Maharashtra Board HSC Result : शिक्षकाची मुलगी नंदुरबार जिल्ह्यात पहिली, वाचा कसं मिळवलं गार्गीनं यश?

Maharashtra HSC Result 2025 : गार्गीने 92.33% मार्क्स मिळवत नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नंदुरबार:

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

विद्यार्थी जीवनामध्ये बारावीची परीक्षा ही महत्त्वाची मानली जाते. आयुष्यात पुढं काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी बारावीचा निकाल ही महत्त्वाची पायरी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (सोमवार 5 मे) जाहीर झाला. या परीक्षेत नंदुरबारमधील शिक्षकाची मुलगी गार्गी संतोष पाटील ही संपूर्ण जिल्ह्यात पहिली आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गार्गीने 92.33% मार्क्स मिळवत नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.  गार्गी ही नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असून, ती एकलव्य महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षक संतोष पाटील यांची कन्या आहे. 

Advertisement
घरातून भक्कम पाठबळ 

 शिक्षणावर भर देणाऱ्या कुटुंबातून आलेली गार्गी हिने आपल्या अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. गार्गीने सांगितले, हे यश मिळवण्यासाठी तिने दिवस-रात्र मेहनत घेतली, अभ्यासावर सातत्य ठेवले आणि कोणतीही अडचण आपल्या मार्गात येऊ दिली नाही. गार्गीच्या यशात तिच्या पालकांचाही मोठा वाटा आहे. तिचे वडील, संतोष पाटील हे शिक्षक असल्यामुळे तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले. अभ्यासातील शंका, नियोजन आणि मानसिक तयारी यासाठी त्यांनी सदैव गार्गीला मदत केली. याशिवाय, गार्गीच्या आईनेही तिच्या अभ्यासाच्या काळात मोलाची साथ दिली. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच गार्गीच्या गरजा समजून घेऊन तिला सकारात्मक वातावरण दिलं. 

( नक्की वाचा : Maharashtra Board HSC 12th Result LIVE: बारावीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत )
 

कसं मिळवलं यश?

गार्गीनं दहावीच्या परीक्षेत देखील मोठं यश मिळवलं होतं. ती दहावीमध्ये  98.60 टक्के मार्क्स  मिळवून जिल्ह्यात दुसरी आली होती. दहावीच्या यशातील सातत्य तिने बारावीमध्येही राखलं आहे. आपण रोज पाच तास अभ्यास केला.  विशेष म्हणजे कोणतीही शिकवणी न लावता बारावीची परीक्षा दिली, असं गार्गीनं 'NDTV मराठी' शी बोलताा सांगितलं. गार्गीचे वडील हे शिक्षक आहेत. त्यामुळे तेच मला मार्गदर्शन करत, असं गार्गीनं सांगितलं. बारावीनंतर पुढं इंजिनिअरिंग करणार असल्याचा मनोदय तिने यावेळी बोलून दाखवला.

Advertisement

 गार्गीच्या यशात वडिलांप्रमाणे आईचीही भक्कम साथ आहे. आईने अभ्यासाच्या काळात मोलाची साथ दिली. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच गार्गीच्या गरजा समजून घेऊन तिला सकारात्मक वातावरण दिलं, असं गार्गी म्हणाली.  गार्गीच्या या उत्तुंग यशाबद्दल तिच्या शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे.