29 days ago
मुंबई:

आज गुरुपुष्यामृत (Gurupushyamrut yoga October 2024) योगावर अनेक उमेदवार अर्ज भरणार (Vidhan Sabha Election) आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीचे उमेदवार हा योगाचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज भरणार आहेतं. कांदिवली पूर्व येथून अतुल भातकळकर, विलेपार्ले पूर्व येथून पराग आळवणी तर सांताक्रुज पश्चिम येथून अमित साटम उमेदवारी अर्ज भरतील. अर्ज भरताना तिन्ही नेत्यांकडून रॅली काढण्यात येणार असून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येईल. मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहिर कोटेचा, वडाळा विधानसभा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर महाविकास आघाडीत दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार योगेश कदम, गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आमदार भास्कर जाधव, चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद  पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव, राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत, राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आमदार राजन साळवी, राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

Oct 24, 2024 17:45 (IST)

मनसेचे राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

मनसेचे राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र रणजीत शिरोळे हे पुण्यातून शिवाजीनगर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी

Oct 24, 2024 17:39 (IST)

मनसेचे भांडुप विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी

मनसेचे भांडुप विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी

संदीप जळगावकर हे भांडुप विधानसभेतून मनसेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते

मात्र या ठिकाणी मनसे नेते शिरीष सावंत यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली

त्यामुळे संदीप जळगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे.

Oct 24, 2024 14:21 (IST)

Live Update : भाजपची दुसरी यादी तयार, भाजप 150 जागा लढणार असल्याची माहिती

आज किंवा उद्या यादी जाहीर होणार

भाजप 150 जागा लढणार असल्याची माहिती

Oct 24, 2024 14:19 (IST)

Live Update : नागपुरात महायुती मधली पहिली बंडखोरी समोर...

नागपुरात महायुती मधली पहिली बंडखोरी समोर आली आहे. तीन वेळा आमदार असलेले भाजपचे कृष्णा खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. हा आपला अंतिम निर्णय असून मी काही ही झाले तर अर्ज मागे घेणार नाही असे सांगितले आहे.

Advertisement
Oct 24, 2024 14:03 (IST)

Live Update : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगिरथ भालकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगिरथ भालकेंचा उमेदवारी अर्ज दाखल 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भगिरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भगिरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Oct 24, 2024 14:00 (IST)

Live Update : ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना नसून शिवसेना विरुद्ध काँग्रेस आहे - संतोष बांगर

महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला पुन्हा एकदा कळमनुरीच्या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला दिली. निश्चित या संधीच मी सोने केल्याशिवाय राहणार नाही. ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना नसून ही लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस ही लढत दिसून येत आहे. या कळमनुरी विधानसभा मतदारसंघावर येत्या 23 तारखेला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा दावा बांगर यांनी केला आहे.

Advertisement
Oct 24, 2024 13:54 (IST)

Live Update : शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी भरला उमेदवारी अर्ज..

विटा खानापूर मतदार सघातून महायुतीचे आणि शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी भरला उमेदवारी अर्ज..

सांगलीच्या विटा खानापूर मतदारसंघातून सुहास बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शंभूराज देसाई हे सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. शंभूराज देसाई यांनी सुहास बाबर हे लाखोच्या मतांनी निवडून येतील अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या आहेत. 

Oct 24, 2024 13:06 (IST)

Live Update : आदित्य ठाकरे यांची रॅली वरळीत दाखल, अर्ज भरणार

आदित्य ठाकरे यांची रॅली वरळीत दाखल, अर्ज भरणार

Advertisement
Oct 24, 2024 12:58 (IST)

Live Update : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांची भव्य सभा

Oct 24, 2024 12:57 (IST)

Live Update : कागल मतदारसंघातून समरजित घाटगे यांनी भरला उमेदवारी अर्ज

कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून समरजित घाटगे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. गैबी चौकात मोठी शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अजित पवार गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे त्यांच्या विरोधात आहेत. घाटगे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर यंदा कागलमध्ये तुतारीच वाजणार अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्याच्या आहेत.

Oct 24, 2024 12:49 (IST)

Live Update : बापासाठी लेक मैदानात, किरण सामंतांची मुलगी अपूर्वा सामंतचं आक्रमक भाषण

बापासाठी लेक मैदानात 

किरण सामंतांची मुलगी अपूर्वा सामंतचं आक्रमक भाषण

दुसऱ्याची रेघ छोटी करायची नाहीय, तर आपली रेघ वाढवायची आहे - अपूर्वा सामंत

गुळाल आपणच उधळणार

Oct 24, 2024 12:39 (IST)

Live Update : उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि असलम शेख मातोश्रीवर

महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. धारावी, भायखळा विधानसभेसाठी काँग्रेस पक्ष अजूनही आग्रही आहे. मात्र या जागांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील आग्रही आहे. या जागांवरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि असलम शेख मातोश्रीवर दाखल झाले आहेत

Oct 24, 2024 12:36 (IST)

Live Update : मंगलप्रभात लोढा यांचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मलबार हिल विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला.  मागील तीन टर्म लोढा मलबार हिल येथुन चांगल्या मताधिक्य विजयी होतात, यंदा ही जनता पाठीशी उभी राहील असे लोढा म्हणाले

Oct 24, 2024 12:32 (IST)

Live Update : टिवसा मतदारसंघाच्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांची भव्य नॉमिनेशन रॅली

Oct 24, 2024 12:25 (IST)

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Oct 24, 2024 12:22 (IST)

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Oct 24, 2024 12:19 (IST)

Live Update : आमदार वैभव नाईक यांनी मतदारांशी साधला संवाद

Oct 24, 2024 12:08 (IST)

Live Update : 2024 निवडणूक महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉइंट असेल - सुप्रिया सुळे

Oct 24, 2024 12:06 (IST)

Live Update : 2024 निवडणूक महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉइंट असेल - सुप्रिया सुळे

Oct 24, 2024 12:03 (IST)

Live Update : मंत्री छगन भुजबळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढणार...

मंत्री छगन भुजबळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येवला शहरतील संपर्क कार्यालयापासून थोड्याच वेळात भव्य रॅली काढत जाणार आहेत. विंचुर चौफुली, फत्तेपूर नाका मार्गे येवला तहसील कार्यालयाच्या दिशेने रॅली पुढे जाईल. त्यानंतर महायुती घटक पक्षातील स्थानिक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर एन्झोकेम हायस्कूल मैदान येथे भव्य सभा होऊन ते सर्वाना संबोधित करतील. 

Oct 24, 2024 12:01 (IST)

Live Update : सुलभा गायकवाड यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागलेल्या कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आज सुलभा गायकवाड यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपचे नेते विनोद तावडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार कुमार आयलानी शिवसेना शिंदे गटाच्या माजी HB नगरसेविका माधुरी काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Oct 24, 2024 11:43 (IST)

Live Update : विधानसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे उमेदवार दिनकर पाटील यांचा मनसे प्रवेश..

मनसेत प्रवेश केल्यानंतर दिनकर पाटलांना पश्चिम विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली. दिनकर पाटील हे भाजपामध्ये माजी सभागृहनेता होते आणि लोकसभेला देखील इच्छुक होते. विधानसभेत देखील त्यांची उमेदवारी डावलल्याने त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. नाशिक हा एकेकाळी मनसेचा गड होता. त्यामुळे दिनकर पाटील यांना उमेदवारी दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मनसेचा उमेदवार दिल्याने राज ठाकरे यांच्या दोन सभा नाशिकमध्ये लागणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली..

Oct 24, 2024 11:36 (IST)

Live Update : नामांकनांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं केलं औक्षण

नामांकनांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं औक्षण केलं.

Oct 24, 2024 11:28 (IST)

Live Update : महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची नामांकन रॅली LIVE

Oct 24, 2024 11:27 (IST)

Live Update : राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन 

किरण सावंत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित राहणार. जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून किरण सामंत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. 

Oct 24, 2024 11:22 (IST)

Live Update : इंदापुरात सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

इंदापुरात सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Oct 24, 2024 11:20 (IST)

Live Update : अतुल भातखळर मोठ्या जन समुदायसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले

अतुल भातखळर मोठ्या जन समुदायसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. भाजपकडून कांदिवली पूर्व विभागातून ते तिसऱ्यांदा आमदारकीसाठी अर्ज भरत आहे. त्यांच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या असून ढोल ताशाच्या गजरात ही रॅली निघाली आहे 

Oct 24, 2024 10:48 (IST)

Live Update : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात येवला शहरात होणार दाखल

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात येवला शहरात होणार दाखल

- जोरदार शक्तिप्रदर्शन करत भुजबळ येवला मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार 

- दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार

Oct 24, 2024 09:51 (IST)

IND VS NZ 2nd Test match: आजपासून पुण्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच, न्यूझीलंडने जिंकला टॉस

टॉम लॅथमने टॉस जिंकून, न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. भारताने यावेळी टीममध्ये तब्बल तीन बदल केले आहेत. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर केएल राहुल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना वगळण्यात आले.

Oct 24, 2024 09:17 (IST)

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीसाठी होणार रवाना...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीसाठी होणार रवाना...

काही जागांवर अजूनही तिढा कायम असल्यामुळे थेट दिल्लीमध्ये यावर चर्चा होणार आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. 

Oct 24, 2024 09:13 (IST)

Live Update : परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाथरा या मूळ गावातून धनंजय मुंडे यांनी दौऱ्याला सुरुवात केलीय. नाथरा गावातील निवासस्थानी आई रुक्मिणी मुंडे यांचे दर्शन घेवून, स्वर्गीय पंडित राव मुंडे यांच्या स्मृतिस्तंभावर नतमस्तक झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासोबत बहीण पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष उपस्थित आहेत. नाथरा गावात देवदर्शन झाल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं धनंजय मुंडे दर्शन करतील, त्यानंतर साधारण अकरा वाजता धनंजय मुंडे परळी तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कोणतेही शक्ती प्रदर्शन होणार नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Oct 24, 2024 09:10 (IST)

Live Update : चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरणार..

Oct 24, 2024 08:17 (IST)

Live Update : भाजप नेते चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजप नेते चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याकडून देवदर्शन 

चंद्रकांत पाटलांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. 

 सपत्नीक चंद्रकांत पाटील कसबा गणपतीच्या दर्शनाला

आज शक्तिप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार 

Oct 24, 2024 08:15 (IST)

Live Update : जळगावमध्ये आज दिग्गज नेते दाखल करणार उमेदवारी अर्ज

जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील दाखल करणार उमेदवारी अर्ज 

अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील दाखल करणार उमेदवारी अर्ज 

मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे दाखल करणार उमेदवारी अर्ज 

तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील दाखल करणार उमेदवारी अर्ज

Oct 24, 2024 08:14 (IST)

Live Update : 270 जागांचा तिढा सुटला - अनिल देशमुख

270 जागांचा तिढा सुटला आहे. उरलेल्या पैकी 5 किंवा 6 जागांवर बोलणी सुरू आहे. उर्वरित जागांसाठी शेकाप, CPI, CPM, AAP या मित्र पक्षांशी बोलणी आज होतील - अनिल देशमुख

Oct 24, 2024 08:13 (IST)

Live Update : ठाकरे गटाचे उमेदवार आमदार भास्कर जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार

गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आमदार भास्कर जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या मतदारसंघातून भास्कर जाधव हे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत.. तर दोन वेळा चिपळूणमधून निवडून आले आहेत. त्यामुळे भास्कर जाधव हे आमदारकीचा षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. आज ते उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

Oct 24, 2024 08:12 (IST)

Live Update : मराठवाड्यातील पाच जागांबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच

महायुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर असली तरी मराठवाड्यातील पाच जागांबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे

Oct 24, 2024 08:09 (IST)

Live Update : नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाला दोन जागा मिळताच शिवसैनिकांकडून जल्लोष

नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाला दोन जागा मिळताच शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्यचे उमेदवार वसंत गिते हे रात्री मुंबईहून नाशिकमध्ये दाखल होताच पाथर्डी फाटा परिसरात फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. शहरातून कार रॅली काढत शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. दरम्यान एकीकडे शहरातील या दोन्ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचा हा आनंदोत्सव बघायला मिळाला.