6 days ago
मुंबई:

सध्या विधानसभा निवडणुकीचं (Vidhan Sabha Election) वारं वाहत आहे. परिणामी उमेदवारांच्या एकमेकांविरोधात फैरी झडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शिरूर, इस्लामपूर आणि फलटण विधानसभा मतदारसंघात सभा आहेत. त्याशिवाय शरद पवारांच्या उदगीर, परळी, आष्टी आणि बीड या विधानसभा मतदारसंघात सभा आहेत. 

Nov 09, 2024 14:01 (IST)

Live Update : आमच्याकडून ओबीसी, एससी एसटी यांचं आरक्षण कधीच कमी केले जाणार नाही - अमित शाह

अमित शाह यांची काँग्रेसवर टीका -

 धर्मावर आधारित आरक्षण कधीच नसतं. मुस्लीम यांना १० टक्के आरक्षण देण्याची जाहिरात करतात, काॅग्रेस त्याचे समर्थन करतं. राहुल बाबा आम्ही थेट सांगतो, आमच्याकडून ओबीसी, एससी एसटी यांचं आरक्षण कधीच कमी केले जाणार नाही. 

Nov 09, 2024 13:19 (IST)

Live Update : पुण्यात फुरसुंगी भागात आढळला महिलेचा मृतदेह

पुण्यात फुरसुंगी भागात महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेचा खून करत मृतदेह बेडच्या स्टोरेज बॉक्सध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. महिलेच्या राहत्या घरातच तिचा मृतदेह आढळला आहे. पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून 

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

Nov 09, 2024 12:42 (IST)

Live Update : देवेंद्र फडणवीसांची चंद्रपुरात जाहीर सभा

Nov 09, 2024 12:05 (IST)

Live Update : स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग

स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग

 

कर्मचारयांकडून प्रसंगवधान राखत आग विझवण्याचे प्रयत्न 

सकाळी ९:४३ वाजता स्वारगेट बस डेपो वर्कशॉप येथील आवारात पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची घटना 

अग्निशमन दलाकडून तातडीने आग आटोक्यात

सुदैवाने या घटनेत कोणी जखमी नाही.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

Advertisement
Nov 09, 2024 11:36 (IST)

Live Update : परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात अपघात झाला आहे. परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली असून येथील एक लाईन वाहतुकीसाठी यापूर्वीच बंद होती. सध्या परशुराम घाटात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली असून हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

ट्रकचा अपघात झाल्यामुळे एक लाईन पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे, तर दुसरी लाईन रस्ता क्रॅक झाल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून बंद आहे. त्यामुळे सध्या परशुराम घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांब लांब रांगा. 

Nov 09, 2024 10:21 (IST)

Live Update : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील बंडखोरांची हकालपट्टी...

प्रीती बंड, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्यासह सहा शिवसैनिकांची हकालपट्टी...

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील खराटेंविरुद्धची बंडखोरी भोवली...

अमरावतीच्या बडनेरा मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खराटेविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार संजय बंड यांच्या सहचारिणी प्रीती बंड यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.. तर प्रीती बंड यांच्यासोबत असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नाना नागमोते, प्रवीण आळसपुरे, आशिष धर्माळे, मनोहर भूत या शिवसैनिकांची देखील सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे...

Advertisement
Nov 09, 2024 10:17 (IST)

Live Update : कळमनुरी शहरात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार..

कळमनुरी विधानसभेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीच्या कळमनुरी शहरात  सभा पार पडणार आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढत राहणार आहे, उद्धव ठाकरे यांची दुपारी तीन वाजता कळमनुरी शहरातील लमानदेव मंदीर परिसरात ही सभा पार पडणार असून या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

Nov 09, 2024 08:55 (IST)

Live Update : महायुतीतील नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू

महायुतीच्या उमेदवारांसाठी नितीन गडकरींच्या जिल्ह्यात एकाच दिवशी चार सभा आहेत. कारंजा, पुलगाव, वर्ध्या व समुद्रपूर येथे नितीन गडकरी आज सभा घेणार आहेत. सुमीत वानखडे, राजेश बकाने व पंकज भोयर व समीर कुणावार या चार उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत. 

Advertisement
Nov 09, 2024 08:51 (IST)

Live Update : धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांच्या तीन जाहीर सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या बीड जिल्ह्यात आज तीन जाहीर सभा होणार आहेत. बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. आणि याच उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय. बीड, परळी आणि आष्टी या तीन विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे

Nov 09, 2024 08:21 (IST)

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात कालपासुन सुरू असलेल्या नक्षली पोलीस चकमकीत 3 नक्षली ठार

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात कालपासुन सुरू असलेल्या नक्षली पोलीस चकमकीत 3 नक्षली ठार

गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड विजापूर जिल्ह्यातील उसूर-बासागुडा-पामेड-तारेम  या भागात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच, DRG/STF/CoBRA/CRPF संयुक्त पोलीस दल शोध मोहीम राबवत असतांना अचानक नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला.  रेखापल्ली-कोमाथापल्लीच्या जंगल-डोंगराळ भागात पोलीस दल आणि माओवाद्यांमध्ये सतत चकमक सुरू झाली व शोधमोहिम अंती चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी 03 गणवेशधारी माओवाद्यांचे मृतदेह, 01 क्र. 12 बोअर रायफल, 01 क्र शस्त्रास्त्रे इ. जप्त करण्यात आली तसेच चकमकीत ठार झालेल्या 03 गणवेशधारी पुरुष माओवाद्यांची ओळख पटवण्यासाठी कार्यवाही केली जात आहे

Nov 09, 2024 08:19 (IST)

Live Update " एका व्यक्तीने प्रश्न विचारात प्रशांत बंब यांच्या कार्यक्रमात गोंधळ

गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत सलग दुसऱ्या दिवशी  गोंधळ पाहायला मिळाला. गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी बंब यांना प्रश्न विचारले. त्यामुळे प्रशांत बंब यांनी या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण ऐकत नसल्याने प्रशांत बंब यांनी या तरुणांना बाहेर काढा असे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते आणि प्रश्न विचारणाऱ्या तरुणांमध्ये धक्काबुक्की झाली.

त्यामुळे या सभेत चांगलाच गोंधळ उडाला. या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कालच अशाच एका ठिकाणी प्रशांत बंब यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने प्रश्न विचारात गोंधळ घातला होता.