जाहिरात

Winter Session: नवं सरकार, नवं रुप! CM फडणवीस, अजित पवार अन् बिनखात्याचे मंत्री; हिवाळी अधिवेशनातील 10 खास गोष्टी

  या हिवाळी अधिवेशनात छगन भुजबळांच्या नाराजीसह परभणी, बीड या दोन घटना प्रामुख्याने विषय गाजला. वाचा नागपूर हिवाळी अधिवेशन यंदाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Winter Session: नवं सरकार, नवं रुप! CM फडणवीस, अजित पवार अन् बिनखात्याचे मंत्री; हिवाळी अधिवेशनातील 10 खास गोष्टी
नागपूर:

सागर कुलकर्णी

गेल्या एक आठवड्यापासून सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन अनेक कारणांनी खास ठरले. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडे असलेला बहुमत आवाज आणि दुसरीकडे  विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदही नव्हते. त्यामुळेच या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.  या हिवाळी अधिवेशनात छगन भुजबळांच्या नाराजीसह परभणी, बीड या दोन घटना प्रामुख्याने विषय गाजला. वाचा नागपूर हिवाळी अधिवेशन यंदाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी: 

  1. यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघ्या एका आठवड्याचे होते. 
  2. नागपूरमध्ये अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाले पण खातेवाटप शेवटच्या दिवसापर्यंत झालेच नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणूनच गणले गेले.
  3. विरोधी पक्षनेत्याशिवाय नागपूरचे हिवाळी अधिवेशन दिसून आले. भास्कर जाधव शेवटपर्यंत विरोधी पक्ष नेतेपद पदरात पडावे म्हणून प्रयत्न करत राहिले पण ते शक्य झाले नाही. 
  4. विरोधी पक्ष नेते नाही म्हणून विरोधक टीका करत होते तर दुसरीकडे काँग्रेसचा विधिमंडळ घटनेचा अधिवेशन संपेपर्यंत नियुक्त केला गेला नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्यामधील अंतर्गत स्पर्धाच कायम राहिली.
  5. कॅबिनेट विस्तारमध्ये स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नाराजी अजित पवार वर टीका सत्ताधारी बाकावर चर्चेचा विषय झाला तर भाजप शिवसेनेत अनेक इच्छुक आमदारांची मंत्रिपदावर वरली नाही यामुळे हिवाळी अधिवेशन त्यांच्यासाठी गुलाबी थंडी आणणारे ठरले नाही.
  6. छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर टीका खूप केली पण अजित पवारांनी संयम दाखवत भुजबळांच्या विरोधात एकही भाष्य अद्यापपर्यंत केले नाही. रोखठोक प्रतिमा असणारे अजित पवार स्वतःची कार्यपद्धती बदलताना दिसत आहेत, विनाकारण वाद सुरू असताना वक्तव्य न करता शांत राहत वेळ निभावून नेण्याची अनोखी पद्धत अजित पवारांची देखील चर्चेचा विषय ठरला.
  7. कट्टर राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळाची भेट चर्चेचा विषय झाला. ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेत गुरुदीप पक्षनेते पदाची मागणी केली, पण ही भेट राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगत आणली.
  8. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांमध्ये अंतर्गत समन्वयाचा अभाव दिसून आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील रोहित पवारांसारखे अनेक नेते पहिले दोन दिवस उपस्थित नव्हते तर संपूर्ण अधिवेशनात फारसा काही प्रभाव नाही, आक्रमक भूमिका देखील नाही.
  9. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून भास्कर जाधव, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी विरोधक म्हणून बऱ्यापैकी सरकारवर टीकेची झोड लगावली.
  10. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचे विषय ठरले. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मीक कराड यांच्यावरुन खूप टीका झाली. पण मुंडेंची कॅबिनेटमध्ये वर्णी तर लागलीच दुसरीकडे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षिक त्या मदती करत जे संकेत द्यायचे ते दिले,
  11. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा या अधिवेशनात सुरू केली आहे. सभागृहांमध्ये आधी अधिक आक्रमक भाषण न करता यंदा संयम संतुलित ठेवत सत्ताधारी  तसेच विरोधी बाकांवरील आमदारांना सूचक इशारा देखील दिले. मुख्यमंत्री म्हणून यंदाची वेगळी टर्म तिसरी असणार आहे हे देखील संकेत दिले गेले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com