राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांनी अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्र सादर केली आहे. ज्यामुळे या दोघांकडे असलेल्या संपत्तीबद्दल माहिती मिळाली आहे.या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकल्यास अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस या जास्त श्रीमंत असल्याचे दिसून आले आहे.
अजित पवारांच्या संपत्तीचा तपशील
- अजित पवारांच्या हातातील रोख रक्कम 7 लाख 20 हजार रुपये. सुनेत्रा पवारांच्या हातातील रोख रक्कम 6 लाख 65 हजार रुपये.
- अजित पवारांच्या नावे दोन ट्रेलर, एक ट्रॅक्टर आणि दोन गाड्या आहेत. सुनेत्रा पवारांकडे एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत.
- अजित पवारांकडे एकूण चल मालमत्ता 8 कोटी 22 लाख रुपये इतकी आहे.
- सुनेत्रा पवारांची एकूण चल मालमत्ता 14 कोटी 57 लाख इतकी आहे.
- अजित पवारांकडे एकूण अचल मालमत्ता ही 37 कोटी 15 लाख इतकी आहे
- नेत्रा पवारांकडे अचल मालमत्ता 58 कोटी 39 लाख इतकी आहे.
- अजित पवारांची शेअर्स आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही 24 लाख 79 हजार रुपयांची आहे.
- सुनेत्रा पवारांची यातील गुंतवणूक ही 14 लाख 99 हजार रुपये इतकी आहे.
- अजित पवारांनी कोणालाही कर्ज दिले नाहीये
- सुनेत्रा पवारांनी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना 50 लाख रुपये तर भावजय सुप्रिया सुळेंना 35 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.
- अजित पवारांकडे असलेले ट्रॅक्टर, ट्रेलर, कार अशा सगळ्या गाड्यांची किंमत 75 लाख 72 हजार रूपये इतकी आहे.
- सुनेत्रा पवारांकडे 10 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या गाड्या आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीचा तपशील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रामध्ये नेमके काय नमूद केले आहे, याची माहिती जाणून घेऊया...
- देवेंद्र फडणवीसांच्या हातात असलेली रोख रक्कम 23 हजार 500 रुपये इतकी आहे.
- अमृता फडणवीसांकडे हातात असलेली रोख रक्कम 10 हजार रुपये आहे.
- देवेंद्र फडणवीसांकडे सव्वापाच कोटी रुपयांची संपत्ती आहे.
- फडणवीस दाम्पत्याची एकूण संपत्ती 13.27कोटी रुपये इतकी आहे.
- या दाम्पत्याच्या नावावर कोणतेही वाहन नाही.
- देवेंद्र फडणवीसांकडे 56 लाख रुपयांची चल मालमत्ता आहे तर 4.6 कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे.
- अमृता फडणवीसांकडे 6.9 कोटी रुपयांची चल मालमत्ता आहे तर 95 लाख रुपयांची अचल मालमत्ता आहे.