नरेश सहारे/गडचिरोली
Vijay Wadettiwar: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दिसत आहेत. यादरम्यान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादही शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या जात प्रमाणपत्रावरून हा वाद सुरू झाला होता. यावरून धर्मरावबाबा आढाव देखील वडेट्टीवारांना सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.
धर्मरावबाबा आढाव यांचा पलटवार
"काँग्रेसकडे आता कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. आमच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांच्यामध्ये ताकद नाही. त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. भारत विकसित देश झाला पाहिजे आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. 'अब की बार 400 पार' असे आमचे व्हिजन आहे. यामध्ये अशोक नेते यांना पाच लाखांहून अधिक मताने निवडून आणण्याची जबाबदारी आहे. पाच वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेते धानोऱ्याला नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता आले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की, आम्हाला एक हाती सत्ता मिळून द्या, नगरपंचायतीच्या विकासासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असे आश्वासन दिले होते. पण एक रुपयाचीही दमडी आणली नाही आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी मत मागत आहेत", अशी टीका धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे.
18 एप्रिलला वडेट्टीवारांविरोधात करणार गौप्यस्फोट
मागील काही दिवसांपासून धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर धानोऱ्यातील सभेदरम्यान धर्मराव बाबा आत्राम यांनी येत्या 18 एप्रिल रोजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात स्फोट करणार असल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळातील हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आत्राम वडेट्टीवारांविरोधात नेमके काय गौप्यस्फोट करणार आहेत? याविरोधात वडेट्टीवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
कन्हैया कुमार लोकसभेच्या रिंगणात, काँग्रेसकडून भाजपच्या 'या' खासदाराला देणार आव्हान
कोकणात 30 कोटींचा भ्रष्टाचार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप