भर थंडीत राजकारण तापणार! हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणते मुद्दे गाजणार?

एकीकडे सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत तर दुसरीकडे विरोधकडांना विरोधी पक्षनेताही मिळणार नसल्याची स्थिती असल्याने हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सोमवार 16 डिसेंबरपासून 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन पार पडणार आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत तर दुसरीकडे विरोधकडांना विरोधी पक्षनेताही मिळणार नसल्याची स्थिती असल्याने हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार आहे. कसं असेल अधिवेशनाचे कामकाज? कोणते मुद्दे गाजणार अन् कशावरुन खडाजंगी होणार? जाणून घ्या सविस्तर...

विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने मुख्यमंत्रीपदी बसलेले देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह तब्बल 235 हून आमदारांचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असेल त्यामुळे अवघ्या 46 जागा मिळवलेल्या महाविकास आघाडीला सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोणते मुद्दे गाजणार?

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 20 विधेयकांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर  महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा व श्री. दिनकरराव भाऊसाहेब जाधव, जी वि.स.स. यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्याचबरोबर ईव्हीएमचा मुद्दा, सोयाबीनचे पडलेले दर, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण, मंदिरांना नोटीसा, परभणी हिंसाचार तसेच राज्यातील गुन्हेगारी घटनांवरुनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

ही विधेयके मांडली जाणार?

(1) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक, 2024
(2) सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२४
(3) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 - श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) विधेयक, २०२४

(नक्की वाचा- "गांधी कुटुंबाने माझी कारकिर्द घडवली आणि बिघडवलीही", मणिशंकर अय्यर यांचं खळबळजनक वक्तव्य)
(4) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 - महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) विधेयक, २०२४
(5) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 - महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2024

Advertisement

(6) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 - महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2024
(7) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 - महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयक, २०२४
(8) सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 - हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४
क प्रस्ताव