Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प मांडत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर केला जात आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडे अर्थखाते आले अन् आज त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी हा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित आहे, असं म्हणत सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे.
अजित पवार यांचे भव्य स्मारक अन् नागरी सेवा पुरस्कार
"हे भाषण करताना मन जड झालं आहे कारण अजित पवार आज आपल्यात नाही. अजित पवार यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे... अजित दादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं आहे. त्यांनी दिलेल्या विकासाची दिशा आपल्याला प्रेरणा देत आहे. ११ वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे तसेच त्यांच्या नावाने गतीमान नागरी सेवा पुरस्कार दिला जाईल. अर्थसंकल्प अजित दादांना समर्पित करतो," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
"हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्रकडे जाणाऱ्या प्रवासाचा एक टप्पा आहे. 2026-27 या वर्षात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आवश्यक निधी विविध उपयोजनांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येईल. महाड इथे चौदार तळे इथे पायाभूत सुविधानसाथी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. 2026-27 हे वर्ष सामाजिक समता म्हणून साजरा करता येणार आहे," अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा!
"बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्याचे काम पूर्ण झालं असून जुन 2026 पर्यंत कामं पूर्ण होईल. १ फेब्रुवारी २०२६ रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे .यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल. प्रादेशिक संतुलित विकास प्राधान्य राहतील, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
(नक्की वाचा: Maval Accident: शिवज्योत घेऊन धावताना भयंकर घडलं; मावळमधील 2 शिवभक्तांचा मृत्यू; हृदयद्रावक घटना)