जाहिरात

Aurangzeb Tomb: कबर, मकबरा, थडगं.....काय म्हणतो इतिहास? 12व्या शतकातील प्रथेची आजही चर्चा का?

Maharashtra Aurangzeb Tomb Controversy: पण ती ऐतिहासिक, कलात्मक महत्त्व असलेला रचनात्मक स्थापत्याचा नमुना असते. कबर साधारणतः एक साधी समाधी असते, तर मकबरा एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक असतो.

Aurangzeb Tomb: कबर, मकबरा, थडगं.....काय म्हणतो इतिहास?  12व्या शतकातील प्रथेची आजही चर्चा का?

अविनाश पाटील, प्रतिनिधी: भारतीय इतिहासातल सर्वात क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाची कबर सध्या चर्चेत आहे. देशभरात गाजत असलेल्या ह्या मुद्द्याने हिंसक वळण घेतल्याचे देखील पहायला मिळत आहे. नागपूरचा हिंसाचार असो वा राज्यभरात निघणारे निदर्शने, आंदोलने या सर्व प्रयोजनामुळे समाजातल्या दोन समूहांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मुघल शासकांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या वर्तनाची ही वर्तमान भयावह स्थिती उभी ठाकली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या कबरीचा वाद फक्त सामाजिक आणि राजकीय नसून वैचारिक सुद्धा आहे. अलीकडे सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनद्वारे आपल्या कर्णपटलावर आदळत असलेले शब्द कबर, मकबरा आणि थडगं यांचा नक्की इतिहासकालीन संदर्भ काय? हे समजून घेतले पाहिजे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मकबरा किंवा समाधीची संकल्पना भारतात इस्लामच्या आगमनानंतर अधिक प्रचलित झाली. इ.स. 12व्या शतकात दिल्लीच्या गुलाम वंशाच्या सुलतानांनी आणि त्यानंतर मुघल साम्राज्याने याचा वापर करण्यास प्रारंभ केला. मुघल सम्राट अकबर, शाहजहाँ आणि इतर प्रमुख शासकांनी या स्थापत्यकलेला महत्त्व दिले. त्यामध्ये शाहजहाँचा 'ताज महल' हा सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. मकबरा ही एक भव्य स्थापत्य कला आहे, जी मुख्यतः मुघल साम्राज्याच्या काळात प्रचलित झाली. मकबरे हे दफनासाठी किंवा समाधी स्थानांसाठी असतात, आणि ते मृत व्यक्तीला आदर देण्यासाठी आणि स्मरण ठेवण्यासाठी बांधले जातात. मुघल साम्राज्याने या स्थापत्य कलेला उच्च शिखरावर पोहोचवले.

कबर आणि मकबरा यात फरक काय?

कबर आणि मकबरा हे दोन्ही शब्द मृत्यू आणि समाधीच्या संदर्भात वापरले जातात, पण त्यामध्ये काही फरक आहे. "कबर" हा अरबी शब्द आहे, जो साधारणपणे एका व्यक्तीच्या समशीत कबर किंवा समाधी बाबत वापरला जातो. कबर म्हणजे सामान्यतः एक साधी समाधी, जिथे मृत व्यक्तीचे शव दफन केले जाते. हे साधारणतः छोट्या प्रमाणात आणि साध्या पद्धतीने असते. कबर म्हणजे मृत व्यक्तीच्या शवस्मारकाचा साधा, छोटा रूप. मकबरा हा शब्द अधिक भव्य आणि स्थापत्यकलेशी संबंधित आहे. हे एक भव्य स्मारक असते, जे शासक किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या समाधीचे प्रतीक म्हणून बांधले जाते. मकबरे प्रामुख्याने सजावटीला, स्थापत्यशास्त्राला आणि शिल्पकलेला महत्त्व देणारे असतात. मकबरा हा एक स्मारक म्हणून बांधलेला असतो, ज्यामध्ये कबर असू शकते, पण ती ऐतिहासिक, कलात्मक महत्त्व असलेला रचनात्मक स्थापत्याचा नमुना असते. कबर साधारणतः एक साधी समाधी असते, तर मकबरा एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक असतो.

ट्रेंडिंग बातमी - Narayan Rane: नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे 2 फोन, चर्चा काय झाली? राणेंनी सविस्तर सांगितलं

कबरीला...थडगं का म्हटलं जातं?

मराठीच्या देहाती किंवा ग्रामीण बोलीतला शब्द म्हणजे थडगं होय. शवाच्या दफनस्थळाला मराठीत "थडगं" असं म्हटलं जातं. हा शब्द ग्रामीण भागात वापरला जातो, तर "कबरी" हा शब्द अधिक अरबी किंवा इस्लामी संदर्भात वापरला जातो. त्यामुळे, कबरीला मराठीत थडगं असे म्हटले जातात. थडगं म्हणजे मृत व्यक्तीच्या शवाचे दफन करण्यासाठी एक साधारण पद्धतीने तयार केलेले ठिकाण. ते एक प्रकारचे स्मारक असते, ज्यामध्ये दगड, विटा किंवा इतर साधे बांधकाम असू शकते. थडगं साधारणतः छोट्या आकाराचे असतात आणि ते मुख्यतः धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात.

प्रसिद्ध मुघल मकबरे:

ताज महल (शाहजहाँच्या पत्नी मुमताज महलसाठी) - हे जगातील एक अत्यंत प्रसिद्ध मकबरा आहे आणि भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम उदाहरण आहे.

हुमायूनचा मकबरा (दिल्ली) - हुमायूनच्या स्मरणार्थ बांधलेले, ज्याने मुघल स्थापत्यकलेला प्रारंभ दिला.

अकबरचे मकबरे (सिकंदरा) - अकबरच्या दफनासाठी बनवलेले, जिथे मुघल स्थापत्यशास्त्राच्या विविध शैलींचा समावेश आहे.

इतिहास अभ्यासक डॉ. अमर आडके यांच्या मते कबर, थडगे आणि मकबरा हे तीनही मृत्युंनंतर बांधले जाणारे स्मृतीचिन्ह. पण यामध्ये मकबरा हा पूर्णतहा वेगळा म्हंटल तरी चालेल. पण कबर आणि थडगे यामध्ये थोडंफार साधर्म दिसतं. एखाद्या कबरीवर बांधलेलं विशिष्ट बांधकाम म्हणजे मकबरा. देशभरात मकबराची अनेक उदाहरणे आहेत. ज्यामध्ये विजापूर, बीबी का मकबरा अशी अनेक स्मृतीस्थळ आहेत.

यामध्ये वेगळेपण आढळून येतं. पण कबर आणि थडगे हे काही प्रमाणात एकाच रचनेचे पाहायला मिळतात. थडगे हा बोली भाषेत बोलला जातो. दोन्हीमध्ये अस्थी असतात आणि हे दफनभूमी म्हणूनच ओळखलं जात. तर थडगे हे सुद्धा दफनभूमी म्हटल तर वेगळं ठरणार नाही.. पण दोन्हीमध्ये पाहायला गेलं तरी अस्थीच असतात. कबर आणि थडगे यामध्ये व्यावहारिक अर्थामध्ये यात फरक नाही. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर दफनस्थळावर कबर बांधली जाते आणि विशेष एखादी व्यक्ती असेल तर एखाद बांधकाम बांधलं जातं त्याला मकबरा म्हटलं जातं.  

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय ठरलं होतं? सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, महायुतीत वाद पेटणार?