Maharashtra Assembly Monsoon Session: वीज पडून मृत्यू झालेल्यांना 10 लाखांची मदत द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी

Vijay Wadettiwar On Death Due To Lightning: ज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरले आहे. आजच्या कामकाजादरम्यान राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

Maharashtra Assembly Session LIVE Updates: शेतकरी आत्महत्येवरुन घमासान, विरोधकांचा सभात्याग

विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी 10 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. वाघाने हल्ला केल्यावर 25 लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन मध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. तसेच महाराष्ट्रात वीज पडून वर्ष 2022 मध्ये 236 मृत्यू झाले आहेत तर वर्ष 2023 मध्ये 181 इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले.

Maharashtra Assembly Monsoon Session: 'मी कोंबडी खात नाही...', गिरीश महाजनांच्या उत्तरावर सभागृहात हशा

वाघावर कुणाचा कंट्रोल?

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वीज पडून मृत्यू होणे ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यात कुणाचा कंट्रोल नाही. पण वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होत असेल तर त्यामध्ये मानवी हस्तक्षेप आहे, यावरुनच मदत ठरवली जाईल, असं नमूद केले. यावर भास्कर जाधव यानी मग वाघावर कुणाचा कंट्रोल आहे? असा सवाल केला. त्यावर राहुल नार्वेकरांनीही वाघावर कंट्रोल कुणाचा? हे अद्याप स्पष्ट झालं नाही, असं उत्तर दिले. 

Advertisement