1 hour ago

मनसेकडून पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून इगतपुरी येथे मनसेचे तीन दिवसीय शिबिर होणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे. 14, 15 आणि 16 जुलै असे तीन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदेंना दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं, ठाकरेंचे वकिल कोर्टाला विनंती करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

Jul 14, 2025 16:31 (IST)

Live Update : मनसेचा इगतपूरीला मेळावा, राज ठाकरेंची थोड्या वेळात पत्रकार परिषद

मनसेचा इगतपूरीला मेळावा होत आहे त्यासाठी राज ठाकरे इगतपूरीत दाखल झाले आहेत. ते  थोड्या वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.  

Jul 14, 2025 12:46 (IST)

Satara News: साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला

साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला

कोयना धरण पाणालोट परिसर, महाबळेश्वर, नवजा, परिसरात मुसळधात 

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडणार

धरणातून प्रतिसेकंद  पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार..

कोयना धरण प्रशासनाचा निर्णय 

नदिकाठचा  गावांना सतर्कतेचा इशारा

Jul 14, 2025 12:43 (IST)

LIVE Update: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ॲागस्ट महिन्यात सुनावणी होणार

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ॲागस्ट महिन्यात सुनावणी होणार 

सुप्रीम कोर्ट म्हणाले, “या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. खूप कालावधी झाला आहे. ॲागस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू.”

ॲड कपिल सिब्बल म्हणाले, ॲागस्ट मध्ये तारीख कोणती असेल ते कोर्टाने सांगावं.

सुप्रीम कोर्ट -  तारीख कोणती असेल ते आम्ही रोस्टर पाहून आज संध्याकाळ पर्यंत सांगू.

Jul 14, 2025 12:19 (IST)

LIVE Updates: अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याविरोधात अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर 

दीपक काटेवर जामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र

दीपक काटे सह त्याच्या अन्य साथीदारान वर कठोरातील कठोर गुन्हे दाखल व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिकेत 

अक्कलकोटमध्ये रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाकडून करण्यात आली घोषणाबाजी 

दीपक काटे आणि सहकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल व्हावे यासाठी वंचित कडून अक्कलकोट पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन 

Advertisement
Jul 14, 2025 10:42 (IST)

live updates: राजेंच्या किल्ल्यांचा गौरव! विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी जल्लोष साजरा करत आहेत.युनेस्कोच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा उल्लेख झाल्याबद्दल हा जल्लोष साजरा केला जात आहे. सर्व सत्ताधारी आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्रीही या जल्लोषात सहभागी झालेत

Jul 14, 2025 10:11 (IST)

LIVE Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दुग्धभिषेक

 राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शाईफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा तीव्र निषेध करत आज कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बीडच्या अंबाजोगाई मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी  सरकारविरोधात घोषणाबाजी केली.  दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Advertisement
Jul 14, 2025 09:35 (IST)

LIVE Updates: मुंबई काँग्रेस मधील दोन आमदारांचा स्वबळावर लढण्याचा नारा

मुंबई काँग्रेस मधील दोन आमदारांचा स्वबळावर लढण्याचा नारा

मुंबईत काँग्रेस पक्षाचे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी व्यक्त केली आहे

जरी आमदारांची ही इच्छा असली तरी सगळे निर्णय दिल्ली घेणार असल्याच देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकिसाठी काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे

Jul 14, 2025 09:34 (IST)

Live Updates: मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा दिल्ली दरबारी

मुंबई काँग्रेस मधील अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा दिल्ली दरबारी

मुंबईत काल काँग्रेस पक्षाची जनसभा पार पडली

मुंबई काँग्रेस तर्फे या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं

काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगडी यांनी या सभेला संबोधित केले आणि आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्यासाठी तयारी देखील केली

यावेळी मुंबई काँग्रेसमधून आमदार असलम शेख आमदार अमीन पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळाली

मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि नसीम खान हे या कार्यक्रमात अनुपस्थित पाहायला मिळाले

नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत हे वारंवार समोर येत आहे

अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झाली आहेत

जरी पक्षश्रेष्ठिन सोबत बैठक एका वेगळ्या कारणासाठी असली तरी मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावल जात असल्याची तक्रार देखील ते करणार असल्याची माहिती मिळत आहे

Advertisement
Jul 14, 2025 09:34 (IST)

LIVE Updates:शिंदेंच्या शिवसेनेचे आज मार्गदर्शन शिबिर पार पडणार

शिंदेंच्या शिवसेनेचे आज मार्गदर्शन शिबिर पार पडणार 

महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षीय निवडणुकी संदर्भात या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार 

काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकारणी पक्षातील पद ही लोकशाही पद्धतीने वाटली जाईल असा निर्णय घेण्यात आला होता. 

आता प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे यासाठी आज दादर येथे हे शिबिर भरवण्यात येणार आहे 

पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शिबिरात मार्गदर्शन करतील.

Jul 14, 2025 09:33 (IST)

LIVE Updates: शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यव्यापी एसआयटी स्थापन

शिक्षक भरती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यव्यापी एसआयटी – स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम – तयार करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.

शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती नागपूरपासून सुरू होऊन संपूर्ण राज्यभर पसरली असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या एसआयटीमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी असलेल्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी आदींविरोधात सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.

Jul 14, 2025 08:00 (IST)

Live Update : रविवारी मुंबईत कोविड-19 चे दोन नवीन रुग्ण आढळले

रविवारी मुंबईत कोविड-19 चे दोन नवीन रुग्ण आढळले 

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४४ झाली आहे

जानेवारी २०२५ पासून महाराष्ट्रात २,६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

जानेवारी २०२५ पासून राज्यात आतापर्यंत ३६,०३४ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत

Jul 14, 2025 07:09 (IST)

Live Update : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आज पासून सुरुवात

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. पाहिल्याचं आठवड्यात दोन्ही सभागृहात काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. विधानसभेत एक विशेष विधेयक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात आहे... निवडणूका न झाल्यामुळे विकासकाम राखडल्याचे अनेक आमदारांच्या तक्रारी आहेत... तर परिषदेत निधी न मिळाल्याची व्यथा थेट सभागृहात आमदार मांडणार आहेत. त्याच बरोबर धर्मांतर, गो हत्या या काही महत्वाच्या लक्षवेधी आहेत... त्यावरून सभागृहात गोंधळ होऊ शकतो

Jul 14, 2025 07:08 (IST)

Live Update : खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची संघटन बैठक

जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक रचना करण्यासाठी खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून संजय राऊत यांच्या दौऱ्यापूर्वी जळगाव मध्ये शिवसेना ठाकरे गटाची बैठक घेण्यात आली या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ व माजी खासदार उन्मेष पाटील यांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीत पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान संजय राऊत यांच्या दौऱ्यापूर्वी संघटन बांधणीवर चर्चा करण्यात आली.

Jul 14, 2025 07:03 (IST)

Live Update : उत्तरेत आज श्रावणातला पहिला सोमवार, हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

उत्तरेत आज श्रावणातला पहिला सोमवार, हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, तर मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

Jul 14, 2025 07:03 (IST)

Live Update : राज्यातील सर्व बार आणि रेस्टॉरंट आज बंद

राज्यातील सर्व बार आणि रेस्टॉरंट आज बंद, उत्पन्न शुल्कात 60 टक्के वाढ केल्याने बार चालकांचा विरोध, सरकारचा नवे मद्यविक्री परवाने देण्याच्या निर्णयाविरोधात संप