4 months ago
नागपूर:

Maharashtra assembly winter session 2024 : आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरत आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी विधानभवनात आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याशिवाय मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते. ते नागपुरातून नाशिकला परतले असून पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Dec 16, 2024 22:44 (IST)

Live Update : खोटे गुन्हे दाखल झाल्याने वाकोडेंचा मृत्यू, सुषमा अंधारेंचा मोठा आरोप

परभणी जाळपोळ प्रकरणांमध्ये 65 वर्षीय विजय वाकोडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. 

हा सगळा तणाव सहन न झाल्याने रक्तदाब वाढून विजय दादा वाकोडे यांचं निधन झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. .

Dec 16, 2024 21:59 (IST)

Live Update : सोलापुरात अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक

सोलापुरात अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक 

तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर

सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक येथे घडली घटना 

एसटी बससेवा पोलिसांच्या बंदोबस्तात सुरळीत सुरू  

दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू 

दगडफेक करण्याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही

Dec 16, 2024 20:13 (IST)

Live Update : अधिवेशनाला पुन्हा जाणार नाही, नागपुरातून भुजबळ परतले

नागपूरातून छगन भुजबळ परतले असून नुकतेच नाशिकला दाखल झाले आहेत. समर्थकांंसोबत बैठक घेऊन उद्या आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अधिवेशनाला पुन्हा जाणार नाही असे देखील त्यांनी माध्यमांना सांगितले 

Dec 16, 2024 18:07 (IST)

Live Update : पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा संशयास्पद मृत्यू, आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने

परभणी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली ही काढण्यात आली. 

Advertisement
Dec 16, 2024 17:40 (IST)

Live Update : कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 8 जणांनी गमावला जीव

9 डिसेंबरला झालेल्या अपघातानंतर 52 वर्षीय फझलू रेहमान यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानुसार आतापर्यंत 8 जणांनी बेस्ट बस अपघातात जीव गमावला आहे. 

Dec 16, 2024 16:56 (IST)

Live Update : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक-बसचा अपघात

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक-बसचा अपघात

सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही. बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याची माहिती..

Advertisement
Dec 16, 2024 15:35 (IST)

Live Update : अभिनेत्री कतरिना कैफ शिर्डीत साईंच्या दरबारी..

अभिनेत्री कतरिना कैफ शिर्डीत साईंच्या दरबारी..


Dec 16, 2024 15:32 (IST)

Live Update : परभणीतील घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहर बंद, बससेवाही करण्यात आली बंद

परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या अवमान घटनेच्या निषेधार्थ व निषेध व्यक्त करण्यासाठी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत असताना आंबेडकरी अनुयायी सोमाणठ सुर्यवंशी यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज उमरगा शहर बंदची हाक देण्यात आली असून त्यामुळे उमरगा शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बससेवा देखील बंद करण्यात आली आहे.

Advertisement
Dec 16, 2024 15:30 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसणार

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसणार 

उद्या पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करणार 

राज्यात सत्ता स्थापन होताच जरांगे पुन्हा मराठा आरक्षणाची लढाई सुरू करणार 

अधिवेशनाच्या तोंडावर जरांगे मराठा आरक्षण आंदोलन सुरू करणार

Dec 16, 2024 14:24 (IST)

Parbhani News: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर आंबेडकर समाज आक्रमक

परभणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समरकाजवल असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केले होते. यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि आंबेडकर समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले...

सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होतात महाराष्ट्रावर ठिकाणी आज बंदची हाक देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व पक्षीय आंबेडकरी समाजाच्या तरुणांनी एकत्र येत धुळे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारका जवळ येऊन राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व या मृत्यूला जे पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत शासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली...

Dec 16, 2024 13:22 (IST)

Raj Thackeray on zakir hussain: 'तबल्यातील तालयोगी...', झाकीर हुसैन यांच्या निधनाने राज ठाकरे हळहळले

जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की  वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील 'तालयोगी' होते असं मला नेहमी वाटत राहिलं. 

असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच. 

वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं, आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, 'शक्ती' बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली. 

प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐकू येणं आणि त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल.  उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

Dec 16, 2024 11:56 (IST)

Chhagan Bhujbal News:मंत्रिपदापासून डावलले, छगन भुजबळ समर्थकांनी नागपूर - पुणे महामार्ग रोखला!

ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून सिंदखेडराजा येथे ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर पुणे या महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निषेध करत सिंदखेडराजा येथे मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला आहे. 

Dec 16, 2024 11:39 (IST)

Chhagan Bhujbal: 'होय मी नाराज..', छगन भुजबळांनी खदखद मांडली, मोठा निर्णय घेणार?

राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी पक्षाच्या बैठकीलाही हजर  न राहिल्याने छगन भुजबळ हे नाराजी उघड झाली होती.  त्यामुळे ते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी होय मी नाराज आहे, काहीही बोलणार नाही, असं उत्तर दिले. तसेच तुम्ही वरिष्ठांशी याबाबत बोलला आहात का? या प्रश्नावर त्यांनी कोण वरिष्ठ? असे म्हणत संताप व्यक्त केला.  दुसरीकडे, छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकरल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर समर्थकांची बैठक सुरू असून बैठकीत पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Dec 16, 2024 11:16 (IST)

परभणी, बीडच्या घटना गंभीर, सरकारने उत्तरे द्यावीत: नाना पटोलेंची मागणी

यावेळी नाना पटोले यांनी बीडमध्ये झालेली सरपंचांची हत्या, परभणीमधील हिंसाचारवर चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष आजच्या सत्रात याबाबत चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर नाना पटोलेंनी पुन्हा एकदा या अत्यंत गंभीर घटना असल्याने  सरकारने उत्तरे द्यायची तयारी दाखवावी, असं नाना पटोले म्हणाले.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत चर्चा करण्याची सरकारची भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षांनी वेळ द्यावा, त्यावेळी सविस्तर चर्चा होईल, असं उत्तर दिले आहे. 

Dec 16, 2024 11:06 (IST)

Winter Session 2024: विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात, CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांचा परिचय

विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सर्व नेत्यांची ओळख करुन दिली. त्यानंतर उदय सामंत यांनी पुरवण्या मागण्या सादर केल्या. वित्त मंत्री पुरवणी मागण्या सादर करत असतात. खातेवाटप न झाल्या मुळे सीएम यांनी सामंत यांना पुरवणी मागण्या सादर करायला सांगितले.

Dec 16, 2024 10:58 (IST)

Supriya Sule: 'हे राज्याला न शोभणारं, अस्वस्थ करणारं..', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

'एवढ मोठ बहुमत दिलं असून देखील राज्याला गृहमंत्री नाही. एवढं मोठं यश मिळालं ते आनंद साजरा करून तुम्ही कामाला लागायला पाहिजे होते. सर्व चॅनलवर नेत्यांचे रुसवे फुगवे पाहत आहे. सत्तेत येऊन ३ आठवडे झाले पण खाते वाटप नाहीत.  महाराष्ट्रात अस का होत आहे? हे राज्याला न शोभणार आणि अस्वस्थ करणार आहे,' असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Dec 16, 2024 10:48 (IST)

Maharashtra Winter Session: 'ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा', अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरत आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी विधानभवनात आंदोलन सुरु केले आहे. ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. 

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक होत प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची प्रतिकृती हातात घेऊन ईव्हीएम सरकार विरोधात लोकशाही वाचवा, ईव्हीएम हटवा,ईव्हीएम हटवा, देश वाचवा अशा जोरदार घोषणाबाजी केल्या.

Dec 16, 2024 10:43 (IST)

Gulabrao Patil: तिघांची माय अन् खाटेवर जीव जाय..; गुलाबराव पाटील यांचा मविआला टोला

गेल्या सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक वर्ष जाईल. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न या मंत्रिमंडळात मार्गी लावू. विरोधकांची परिस्थिती तिघांची माय आणि खाटेवर जीव जाय अशी झाली आहे. विरोधी पक्षांमध्ये असणाऱ्या तीन जणांची तोंड तीन दिशेने आहेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 

Dec 16, 2024 10:40 (IST)

Datta Bharne News: कुठलेही खाते मिळाले तर त्याला न्याय देणार: दत्ता भरणे

 जनतेच्या समस्या दूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. अडीच वर्षाच्या कामाचे ऑडिट केले जाणार,जे चांगले काम करतात त्यांना शाबासकी मिळाली पाहिजे. भुजबळ नाराज नाहीत. ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत,वरिष्ठ त्याबाबत योग्य निर्णय घेतील. भुजबळ बाबत वरिष्ठांचा निर्णय आहे, त्याबाबत मला फारशी माहिती नाही. कुठलेही खात्याची अपेक्षा व्यक्त केली नाही,कुठलेही खाते मिळाली तर त्याला न्याय देणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. 

Dec 16, 2024 10:37 (IST)

Supriya Sule: बहुमत दिले असताना काम कधी सुरु होणार? सुप्रिया सुळेंचा सवाल

देशासमोर, राज्यासमोर मोठी आव्हाने आहेत. बेरोजगारी, महागाईसोबतच सरकारने बीड, परभणीमधील घटनांकडे लक्ष द्यावे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी या सर्व मुद्द्यांकडे लक्ष द्यावे. बीडमधील घटना आणि परभणीतील कोठडीत मृत्यूची घटना ही धक्कादायक बाब आहे. राज्याला गृहमंत्री नाही. नागपुरमध्ये रुसवे- फुगवे सुरु आहेत. एवढे मोठं बहुमत दिले असताना काम कधी सुरु होणार? या अपक्षेत माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्र आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. 

Dec 16, 2024 10:15 (IST)

Ichalkaranji News: रेबीज लस उपलब्ध नसल्याचे रुग्णाला परत पाठवले, इचलकरंजीमधील प्रकार

इचलकरंजी मधील रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर 

कुत्रा चावलेल्या रुग्णाला रेबीज लस उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठवल्याचा प्रकार 

इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील घटना 

युवा महाराष्ट्र सेनेकडून जाब विचारल्यानंतर लस उपलब्ध केल्याची माहिती 

अधीक्षकांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Dec 16, 2024 10:11 (IST)

Sanjay Raut: हे बिनखात्याचे सरकार..., संजय राऊतांची टीका

हे बिनखात्याच सरकार आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे कोणती खाती आहेत ते ते सांगू शकत नाहीत.  अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे का हे त्यांना माहीत नाही.  एकनाथ शिंदे यांच्या बाबत तर सगळी बोंब आहे.  40 जणांनी काल शपथ घेतली. अधिवेशन सुरू आहे. कोणी कोणत्या खात्याची उत्तर द्यायची याची माहिती नाही की सगळी उत्तरं फडणवीस देणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बाबत राज्यात प्रश्न आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. 

Dec 16, 2024 10:05 (IST)

Hingoli News: परभणीतील घटनेच्या निषेधार्थ वसमत शहर बंदची हाक

परभणीत न्यायालय कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या संविधानवादी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याने संविधान वादी आंबेडकरवादी घटना आणि पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर आज बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला वसमत शहरातील व्यापारी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहे. या बंद वेळी वसमत पोलिसांकडून अनुचित प्रकार टाळण्यासाठी  बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे..

Dec 16, 2024 10:04 (IST)

Meghana Bardikar: 'आजचा दिवस आनंदाचा: मंत्री मेघना बोर्डीकर

आज मंत्री म्हणून पहिला दिवस आहे. आनंद आहे. महिलांवर विश्वास ठेवून काम करण्याची संधी आमच्या नेत्रुत्वाने दिली. परभणीतील घटना चुकीची. पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ज्याचा मृत्यू झाला आहे तो हार्ट अटॅक ने त्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आहे

आजचा बंद आहे उद्या पासून सर्व पुर्वपदावर येईल. लोकानी कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे. असा उद्रेक लोकांनी करू नये सर्वांनी शांतता राखावी, अशी प्रतिक्रिया मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. 

Dec 16, 2024 09:55 (IST)

Virar RTO Office Fire: विरार आरटीओ कार्यालय परिसरात भीषण आग, 2 बस जळून खाक

विरार पूर्व येथील चंदनसार रोडवरील आरटीओ कार्यालयाच्या आवारात ठेवलेल्या दोन बसेसला पहाटे  2.30 वाजाल्याच्या सुमारास भीषण आग लागली, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान माहिती मिळताच पोहोचले आणि त्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत  आगीत परिसरातील दोन बस जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या  आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा कार्यालयाची हानी झालेली नाही.

Dec 16, 2024 09:10 (IST)

Latur Crime: चंदनाची तस्करांच्या वाहनाचा पाठलाग करून 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,दोन जण ताब्यात

लातूरच्या औसा इथ चोरट्या मार्गाने चंदनाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून 1 क्विंटल 52 किलो चंदनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे... यावेळी बारा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय... सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून एका स्कार्पियो मध्ये चंदनाच्या झाडाची तोड करून ती औशाकडे चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीची खातरजमा करून लातूर येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस पथकाने सापळा लावला दरम्यान बार्शी कडून औश्याकडे सुसाट जाणाऱ्या पांढरा रंगाच्या वाहनाचा पाठलाग पोलीस पथकाने केला.. हे स्कार्पिओ वाहन औश्यानाजिक पकडण्यात आले.. यावेळी एक क्विंटल 52 किलो चंदनाच्या गोन्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस करत आहेत .

Dec 16, 2024 09:07 (IST)

Latur Band: परभणी घटनेच्या निषेधार्थ लातूर बंदची दिली हाक

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली आहे. तसेच न्यायालयीन कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे. त्या निषेधार्थ लातूर शहरामधील आंबेडकरी व संविधानवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज  सकाळपासूनच भंते पय्यानंद यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण दिवस लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी, शाळा महाविद्यालयाचे प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी यांनी दैनंदिन व्यापार बंद ठेवून बंदला सहकार्य करावे असे आवाहन समस्त लातूर आंबेडकरवादी आणि संविधानवादी पक्ष संघटनेच्या वतीने  करण्यात आले आहे

Dec 16, 2024 07:59 (IST)

Accident News: मुर्तीजापूर- कारंजा टी पॉइंट उडान पुलावर ट्रकला मालवाहूची धडक, चालक जखमी

अकोल्यात मुर्तीजापुर कारंजा रोडवर  ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम ८०५० ने नागपूरकडे जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५३ कारंजा टी पॉइंट उडान पुलावर शनिवारी रात्री ट्रकला पाठीमागून मालवाहू बोलोरो पिकप क्रमांक एमएच १९ सी वाय ८६७७ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजी व भरधाव वेगाने चालून पाठीमागून धडक दिली. धडकेत बोलोरो मधील पुंडलिक फतरु भोईला जबर मार लागल्याने जखमी झाले. अपघातात बोलोरो वाहनाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

Dec 16, 2024 07:53 (IST)

Kurla Bus Accident: कुर्ला बेस्ट अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क, मद्यपी चालकांवर बडगा

कुर्ला बेस्ट अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क

मद्यपी चालकांवर बडगा

एका रात्रीत 70 जणांची धरपकड

6369 वाहनांची झाडाझडती तर 1831 चालकांवर दंडात्मक कारवाई

मुंबईत मांडणाऱ्या अपघाती वृत्तीची गंभीर दखल घेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची शनिवारपासून विशेष मोहीम 

आगामी नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई म्हणजे एक इशारा असल्याचे म्हटले जात आहे  

मध्य रात्री बारा वाजल्यापासून सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने पहाटे पाच पर्यंत गुन्हे घडण्याच्या संभाव्य 107 ठिकाणी नाकाबंदी

Dec 16, 2024 07:48 (IST)

Live Updates: प्रसिद्ध व्यायसायिकाने दुकानात संपवले आयुष्य

देसाईगंज  येथील प्रसिद्ध फर्निचर व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेत केली आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून उमेश माधव शिंगाडे वय (४५) रा. गांधीवॉर्ड, देसाईगंज असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे.

उमेश शिंगाडे यांनी आपल्या घरापासूनच जवळपास ३०० मीटर अंतरावर भाड्याच्या खोलीत फर्निचरचे दुकान थाटलेले होते नेहमीप्रमाणे रविवारीसुद्धा फर्निचरचे दुकान उघडले. सकाळपासूनच ते दुकानातच होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास काही व्यक्ती त्यांच्या दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी आले; मात्र ते दिसले नाहीत. तेव्हा आतमध्ये जाऊन पाहिले असता तीन क्रमांकाच्या शेवटच्या खोलीतील सिलिंगला असलेल्या लोखंडी रॉडला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत ते आढळले. त्यानंतर देसाईगंज पोलिस स्टेशनला माहिती देण्यात  आली पोलिसांनी पंचनामा करुन  उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात  पाठवले. परंतू आत्महत्या चे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढिल तपास पोलिस करीत आहेत

Dec 16, 2024 07:45 (IST)

Gadchiroli News: नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला; पुरुन ठेवलेली स्फोटके जप्त

नक्षल्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने  जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना आज यश आलं आहे. अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत करंचा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून नष्ट करण्यात आली.

नक्षल्यांनी एका प्लॉस्टिक ड्रममध्ये स्फोटके दडवून ठेवल्याची  गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात मरपल्ली पोलिस मदत केंद्रातील पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी आज त्या परिसरात शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांना ड्रममध्ये स्फोटके आढळून आली. त्यात दोन किलो आयईडी स्फोटके, तीन वायर बंडल, एक बॅटरी, एक डिटोनेटर इत्यादी साहित्य होते. पोलिसांनी अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील बॉम्ब शोधक पथकास पाचारण करुन त्यांच्या मदतीने स्फोटके नष्ट केली.

Dec 16, 2024 07:43 (IST)

धाराशिवमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान,

गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, तीन दिवसापासून वातावरणात गारठा अत्यंत वाढला आहे. रविवारी कमाल तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे वापरात आणत आहेत. त्यामुळे वातावरणात गारठा वाढला होता. थंडीमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, दम्याच्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक स्वेटर, जर्किंग, मफलर, कानपट्टी अशा उबदार कपड्यांचा वापर होत आहे. शिवाय ग्रामीण भागात शेकोटीचा आधारही घेतला जात आहे.

Dec 16, 2024 07:41 (IST)

Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण अपघात, दुचाकीने सायकलस्वाराला चिरडले

 भंडारा शहरातील बस स्थानकावर लागत असलेल्या शिवाजी स्टेडियम समोरील मार्गावर एका भरधाव दुचकी स्वाराने एका सायकल स्वाराला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की सायकल स्वार राजू जगन्नाथ कोहाड वय वर्ष 50 यांचा जागीची मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली आहे.

Dec 16, 2024 07:40 (IST)

Jalgaon News: जळगाव मध्ये उत्तर प्रदेशातील बटाट्यांना मागणी

जळगाव मध्ये उत्तर प्रदेशातील बटाट्यांची मागणी वाढली असून उत्तर प्रदेशातील बटाटा हा उच्च दर्जाचा व टिकाऊ असल्याने व्यापारी विक्रेत्यांसह ग्राहकांकडूनही या बटाट्यांची मागणी होत आहे दरम्यान सद्यस्थितीत जळगाव बाजार समिती मध्य प्रदेश राजस्थान व उत्तर प्रदेशातून बटाट्याची आवक होत असून इतर राज्यातून बटाट्यांची आवक वाढल्याने बटाट्याचे दर हे आवक्यात आले असून सद्यस्थितीत किरकोळ बाजारात बटाट्याचे दर 35 ते 40 रू आहेत.

Dec 16, 2024 07:35 (IST)

Ravi Rana News: मंत्रिपद मिळालं नसल्याने रवी राणा नागपूरवरून अमरावतीत दाखल

अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रीपद नाही..

 रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने  रवी राणा नागपूर वरून अमरावतीत दाखल.. 

 आमदार रवि राणाना यांनी मंत्री पदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली होती,  मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याने रवी राणा नागपूरवरून नाराज होत अमरावतीत.. 

 नागपुरात अधिवेशन असताना  आमदार रवी राणा मात्र अमरावती..

रवी राणा यांना मंत्री मंडळात स्थान न देणे हे अमरावती जिल्ह्याचे दुर्भाग्य, अशाप्रकारे ग्राफिक्स वायरल..