Maharashtra HSC 12th Result LIVE Updates: राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची धाकधूक आता संपली असून, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा ऑफलाईन निकाल जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणे निकालामध्ये यंदाही मुलींचा बोलबाला पाहायला मिळाला असून कोकण विभागाने ९४.१४ टक्के निकाल लावत बाजी मारली आहे तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. राज्याचा निकाल राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखा : ८६.४४%, कला: ७८.०२%, वाणिज्य: ८७.०३%, व्यवसाय अभ्यासक्रम: ८२.७४%, आय.टी.आय.: ८३.७८% असा विभाग निहाय निकाल लागला आहे.
HSC Result LIVE: बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कसा कुठे पाहाल? वाचा लाईव्ह अपडेट्स
इयत्ता बारावी निकालाची ठळक वैशिष्ट्ये
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विदयार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी ८९.७९ आहे.
२. खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ एवढी असून त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी ८०.२१ आहे.
३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ५०,८७६ पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.४४ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ८,४४६ दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३६७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.५८ आहे.
HSC Result 2026 Today: बारावीचा आज दुपारी 1 वाजता लागणार निकाल! 'या' अधिकृत वेबसाइटवर पाहा तुमचे गुण
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाचत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९४.१४ %) सर्वाधिक असून सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (८४.१४%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.८०% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५% ने जास्त आहे.
८. एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १००% आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world