प्रतिनिधी, गुरू दळवी
महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे शिंदे गट या जागेवरुन आग्रही असताना दुसरीकडे भाजप मागे हटण्याचं नाव घेत नाही. शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावावर ठाम आहेत. नारायण राणेंनीही या जागेवरुन प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत गेल्या दहा वर्षात पाणी चोरण्याचे काम करत होते. लांजा तालुका अतिशय दुर्गम असून याचाच फायदा खासदार विनायक राऊत आणि ठेकेदारांनी घेतला याबाबत सर्व पुरावे आमच्या हातीशी लागले आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार विनायक राऊत यांचे आणखी एक दोन भ्रष्टाचार समोर आले आहेत तो आम्ही बाहेर काढणार, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
निलेश राणेंचा गंभीर आरोप...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी जलजीवन योजनेअंतर्गत एका ठेकेदाराला हाताशी धरून भ्रष्टाचार केला आहे. हा भ्रष्टाचार राऊत यांच्याच मतदारसंघात लांजा तालुक्यात झाला आहे. शिवसाई असोसिएट्स ही प्रमुख कंपनी असून रवींद्र डोळस त्याचे चीफ प्रमोटर आहेत. रवींद्र डोळस हे ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत. शिवसाई असोसिएट्स खासदार विनायक राऊत यांना पैसे पुरवण्याचे काम करते लांजा तालुक्यातील जवळपास 109 महसूल गावांमध्ये 64 कोटी 41 लाख 67 हजार रुपयाची कामे मंजूर झाली आहेत, असं निलेश राणे यांनी सांगितलं.
आजच्या पत्रकार परिषदेत मांडलेले ठळक मुद्दे,
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) April 14, 2024
🛑 लांजा तालुक्यातील जलजीवन योजनेतील खा. विनायक राऊत आणि ठेकेदार रवींद्र डोळस यांचे नेक्सस पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणले.
▪️ उबाठा गटाचा रत्नागिरी जिल्हा समन्वयक शिवसाई असोसिएटस कंपनीचा प्रमोटर्स रवींद्र डोळस याला हाताशी धरून खा.…
त्यातील अधिकाधिक टेंडर ही ठाकरे सरकारच्या काळात पास झाली. त्यापैकी 35 गावातील 33 कोटी 92 लाख 30 हजार रुपये एवढी रुपयांची कामे एकट्या रवींद्र डोळस याला मिळाली आहेत या कामांचे टेंडर भरून देण्यासाठी ठराविक कालावधी असतो मात्र आतापर्यंत केवळ 16 लाख रुपये किमतीची कामे या डोळस कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण केली आहेत कामे मिळाली जवळपास 34 कोटींची आणि फक्त 16 लाखांची कामे झाली अशी नोंद दिसून येत आहे आणि जी बिले काढली गेली शिवसाई असोसिएटच्या नावावर तब्बल 16 कोटींची बिले अदा करण्यात आली. शिवसाई असोसिएट्स कडून पूर्ण करण्यात आलेली कामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. यामध्ये प्रामुख्याने लांजा तालुक्यातील वेरवली तसेच आजूबाजूच्या गावातील कामांचा समावेश आहे असे भाजप नेते निलेश राणे यांनी आरोप करताना स्पष्ट केले. हा भ्रष्टाचार जवळपास 30 कोटीं 25 लाख पेक्षा जास्त असून यामध्ये खासदार विनायक राऊत हे प्रमुख लाभार्थी आहेत. याची आकडेवारी तपास यंत्रणेकडे देत आहोत. याचे सर्व पुरावे सुद्धा आम्ही तपास यंत्रणे कडे देत आहोत. लवकरात लवकर रवींद्र डोळस आणि यामध्ये समाविष्ट असलेले अधिकारी यांची तक्रार दाखल करण्यात येणार असून त्याची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी मागणी निलेश राणेंकडून करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world