पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, मृतांच्या पालकांना CM शिंदेंनी दिले हे आश्वासन

पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन (Pune Porsche Hit And Run Case) प्रकरणामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुण-तरुणीच्या पालकांनी सोमवारी (24 जून) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.

Advertisement
Read Time: 2 mins

पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन (Pune Porsche Hit And Run Case) प्रकरणामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुण-तरुणीच्या पालकांनी सोमवारी (24 जून) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळेस संबंधित घटना दुर्दैवी आहे, असे म्हणत दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल, असे आश्वासनही यावेळेस मुख्यमंत्री शिंदेंनी दिले.

(नक्की वाचा: पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड)

फास्ट ट्रॅक खटला चालवणार - CM शिंदे

या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असतानाही ही केस नव्याने हाती घेत दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी पालकांना सांगितले. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींना कठोर शासन केले जाईल, असेही यावेळेस स्पष्ट करण्यात आले. 

(नक्की वाचा: पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश)

पीडित कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत

तरुण मुलं अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असे नमूद करत या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.  

(नक्की वाचा: पुण्यातील 'L3' पबवर दगडफेक; ड्रग्स स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर संताप)

Advertisement

Pune Drugs | ड्रग्जवरून दादा विरुद्ध दादा, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्रिपदावरून खदखद समोर