जाहिरात
Story ProgressBack

डीजे वाजला, मधमाश्या पेटल्या; पंगतीऐवजी सुजलेले वऱ्हाडी पोहोचले रुग्णालयात

बुलढाणा शहरातील जाभरुण रोडजवळील ही घटना आहे. जाभरुण रोड परिसरात 28 एप्रिल रोजी सांयकाळी घटना घडली आहे.

Read Time: 2 min
डीजे वाजला, मधमाश्या पेटल्या; पंगतीऐवजी सुजलेले वऱ्हाडी पोहोचले रुग्णालयात

अमोल गावंडे, बुलढाणा

बुलडाण्यातील लग्नात डीजे वाजवणे वऱ्हाडी मंडळींच्या चांगलंच अंगलट आलं आहे. डीजेच्या आवाजाने चवताळलेल्या मधमाश्यांनी वऱ्हाड्यांवर हल्ला केला. त्यामुळे लग्र समारंभात पोहोचण्याऐवजी वऱ्हाड्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.  

 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुलढाणा शहरातील जाभरुण रोडजवळील ही घटना आहे. जाभरुण रोड परिसरात 28 एप्रिल रोजी सांयकाळी घटना घडली आहे. लग्नामध्ये डीजे वाजत होता, त्याठिकाणी एक झाडावर एका मोहोळ होतं. डीजेच्या मोठ्या आवाजाने मोहोळावरील माश्या चवताळल्या आणि त्यांनी थेट लोकांवर हल्ला केला. 

नक्की वाचा- राज्यात विचित्र हवामान, कोकण तापलं तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज

डीजेचा आवाज खूप मोठा असल्याने त्यांचा आग्या मोहोळाच्या माश्यांना त्रास झाला. माश्यांनी उडून वराडी मंडळी हल्ला केला. या हल्ल्यामुळे सर्वांची एकच पळापळ झाली. यामध्ये १० जण जखमी झाले आहे.  सर्व जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

नक्की वाचा-  अबब! कारमध्ये शिरला 6 फुट लांब महाकाय अजगर, ड्रायव्हरला फुटला घाम VIRAL VIDEO

जखमींमध्ये अवंती वावळे, रमाबाई जाधव, मायाबाई झिने, सौरभ हिवाळे, सागर जाधव, बबन जाधव, पंकज गवई, राजू गवई, राजू वाहुळे, सुभाष गवई, माया जाधव यांच्यावर जिल्हा सामन्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination