जाहिरात

पुण्यातील 'L3' पबवर दगडफेक; ड्रग्स स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर संताप

पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी स्वतः या ठिकाणी हजर राहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

पुण्यातील 'L3' पबवर दगडफेक; ड्रग्स स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर संताप

प्रतीक्षा पारखी, पुणे

पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित 'L3- लिक्विड लायझर लॉन्च' या हॉटेलमध्ये तरुण ड्रग्स घेत असल्याचं स्टिंग ऑपरेशन समोर आलं होतं. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी देखील हॉटेलविरोधात कडक कारवाई केली आहे. आता या हॉटेलवर पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि लाठी हल्ला केला आहे. 

या हल्ल्यामध्ये हॉटेलचे बॅनर, लोगोची तोडफोड करण्यात आली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये असली पब संस्कृती आणि ड्रग्स संस्कृती आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. 

(नक्की वाचा- पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित   )

हल्ल्यानंतर काही वेळ येथील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मात्र पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करत येथे बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी स्वतः या ठिकाणी हजर राहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

(नक्की वाचा - पुण्यात पुन्हा 'उडता पंजाब', नामांकित हॉटेलमधील स्टिंग ऑपरेशन आलं समोर)

एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालकांसह मॅनेजर, डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आठही जणांना पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहेत. 

पु्ण्यातील एफसी रोडवरील L3 या हॉटेलमध्ये पार्टी सुरु होती. या पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. या पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com