जाहिरात

अजित पवारांच्या आमदाराने निवडणुकी आधीच मैदान सोडले, आता नवा चेहरा मैदानात

बबन शिंदे हे हक्काने निवडून येणारी जागा होती. पण आता त्यांनीच माघार घेतल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

अजित पवारांच्या आमदाराने निवडणुकी आधीच मैदान सोडले, आता नवा चेहरा मैदानात
माढा:

संकेत कुलकर्णी 

माढा लोकसभेनंतर माढा विधानसभेतही एकामागून एक राजकीय घडामोडी घडत आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन शिंदे हे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभेत तेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. शरद पवारांचीही त्यांनी भेट घेतली होती. पण आता त्यांना आपला विचार बदलला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. बबन शिंदे हे हक्काने निवडून येणारी जागा होती. पण आता त्यांनीच माघार घेतल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. बबन शिंदे यांनी जरी माघार घेतली असली तरी पुढचा उमेदवार कोण असेल याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू आहे. बबन शिंदे यांनी आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिवाय लेकासाठी ते मतांचा जोगवा मागतानाही दिसत आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात 1995 सालापासून सलग सहा वेळा आमदार बबन शिंदे हे विधानसभेत निवडून गेले आहेत. या मतदारसंघात आमदार शिंदे यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिवाय साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न शिंदे करतात. 

ट्रेंडिंग बातमी - 'कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात' सावंत हे काय बोलले?

गेल्या दोन वर्षापासून आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची तयारी करत आहेत. मात्र संस्थात्मक काही प्रकरणांमुळे रणजितसिंह शिंदे यांना मतदारांपर्यंत आपली प्रतिमा उंचावण्यात तेवढे यश आलेले नाही. त्यामुळे लेकासाठी बबन शिंदेच मैदानात उतरले आहे. त्यांनी मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार बबन शिंदे आले होते. त्या वेळी बोलताना, त्यांनी यंदा आपण निवडणूक लढवू का नाही याबाबत शंका आहे. मात्र रणजित भैय्याला पाच वर्षासाठी एकदा संधी देऊन पहा. असे म्हणत थेट आपण नाही तर मुलगा मैदानात असेल. तोच राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे संकेत दिलेत.  

ट्रेंडिंग बातमी -  'कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं' सत्तारांचे ते वक्तव्य, निशाणा कोणावर?

माढा मतदारसंघाच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड म्हणजे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह यांच्याशिवाय त्यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. धनराज यांनी शरद पवारांची भेट घेत विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. तर आमदार बबन शिंदे हे देखील पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत. अशातच धनराज शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आमदार बबन शिंदे यांच्या निवडणुकीतील माघारीनंतर धनराज आणि रणजीतसिंह यांच्यातील भाऊबंदकीची लढत माढा विधानसभेच्या आखाड्यात अधिक तीव्रतेने दिसेल अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

अजित पवार गटाचे सर्वच आमदार मातब्बर असल्याचे कायमच बोलले जाते. यामध्येच आता आमदार बबन शिंदे यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यातही आमदार बबन शिंदे यांच्या पुत्राचा ओढा शरद पवार गटाकडे अधिक दिसतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची त्यांचीही इच्छा आहे. जर तिकडे उमेदवारी मिळत नसेल तर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारीही त्यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढा मतदारसंघाचे भवितव्य काय असणार ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
'त्यांची हाकालपट्टी करा, नाहीतर आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडतो' त्या वक्तव्याने वाद पेटला
अजित पवारांच्या आमदाराने निवडणुकी आधीच मैदान सोडले, आता नवा चेहरा मैदानात
PM narendra modi Apologized for chhatrapati shivaji maharaj statue collapse in malvan sindhudurg
Next Article
शिवरायांच्या पायावर डोकं ठेवत मी माफी मागतो : PM नरेंद्र मोदी