाची परंपरा आज देखील जोपासली जाते

Nov 03, 2024 09:10 (IST)

पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात दोन घरगुती सिलेंडरचा स्फोट

पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात दोन घरगुती सिलेंडरचा स्फोट 

सिलेंडरच्या स्फोटामध्ये दोन जण गंभीर जखमी 

सिलेंडरच्या स्फोटामुळे दोन्ही घरात मोठी आग लागली

अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोन्ही ठिकाणी आग वेळेत नियंत्रणात 

जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात आले दाखल

Nov 03, 2024 08:39 (IST)

नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू. एक गंभीर

नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू. एक गंभीर 

अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडलं. 

Nov 03, 2024 08:38 (IST)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर भामरे यांचा महाविकास आघाडीचे संदीप बेडसे यांना पाठिंबा...

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार जयकुमार रावल आणि महाविकास आघाडीचे संदीप बेडसे यांच्यामध्ये सरळ लढत होत असताना या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर भामरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शिंदखेडा विधानसभा मतदारसंघा मधून माघार घेत असून महाविकास आघाडीचे संदीप बेडसे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद शिंदखेडा विधानसभा मतदार संघात वाढणार आहे.