Raigad Rada News: रायगडमध्ये मोठा राडा! भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्वर रोखली? गाडी फोडली, नेमकं काय घडलं?

गोगावले समर्थकांकडून सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसाद पाटील, रायगड:

 Mahad Nagar Palika Election News: महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांसाठी मतदान होत आहे. एकीकडे मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळत असतानाच अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर वाद झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. रायगडमध्येही असाच मोठा राडा झाला झाल्याने खळबळ उडाली आहे.

रायगडमध्ये राडा.. 

समोर आलेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये भरत गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे.  मंत्री भरत गोगावले यांचे पुत्रविकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे. गोगावले समर्थकांकडून सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 

Maharashtra Local Body Election Live Updates: बदलापुरात भाजप- शिंदे गटात राडा, जतमध्येही मोठा वाद

सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आला आहे. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  आज जाबर हे महाड मधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता राडा झाला.

विकास गोगावलेंचे तटकरेंना चॅलेंज...

याबाबत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी गंभीर आरोप केले आहेत. "आज मी मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलो असता तीन अनोळखी गाड्या या ठिकाणी आल्या. मी कार्यालयाकडे जात असताना या गाड्या आल्या. गाड्यांमध्ये काठ्या, हॉकी स्टिक होत्या. माझ्यावर रिव्हॉल्वरही उगारण्यात आली," असं विकास गोगावले यांनी केला आहे.

Advertisement

Pune News: 'महामेट्रो'त नोकरीचं स्वप्न क्षणात भंगल! ऑफिसपर्यंत गेलेल्या तरुणांना धक्काच बसला

"माझ्यावर ही रिव्हॉल्वर का रोखण्यात आली? सुनिल तटकरेंमध्ये दम असेल तर त्यांनी समोर यावे, असे बगलबच्चे पाठवू नये. त्यांना अजून माहिती नाही. मी भरतशेठची अवलाद आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचा मावळा म्हणून आम्ही राज्यात काम करत आहोत. याबाबत भरत गोगावले यांना माहिती दिली आहे, पोलिसांनी योग्य कारवाई करावी," असंही विकास गोगावलेंनी म्हटलं आहे.