जाहिरात

कोल्हापुरातल्या महागणपतीचा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अशी देखील या गणपतीची प्रचिती आहे. या महागणपतीचा हार अंजुमन पठाण चाचा बनवतात.

कोल्हापुरातल्या महागणपतीचा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश
कोल्हापूर:

कोल्हापुरातील महागणपती सध्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनसाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच महागणपतीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अशी देखील या गणपतीची प्रचिती आहे. या महागणपतीचा हार अंजुमन पठाण चाचा बनवतात. 43 वर्षापूर्वी मोहम्मद पठाण यांच्यापासून हार देण्याची परंपरा सुरू झाली आहे. गणपती आगमन झाल्यानंतर आणि विसर्जन सोहळा असे दोन हार या पठाण कुटुंबीयांकडून दिले जातात. महागणपतीच्या या वैशिष्ट्यावरून सामाजिक बांधिलकी दर्शवणारा, हा मूर्तीचा हार सामाजिक संदेश देणार आहे. सध्या महागणपतीच्या गळ्यातील हार बनवणारे अंजुमन चाचा मोठा भक्ती भावानं हे काम करत आहेत. यामध्ये कुठेही धर्माच्या भिंती आड येत नाही. आपली ही गणपती बाप्पावर श्रद्धा असल्याचे चाचा सांगतात. त्यांचे संपुर्ण कुटुंब या उत्सवात सहभागी होतात. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1981 पासून या गणपतीची परंपरा

1981 साली या गणपतीची प्रतिष्ठापना झाली. शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाकडून हा गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण गणेशोत्सव काळात या मंडळाचे कार्यकर्ते कार्यरत असतात. या पूर्ण काळात या चौकात भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. नंदकुमार वळंजू यांच्या कुटुंबियांकडून या महागपणपतीची सुरुवात झाली. 

सामाजिक संदेश देणारं महागणपतीचे वैशिष्ट्य

कोल्हापुरातील महागणपती सध्या दर्शनासाठी खुला झालेला आहे. याच महागणपतीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अशी देखील गणपतीची प्रचिती आहे. या महागणपतीचा हार अंजुमन पठाण चाचा बनवतात. 44 वर्षापूर्वी मोहम्मद पठाण यांच्यापासून की हार देण्याची परंपरा सुरू झाली. गणपती आगमन झाल्यानंतर आणि विसर्जन सोहळा असे दोन हार या पठाण कुटुंबीयांकडून दिले जातात. नवसाला पावणारा अशी महती असलेल्या महागणपतीच्या या वैशिष्ट्यावरून सामाजिक बांधिलकी दर्शवणारा हा मूर्तीचा हार सामाजिक संदेश देणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची

यंदाच्या वर्षी 21 किलो चांदीची मूर्ती दान

नवसाला पाहणाऱ्या या महागणपतीला पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असतात. नवस पूर्ण झाल्याबद्दल देवाचे दर्शन घेऊन मागणी पूर्ण करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात नारळाची तोरणे देवाच्या चरणी ठेवली जातात. या 21 फुटी गणपती मूर्तीवर भक्तांनी दान केलेलं दागिने आहेत. जवळपास पावणे दोनशे किलो चांदी या महागणपतीला आतापर्यंत आलेला आहे. यंदा एका भक्तानं तब्बल 21 किलो चांदीची 21 इंच महागणपतीची हुबेहूब मूर्ती दान केलेली आहे. तसेच दरवर्षी गणपतीला चांदीचे पाळणे देखील अर्पण केले जातात. अनेक त्या लहान मुलाला महागणपतीच्या चरणावर ठेवण्यासाठी आणत असतात.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com