5 days ago
मुंबई:

महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित केला जाणार आहे. याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलं असून महाराष्ट्रचा स्वाभिमान जपणारा हा जाहीरनामा असणार आहे. असाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय भाजपचा जाहीरनामाही आज प्रकाशित केला जात आहे. यासाठी मोठेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय आज रविवार असल्याने पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Nov 10, 2024 15:06 (IST)

Live Update : विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे 6 टन चांदीच्या विटा

विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे 6 टन चांदीच्या विटा

Nov 10, 2024 15:01 (IST)

Live Update : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचाराचे पत्रक वाटण्यावरून वाद

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचाराचे पत्रक वाटण्यावरून वाद

महेश गायकवाड समर्थक वाटत  होते पत्रक

गणपत गायकवाड समर्थकाच्या  कार्यलयात पत्रक दिल्याने वाद

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 

कोळशेवाडी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत सुरू केला तपास

भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड लढत आहेत अपक्ष निवडणूक

Nov 10, 2024 15:01 (IST)

Live Update : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचाराचे पत्रक वाटण्यावरून वाद

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचाराचे पत्रक वाटण्यावरून वाद

महेश गायकवाड समर्थक वाटत  होते पत्रक

गणपत गायकवाड समर्थकाच्या  कार्यलयात पत्रक दिल्याने वाद

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 

कोळशेवाडी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत सुरू केला तपास

भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड लढत आहेत अपक्ष निवडणूक

Nov 10, 2024 13:32 (IST)

Live Update : उद्धव ठाकरेंच्या सोलापुरात दक्षिण सोलापूर, सांगोला येथे सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज सोलापूर आणि सांगोला येथे दोन सभा होत आहेत. सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात असणारे उमेदवार दीपक साळुंखे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगोलात प्रचार सभा घेणार आहेत. 

Advertisement
Nov 10, 2024 12:21 (IST)

Live Update : महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणार, कार्यक्रमाला सुरुवात...

Live Update : महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणार, कार्यक्रमाला सुरुवात...

Nov 10, 2024 11:47 (IST)

Live Update : थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचं होणार प्रकाशन

थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचं होणार प्रकाशन

Advertisement
Nov 10, 2024 11:05 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?

वद्धांना पेन्शन म्हणून 1500 रु. ऐवजी 2100 मिळणार

महाराष्ट्रात देशातली पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवांसाठी एकत्रित धोरण राबवणार

Nov 10, 2024 11:03 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?

कौशल्य जणगनना करणार

छत्रपती आकांक्षा केंद्र सुरु करणार

मेक इन महाराष्ट्र : अंमलबजावणी, एअरनोटीकल आणि स्पेस यात शेती वापर करणार

ओबीसी, ईबीसींसाठी शैक्षणिक शुल्कांची प्रतीपुर्ती करणार

गडकिल्ल्यांच्या विकासाकरिता प्राधिकरण..

स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार

Advertisement
Nov 10, 2024 11:00 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?

शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणणार

२५ लाख रोजगाराची निर्मिती करणार

शेतकरी कर्जमाफीचा आमचा संकल्प

वृद्ध पेन्शन धारकांना २,१०० हून अधिक निधी देणार

शेतमालाची हमीभावाने खरेदी करणार

जीवनावश्यव वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार

Nov 10, 2024 10:52 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्र प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात...

Nov 10, 2024 10:51 (IST)

Live Update : संतोष दानवे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे पूत्र आणि भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीये.. काल रात्री उशीरा ही भेट झालीये..  लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा रावसाहेब दानवेंना मोठा फटका बसला होता.. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संतोष दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत दानवे यांनी निवडणुकीवर चर्चा केली असल्याची माहिती आहे..

Nov 10, 2024 10:49 (IST)

Live Update : गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची वरुड येथे तर देवेंद्र फडणवीस यांची धामणगाव आणि धारणी येथे सभा...

भाजपकडून सभेची तयारी अंतिम टप्प्यात...

भव्य डोम आणि पंधरा हजार नागरिकांची सभास्थळी आसन व्यवस्था...