27 days ago

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. उरलेल्या जागांवरील उमेदवारी कधीही जाहीर होवू शकते. त्यात काही जागांवर अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चर्चा सुरू आहे. काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा केली आहे. 
 

Oct 26, 2024 21:31 (IST)

किमान 2 जागा तरी महायुतीने RPI ला द्याव्यात, रामदास आठवले यांची मागणी

महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच आरपीआयने जागांची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी सांगितलं की, आरपीआयने महायुतीकडे 8 ते 10 मागीतल्या होत्या. मात्र किमान 2-3 जागा तरी द्याव्यात किंवा विधानपरिषद मिळावी, महामंडळ मिळावे, सत्तेत सहभाग ठिकठिकाणी देण्याचा निर्णय करावा अशी आमची मागणी आहे. मोदींच्या नेतृत्वात विकास सुरू आहे. म्हणून आम्ही महायुतीसोबत आहोत. मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यायमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महायुतीने विचार करावा आणि दोन जागा द्याव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे .

Oct 26, 2024 21:29 (IST)

अमरावतीच्या बडनेरा येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटात मोठी बंडखोरी

अमरावतीच्या बडनेरा येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटात मोठी बंडखोरी

शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड बडनेरा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवणार

समर्थकांना विश्वासात घेऊन प्रीती बंड यांची मोठी घोषणा

28 ऑक्टोबरला दाखल करणार अपक्ष अर्ज

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रीती बंड यांचे समर्थक नाराज

Oct 26, 2024 20:31 (IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर, 15 उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर, 15 उमेदवारांची घोषणा

Oct 26, 2024 20:29 (IST)

संगमनेर तालुक्यात थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून सुजय विखे यांना गावबंदीचा तोंडी ठराव

संगमनेर तालुक्यात थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून सुजय विखे यांना गावबंदीचा तोंडी ठराव. तर सुजय विखे यांची थोरातांचा जावयांच्या आंभोरे गावात उद्या नियोजीत संकल्प मेळावा असणार आहे. या अनुषंगाने वादंग होऊ शकते. तसेच संगमनेर जाळपोळ प्रकरणी दंगलीखोराविरोधात तसेच पोलिसांनी गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटील उपपोलीस अधिकारी संगमनेर कार्यालयासमोर येथे धरणे आंदोलन करणार आहेत..

Advertisement
Oct 26, 2024 19:27 (IST)

जालन्यातील परतूर येथे माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल

जालन्यातील परतूर येथे माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीमध्ये परतूरची जागा ही परंपरागत काँग्रेसकडे आहे. मात्र या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानं जेथलिया नाराज झाले. जेथलियांनी आज परतूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Oct 26, 2024 19:24 (IST)

नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता

नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता, 

मानखुर्द येथून निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरु 

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यात

Advertisement
Oct 26, 2024 15:38 (IST)

माहिम- शिवडीत महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता

मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. माहिम आणि शिवडी विधानसभा मतदार संघात मनसेला पाठिंबा देण्याचा विचार महायुतीत सुरू आहे. या दोन्ही जागा सध्या महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्या आहेत. जर महायुतीने मनसेला पाठिंबा दिल्यास त्याचा थेट फायदाअमित ठाकरेंसोबत बाळा नांदगावकरांना होण्याची दाट शक्यता आहे. 

Oct 26, 2024 15:24 (IST)

शेतकऱ्यांची मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नको - रविकांत तुपकर

महाविकास आघाडी सोबत जायचे नाही अशी भूमीका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी आपले मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देवू नका असे आवाहन ही त्यांनी केला आहे. शिवाय शेतकरी संघटना निवडणूक मैदानात उतरणार की नाही याबाबत 29 ऑक्टोबर रोजी निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement
Oct 26, 2024 11:30 (IST)

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, आतापर्यंत 71 जणांच्या नावाची घोषणा

काँग्रेसने 23 उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस आतापर्यंत 71 उमेदवारींची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत काँग्रेसने सुनिल केदार यांत्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय शिवाजीराव मोघे यांच्या मुलालाही उमेदवारी देण्यात आली आहे. कैलास गोरंट्याल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. 

Oct 26, 2024 09:31 (IST)

साताऱ्यात 15 लाखाची रोख रक्कम जप्त

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, तासवडे टोल नाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक विशेष कारवाई करण्यात आली. 26 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो संशयास्पद स्थितीत आढळली. त्याची  तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, वाहनामध्ये 15 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. 

Oct 26, 2024 09:29 (IST)

कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे गटात तुफान हाणामारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एका चर्चासत्र कार्यक्रमात गैबी चौकात पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या समर्थकांत जोरदार राडा झाला. 

Oct 26, 2024 08:54 (IST)

वरळी विधानसभा मतदार संघातून मिलींद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

वरळीतल्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी वर्षा बंगल्यावर बोलवले आहे. वरळीतून मिलींद देवरा यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. देवरा यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंबरोबर होणार आहे. तर मनसेचे संदिप देशपांडेही मैदानात आहेत. 

Oct 26, 2024 08:36 (IST)

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात पंधरा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवडीतून अजय चौधरी, तर भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी 

 धुळे शहर अनिल गोटे,

 चोपडा (अज) राजू तडवी,

 जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,

 बुलढाणा- जयश्री शेळके,

 दिग्रस पवन श्यामलाल जयस्वाल, 

 हिंगोली- रूपाली राजेश पाटील,

 परतूर- आसाराम बोराडे, 

 देवळाली (अजा) योगेश घोलप, 

 कल्याण पश्चिम सचिन बासरे,

 कल्याण पूर्व - धनंजय बोडारे,

 वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव,

 शिवडी- अजय चौधरी, 

 भायखळा मनोज जामसुतकर,

 श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे,

 कणकवली- संदेश भास्कर पारकर