जाहिरात

Pune News: 'महामेट्रो'त नोकरीचं स्वप्न क्षणात भंगल! ऑफिसपर्यंत गेलेल्या तरुणांना धक्काच बसला

पुणे मेट्रो आणि महामेट्रोच्या अधिकृत वेबसाइट्सवर नोकरीचे सर्व तपशील अपलोड केले जात आहेत आणि नागरिकांना नियुक्तीसाठीच्या कार्यपद्धतीचेपालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Pune News: 'महामेट्रो'त नोकरीचं स्वप्न क्षणात भंगल! ऑफिसपर्यंत गेलेल्या तरुणांना धक्काच बसला

Pune Metro Scam: पुणे मेट्रोमध्ये नोकरी मिळाल्याच्या आनंदाने कामावर रुजू होण्यासाठी आलेल्या काही तरुणांना मोठा धक्का बसला आहे. पुणे मेट्रो स्टेशन प्रशासनाकडे त्यांनी जी नियुक्तीपत्रे सादर केली, ती सर्व बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, महामेट्रोने पुणे मेट्रोमध्ये नोकरी देण्याच्या खोट्या आश्वासनांपासून आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) नावाने फिरत असलेल्या बनावट नियुक्तीपत्रांपासून लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना अशा खोट्या मेसेजेस किंवा नियुक्तीपत्रांना बळी न पडण्याचे सार्वजनिक आवाहन केले आहे. फर्स्ट प्रेस जर्नलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा-  दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी फोडणार)

महामेट्रोची नागरिकांना सूचना

एका मेट्रो अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी सतर्क राहावे आणि महामेट्रोमध्ये नोकरी देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही बनावट एजंट्सशी संपर्क साधणे टाळावे. नोकरीच्या संधींबद्दल अधिक माहितीसाठी नागरिकांनी महामेट्रोच्या अधिकृत वेबसाइटला द्यावी. महामेट्रोने कोणत्याही व्यक्तीला किंवा एजंटला आपल्या वतीने लोकांना कामावर ठेवण्यासाठी नियुक्त केलेले नाही.

पुणे मेट्रो आणि महामेट्रोच्या अधिकृत वेबसाइट्सवर नोकरीचे सर्व तपशील अपलोड केले जात आहेत आणि नागरिकांना नियुक्तीसाठीच्या कार्यपद्धतीचेपालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Cute VIDEO: मुलीने दाखवली 'कोरियन हार्ट' साईन; वडिलांच्या रिअ‍ॅक्शनने जग जिंकलं, व्हिडीओ व्हायरल)

पुणे मेट्रो फेज-2 मध्ये दोन नव्या मार्गांना मंजुरी

या फसवणुकीच्या घटनेसोबतच, पुणे मेट्रोच्या विस्ताराच्या दृष्टीने एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज-2 अंतर्गत दोन महत्त्वाच्या मार्गांना  मंजुरी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com