
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्याच्या पावसाळी अधिवेशात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या, लाडकी बहीण तसेच शक्तीपीठ महामार्गावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सभागृहात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात, याकडे विरोधकांनी लक्ष वेधले. यावेळ बोलताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गरीश महाजन यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
LIVE Updates: शेतकरी आत्महत्येवरुन घमासान, विरोधकांचा सभात्याग
हिंगणघाट येथील भाजप आमदार समीर कुणावर यांनी वीज पडून होणाऱ्या मृत्यूंची चिंताजनक आकडेवारी मांडली. तसेच वीज पडणार असल्याची सूचना देणारी यंत्रणा कसं काम करते? याबाबतही प्रश्न विचारला. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी "दामिनी आणि सचेत अॅप 40 किमीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना मिळत असते. त्याबद्दलचा प्रचार प्रसार आम्ही करत आहोत. इतर राष्ट्रांत प्रगत तंत्रज्ञान आहे का, याबद्दलची आम्ही माहिती घेतली. पण अजून तशी अॅडव्हान्स तंत्रज्ञान नाही," असं उत्तर दिले.
यावरुनच बोलताना भास्कर जाधव यांनी वीज पडून मृत्यू झाल्यानंतर मदतीची रक्कम वाढवण्यावरुन सवाल केले. दगावला, अपंग झाला तर गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत आपण मदत करतो. ही मदत माणसांना मिळते, जनावरांना मिळत नाही. मदतीची रक्कम 2 लाखांवरून वाढवाल का ? जनावरांनाही नुकसान भरपाई मिळेल का ? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.
Thane News: कान धरले, पाया पडून माफी मागितली, मराठी तरुणाला मारणाऱ्या परप्रांतीयाचा माज उतरला!
मी कोंबडी खात नाही...
यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी "मृत व्यक्तींना आता 4 लाख मदत देतो, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये देतो. मोठ्या जनावरांसाठी 37500 रुपये देतो, शेळी मेंढीला ४ हजार रुपये देतो. कोंबडीला 100 रुपयेच आहे. असे सांगत असतानाच मी कोंबडी खात नाही, त्यामुळे मला कोंबडीचे भाव माहिती नाहीत," अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world