जाहिरात

HSC Result 2026 Today: बारावीचा आज दुपारी 1 वाजता लागणार निकाल! 'या' अधिकृत वेबसाइटवर पाहा तुमचे गुण

Maharashtra Board HSC Result 2026 Today: हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) १२ वीचा निकाल आज, 2 मे 2026 रोजी जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता निकालाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर सक्रिय होईल.

HSC Result 2026 Today: बारावीचा आज दुपारी 1 वाजता लागणार निकाल! 'या' अधिकृत वेबसाइटवर पाहा तुमचे गुण

Maharashtra Board HSC Result 2026 Today: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वीच्या (HSC) लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 1 वाजता निकालाची लिंक अधिकृतपणे सक्रिय केली जाईल. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या वेबसाइटसह डिजीलॉकरवरही पाहू शकणार आहेत.

निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in

निकाल पाहण्याची पद्धत

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा Roll Number (आसन क्रमांक) आणि आईचे नाव अचूक नोंदवा.
  • 'Submit बटण दाबताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा.

डिजीलॉकर (DigiLocker) सुविधा

विद्यार्थ्यांना त्यांची डिजिटल मार्कशीट डिजीलॉकरवरही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करून डिजीलॉकर ॲप किंवा वेबसाइटवरून मार्कशीट डाऊनलोड करता येईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com