Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याचे उत्तर आज मिळणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. महाराष्ट्रात यंदा 66.05 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या 30 वर्षांतील मतदानाची ही सर्वाधिक नोंद आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 61.1 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख आघाड्यांमध्ये प्रामुख्याने लढत होताना दिसत आहे. भाजप BJP, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र येत महायुती स्थापन केली आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. वंचित बहुजन आघाडीने आणि राज ठाकरेंच्या मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू , राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीला तिसरी आघाडी म्हणून संबोधले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
Here are the LIVE UPDATES on Maharashtra Election Results | महाराष्ट्र निवडणूक निकाल:
व्होट जिहादविरोधात धर्मयुद्धाचा विजय - किरीट सोमय्या, भाजपा नेते
काँग्रेसचे संग्राम थोपटे पिछाडीवर
भोर, पुणे : मतमोजणी फेरी क्रमांक 13
काँग्रेसचे संग्राम थोपटे पिछाडीवर
महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर 45 हजार 551 मतांनी आघाडीवर
शंकर मांडेकर - 93133 मते
संग्राम थोपटे - 47582 मते
अनिल जगताप - 839 मते
लक्ष्मण कुंभार - 293 मते
कुलदीप कोंडे - 9769 मते
किरण दगडे - 15002 मते
नोटा - 1846 मते
एकूण 168464
अजित पवार 43502 मतांनी आघाडीवर
बारामती : अकरावी फेरी - अजित पवार 43502 मतांनी आघाडीवर, युगेंद्र पवार पिछाडीवर
भाजप उमेदवार सुनील कांबळे
पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील कांबळे 10,320 मतांनी विजयी
भाजपचे कालिदास कोळंबकर विजयी
वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी
गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ : अमित देशमुख (काँग्रेस) 8523 मतांनी आघाडीवर, भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर पिछाडीवर
मोदी है तो मुमकिन हैं - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोस्ट
भाजपाच्या कुमार आयलानींच्या कार्यालयाबाहेर जल्लोष
उल्हासनगर : भाजपाच्या कुमार आयलानी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा, कुमार आयलानी यांना उल्हासनगर मतदारसंघात निर्णायक विजयी आघाडी
अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे आघाडीवर
भंडारा : तुमसर मोहाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांची मुसंडी
अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे आघाडीवर
भंडारा : तुमसर मोहाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांची मुसंडी
Deputy CM Devendra Fadnavis मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष
Maharashtra CM Eknath Shinde: महायुतीच्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केलेय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महायुतीने जे काम केलंय, त्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केलेय. त्यामुळे महायुतीला मोठा विजय मिळालाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Election Results 2024 Live: महायुतीची सरशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला साजरा
Vidhansabha Election Results 2024 LIVE: विधानसभेच्या महानिकालाचं महाविश्लेषण
Jalna Vidhan Sabha Election Live (जालना) : शिवसेनेचे (शिंदे गट) अर्जुन खोतकर आघाडीवर
जालन्यामध्ये बारावी फेरी अखेर शिवसेनेचे (शिंदे गट) अर्जुन खोतकर 15 हजार 263 मताने आघाडीवर. काँग्रेसचे कैलास गोरंट्याल पिछाडीवर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करून जल्लोष सुरू
Assembly Election 2024 Results Live: पश्चिम मतदारसंघ: 12वी फेरी
संजय शिरसाट (शिंदे गट): 53 हजार 427
राजू शिंदे (उबाठा): 44 हजार 303
शिरसाट आघाडीवर: 9 हजार 124 आघाडीवर
Maharashtra Election Results Live: मुख्यमंत्री शिंदेंनी मानले जनतेचे आभार
महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो,पुढील काळात आणखी जबाबदारी वाढली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Aheri Election Results 2024 Live:
अहेरी : नवव्या फेरीत महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम आघाडीवर
Assembly Election 2024 Live: शिराळा मतदारसंघातून भाजपचे सत्यजित देशमुख आघाडीवर
सांगली : शिराळा मतदारसंघात 12व्या फेरी अखेरीस भाजपच्या सत्यजित देशमुख यांना 90 हजार 389 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या मानसिंगराव नाईक 74 हजार 022 मते
Badnera Vidhan Sabha Election Results 2024 LIVE:
अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा चौथ्यांदा विजयाच्या मार्गावर. राणांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. फटाके फोडून जल्लोष साजरा.
Maharashtra Election 2024 Live: शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख आघाडीवर
सांगली - अकराव्या फेरीत शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांना 81 हजार 313 मते तर मानसिंगराव नाईक 66 हजार 303 मते मिळाली. सत्यजित देशमुख 15,010 मतांनी आघाडीवर
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी विजयाचा जल्लोष
महायुतीच्या महाविजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा जल्लोष केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. हा विजय महायुतीने गेल्या दोन वर्षात घेतलेले अनेक निर्णय आणि लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अभियान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली अथक मेहनत याचा विजय असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
Baramati Assembly Election Live: बारामती विधानसभा मतदारसंघ मतमोजणी : नववी फेरी
अजित पवार (महायुती) - 8970
युगेंद्र पवार (मविआ) - 3663
नऊ फेऱ्या मिळून अजित पवार 43 हजार347 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Live: नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 26 नोव्हेंबरला?
भाजपा विधीमंडळ सदस्य बैठक 25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता तर 26 नोव्हेंबरला शपथविधी सोहळा आयोजित हालचाली - सूत्र
Maharashtra Assembly Election 2024 LIVE: "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे असे आम्हाला वाटते"
Maharashtra Election 2024 Live: शरद पवारांबाबत विनोद तावडेंचे मोठे विधान
शरद पवार निवडणुकीत जातीय राजकारण कायमच करतात, पण त्यात यश मिळाले नाही हे दिसून येते; भाजपच्या विनोद तावडे यांचे मोठे विधान
Election Results 2024 Live: भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी
सातरा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी, 1 लाखांहून अधिकचे मताधिक्य.
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सुनील शेळके विजयी
मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सुनील शेळके विजयी
Election Results 2024 LIVE: महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Maharashtra Election 2024 LIVE: महाराष्ट्राचा पहिला निकाल लाडक्या बहिणीच्या बाजूने
श्रीवर्धन म्हसळा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) उमेदवार अदिती तटकरे विजयी
Maharashtra Election 2024 Live: सांगलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
करमाळा : नारायण पाटील आघाडीवर
करमाळा : सातव्या फेरी अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नारायण पाटील 7 हजार 080 मतांनी आघाडीवर
सिल्लोडमध्ये पाचव्या फेरी अखेरीस अब्दुल सत्तार पिछाडीवर
सुरेश बनकर - 20 हजार 227 मते
अब्दुल सत्तार - 20 हजार 021 मते
या राज्याची जनता बेईमान नाहीय, निकालाच्या कलांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
फलटणमधून सचिन पाटील आघाडीवर
फलटणमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सचिन पाटील 54 हजार मतांनी आघाडीवर
मावळमधून सुनील शेळके आघाडीवर
मावळ मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके 64, 331 मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election 2024 Result
- आंबेगाव विधानसभा/पुणे : दहाव्या फेरी अखेरीस महायुतीचे दिलीप वळसे पाटील 4264 मतांनी आघाडीवर
- पुणे : कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील सातव्या फेरी अखेरीस 28 हजार 740 मतांची आघाडीवर
- सोलापूर शहर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख आघाडीवर, विजयकुमार देशमुख 18 हजार 376 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेश कोठे पिछाडीवर.
- सोलापूर : मोहोळमधून अजित पवार गटाचे यशवंत माने पुन्हा आघाडीवर
- पुरंदर हवेली : सातवी फेरी : विजय शिवतारे (शिवसेना :शिंदे गट) - 3653 मते
- संजय जगताप (राष्ट्रीय काँग्रेस) - 2385 मते , संभाजी झेंडे (एनसीपी अजित पवार) - 1397 मते
- इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील 10 हजार 291 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील पिछाडीवर
सोलापूर : मोहोळमध्ये शरद पवार गटाचे राजू खरे 786 मतांनी आघाडीवर, अजित पवार गटाचे यशवंत माने पिछाडीवर
सोलापूर : मोहोळमध्ये शरद पवार गटाचे राजू खरे 786 मतांनी आघाडीवर, अजित पवार गटाचे यशवंत माने पिछाडीवर
पुणे : चेतन तुपे आघाडीवर
पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे सहाव्या फेरी अखेरीस 20 हजार 152 मतांनी आघाडीवर
बच्चू कडू पिछाडीवर
अमरावती : अचलपूर मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांना मोठा धक्का.
अकराव्या फेरी अखेरीस बच्चू कडू 23 हजार मतांनी पिछाडीवर, भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर.
160च्या वर जागा मिळतील - लोढा
महायुतीला पूर्ण समर्थन मिळेल - मंगल प्रभात लोढा
उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी आघाडीवर
उल्हासनगर : तिसऱ्या फेरी अखेरीस कुमार आयलानी 13256 मतांनी आघाडीवर
कुमार आयलानी भाजप -15450
एकूण मते 30981
ओमी कलानी शरद पवार गट- 8972
एकूण मते 17725
Maharashtra Assembly Election 2024
अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक आघाडीवर
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील आघाडीवर
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ -
पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पाटील 4,944 मतांनी आघाडीवर,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजयकाका पाटील पिछाडीवर
बल्लारपूर मतदारसंघ - भाजपचे मुगंटीवार आघाडीवर
भाजपचे सुधीर मुगंटीवार आघाडीवर - 8730 मते
काँग्रेसचे संतोष रावत - 6563 मते
परांडामधून राशपचे राहुल मोटे आघाडीवर
धाराशिव
उमरगा : शिवसेनेचे (उबाठा) प्रवीण स्वामी आघाडीवर
तुळजापूर: भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील आघाडीवर
उस्मानाबाद: शिवसेनेचे (उबाठा) कैलास पाटील आघाडीवर
परांडा: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे आघाडीवर
सिल्लोडमधून अब्दुल सत्तार पिछाडीवर
सिल्लोड : अब्दुल सत्तार यांना पुन्हा झटका, उद्धव ठाकरे गटाचे सुरेश बनकर 400 मतांनी आघाडीवर
पृथ्वीराज साठे आघाडीवर
बीड : केज विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे 1342 मतांनी सहाव्या फेरीअखेरीस आघाडीवर
संभाजीराव पाटील निलंगेकर आघाडीवर
भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर 7435 मताने आघाडीवर सातव्या फेरीत आघाडीवर
जालना: दुसऱ्या फेरी अखेर भाजपाचे संतोष दानवे 3278 मतांनी आघाडीवर,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे पिछाडीवर
Maharashtra Election Results 2024
सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता कलांनुसार दिसत आहे.
Baramati Assembly Constituency Result
बारामती : चौथी फेरी
अजित पवार - 8287 मते
युगेंद्र पवार - 4213 मते
अजित पवार आघाडीवर
Parli Vidhan Sabha Result 2024
बीड : परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे चौथ्या फेरी अखेरीस 15,992 मतांनी आघाडीवर
Assembly Election 2024: भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर
पुणे: भोर विधानसभा मतदारसंघात शंकर मांडेकर 18,374 मतांनी आघाडीवर
शिवाजीनगर चौथी फेरी भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5,340 मतांनी आघाडीवर
Assembly Election Results 2024: मावळ मतदारसंघात सुनिल शेळके आघाडीवर
मावळ मतदारसंघामध्ये सहाव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार सुनिल शेळके आघाडीवर
Election Results 2024 Live:
येवला मतदारसंघात छगन भुजबळ 86 मतांनी आघाडीवर
Mumbadevi Assembly Constituency : अमिन पटेल आघाडीवर
मुंबादेवी मतदारसंघातून अमिन पटेल आघाडीवर, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन.सी. पिछाडीवर
Maharashtra Election 2024 Live Updates:
इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील चौथ्या फेरी अखेरीस 3124 मतांनी आघाडीवर
Pune Assembly Election 2024 Live:
पुणे : चौथी फेरी - वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे 8,000 मतांनी आघाडीवर
Junnar Election Results Live:
जुन्नर विधानसभा : तिसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे 3074 मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Live:
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघ -
दुसरी फेरी - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील 2050 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Live:
- माण-खटावमधून भाजपचे जयकुमार गोरे 3400 मतांनी आघाडीवर
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर घार्गे पिछाडीवर
Election Results 2024 Live:
सांगोला मतदार संघात शेकाप उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख आघाडीवर
Assembly Election Results LIVE: भिवंडीमध्ये काय आहे परिस्थिती?
भिवंडी पश्चिम
पहिली फेरीत
भाजपाचे महेश चौगुले आघाडीवर
महेश चौघुले - 4764
विलास पाटील - 1368
महेश चौघुले 3396 मतांनी आघाडीवर
भिवंडी ग्रामीण
तिसरी फेरी
शिवसेनेचे (शिंदे गट) शांताराम मोरे आघाडीवर
शिवसेनेचे (उबाठा) महादेव घाटाळ 4753
शिवसेनेचे (शिंदे गट) शांताराम मोरे 9531
Maharashtra Election 2024 Live: अंबरनाथ मतदारसंघ - पहिली फेरी
- डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे - 4219 मते
- राजेश देवेंद्र वानखेडे, शिवसेना उबाठा - 2471 मते
पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर 1748 मतांनी आघाडीवर
Election Results 2024 Live:
मुरबाड : दुसऱ्या फेरीअखेर भाजपाचे किसन कथोरे यांना 8763 मतांची आघाडी
Maharashtra Assembly Election Live: भाजप ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार? चंद्रकांत पाटलांचे मोठे संकेत
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE: भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील आघाडीवर
दुस-या फेरीमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 4,896 मतांनी आघाडीवर, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर.
Maharashtra Election Results Live 2024:
शहादा मतदारसंघात तिसऱ्या फेरीत भाजपचे राजेश पाडवी 700 मतांनी आघाडीवर
NDA vs MVA
माजलगाव येथे पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके 450 मतांनी आघाडीवर
Assembly Election Results Live: दुसऱ्या फेरी अखेर धनंजय मुंडे आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे दुसऱ्या फेरी अखेर 4300 मतांनी आघाडीवर
Hingoli Assembly Election Results Live:
हिंगोली : EVMच्या पहिल्या फेरीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या सेनेचे उमेदवार संतोष बांगर 2711 मतांनी आघाडीवर
Maharashtra Election Results: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गेवराईचे विजयसिंह पंडित 672 मतांनी आघाडीवर
Maharashtra Election Results Live: सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने गाठली शंभरी
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: एकनाथ शिंदे आघाडीवर
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर
Maharashtra Election 2024: महायुती पुन्हा सत्तेत येईल - संजय निरुपम, उमेदवार, शिवसेना (शिंदे गट)
Election Results Live Updates:
आष्टी मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश धस 400 मतांनी आघाडीवर
Beed Vidhan Sabha Election Live:
बीड विधानसभा राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आघाडीवर
Election Results 2024 Live Updates:
केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे 576 मतांनी आघाडीवर
तुळजापूर : भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आघाडीवर
- उमरगा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले टपाली मतमोजणीमध्ये आघाडीवर
- तुळजापूर मतदारसंघात महायुती भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आघाडीवर
- धाराशिवमध्ये महाविकास आघाडी शिवसेना शिंदे गटाचे कैलास पाटील आघाडीवर
- परांडा येथे टपली मतदानात महायुती तानाजी सावंत आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर
- परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे आघाडीवर
- रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना(शिंदे गट) उमेदवार उदय सामंत आघाडीवर
- माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे आघाडीवर
- कर्मत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार आघाडीवर
माण खटाव मतदारसंघात पोस्टल मतदानामध्ये भाजपचे जयकुमार गोरे 803 मतांनी आघाडीवर
भाजपचे उमेश यावलकर आघाडीवर
अमरावती : मेळघाट विधानसभा मतदार संघातून प्रहारचे राजकुमार पटेल पोस्टल मतदानात आघाडीवर
मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेश यावलकर आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: NCPचे अण्णा बनसोडे आघाडीवर
पिंपरी विधानसभा : पिंपरी विधानसभा अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघडीवर, शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत धर पिछाडीवर
उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत - भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत. आमच्या केंद्रीय नेतृत्वाचं मन मोठं आहे. उद्धव ठाकरेंना पश्चाताप झाला असेल तर सोबत घेऊ. ठाकरे महायुतीत येऊ शकतात.
Sharad Pawar: कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर
- सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) माणिकराव कोकाटे आघाडीवर
- शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे जयकुमार रावल आघाडीवर
- आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दिलीप वळसे पाटील आघाडीवर
- बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) राजेंद्र राऊत आघाडीवर
- जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडीवर, शिंदेंच्या शिवसेनेचे हिकमत उढाण पिछाडीवर
- जालना मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गटः अर्जुन खोतकर आघाडीवर
- भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे आघाडीवर
- बदनापूरमध्ये भाजपचे नारायण कुचे आघाडीवर
- कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे समरजित घाटगे आघाडीवर
- इगतपुरीत पोस्टल मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे हिरामण खोसकर आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: छगन भुजबळ आघाडीवर
- येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार छगन भुजबळ आघाडीवर
- मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दादा भुसे आघाडीवर
Election Results 2024 LIVE Updates:
इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: औरंगाबादमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? पाहा
- औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीवर
- औरंगाबाद पश्चिममधून शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर
- औरंगाबाद मध्यमधून शिंदे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर
- सिल्लोडमधून शिंदे शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर
- गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर
- वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे रमेश बोरनारे आघाडीवर
- पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे विलास भुमरे आघाडीवर
- फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण आघाडीवर
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उबाठा) उदयसिंग राजपूत आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024:भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा आघाडीवर
- मलबार हिल मतदारसंघातून भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा आघाडीवर
- जामनेर मतदारसंघात भाजप उमेदवार गिरीश महाजन आघाडीवर
- काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सलील देशमुख पिछाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: पोस्टल मतमोजणीतील आघाडीचे उमेदवार
कीनवट मतदारसंघ भाजपचे उमेदवार भीमराव केराम
हदगाव मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार माधव पवार
भोकर मतदारसंघ भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण
नांदेड उत्तर मतदारसंघ उबाठा उमेदवार संगीता डक
नांदेड दक्षिण मतदारसंघअपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते
लोहा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार प्रताप चिखलीकर
नायगाव मतदारसंघ भाजप उमेदवार राजेश पवार
देगलूर मतदारसंघ भाजप उमेदवार जितेश अंतापुरकर
मुखेड मतदारसंघ भाजप उमेदवार डॉ तुषार राठोड
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: उत्तम जानकर आघाडीवर
माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर आघाडीवर
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024:पुरंदरमध्येही पोस्टल मतमोजणीस सुरुवात
- पुरंदरमध्ये हवेली विधानसभेसाठीच्या टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
- छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीमध्येही टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: मतमोजणीला सुरुवात
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: माझा जनतेच्या मतांवर विश्वास तर विरोधकांचा बोगस मतांवर विश्वास - राजेसाहेब देशमुख
गेल्या 2 दिवसांत मी सर्वसामान्य माणसात फिरल्यावर माझा विजय हा 100 टक्के निश्चित आहे. विरोधकांचा विश्वास बोगस मतांवर आहे तर माझा विश्वास जनतेच्या मतावर आहे- राजेसाहेब देशमुख,परळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: पोस्टल मतांच्या मोजणीस सुरुवात
नवी मुंबईतील बेलापूरमध्ये टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: निकाल आमच्या बाजूनेच लागणार - मुरजी पटेल
गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि पुन्हा महायुतीचे सरकार येऊ दे, अशी प्रार्थना केली. विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढवली, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागणार - मुरजी पटेल, उमेदवार, शिवसेना (शिंदे गट)
Election Results 2024 | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी यंदा राजभवनात होणार नाही ?
निकालानंतर सत्तास्थापन करणाऱ्या युती अथवा आघाडीचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा कुठे घ्यायचा, याचा निर्णय घेतील. हा शपथविधी राजभवनातच होईल अशी शक्यता नाही.
Shiv Sena: शायना एन.सी. यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
मुंबादेवी मतदारसंघाच्या शिवसेना(शिंदे गट) उमेदवार शायना.एन.सी यांनी मतमोजणीपूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
Maharashtra Election Results 2024 Live: महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल!
"महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि मविआच सत्ता स्थापन करेल" रमेश चेन्निथला, काँग्रेस नेते
Election Results 2024 Live: पिंपरी चिंचवडमध्ये 2 मतदारसंघांसाठी मतमोजणी
भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 27 टेबल वरती मतमोजणी होणार असून 23 मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत, तर पिंपरी मध्ये 24 टेबल वरती 20 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे. पिंपरी चिंचवडमधील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे.
Maharashtra Election Results Live: महायुतीचा विजय निश्चित- नवनीत राणा
"महायुतीला एकतर्फी विजय मिळेल, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा उभारी घेईल" नवनीत राणा, भाजप नेत्या
Maharashtra Assembly Election Live: भाजप आणि मित्र पक्षांचा विजय निश्चित! केंद्रीय मंत्री कुमारस्वामी
"सगळ्यांना हेच वाटत आहे की भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विनासायास सत्ता स्थापन करेल, एक्झिट पोलची भाकितेही हेच सांगत आहेत" एचडी कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री
Maharashtra Assembly Election Results: मविआ सत्तेवर येईल! कर्नाटकच्या मंत्र्यांना विश्वास
कर्नाटकचे मंत्री जी.परमेश्वर यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला.
Gadchiroli Election Counting Live: गडचिरोलीमध्ये मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये मतमोजणीच्या23 फेऱ्या,गडचिरोलीमध्ये मतमोजणीच्या 26 फेऱ्या तर अहेरीमध्ये 22 फेऱ्या
मविआला 157 जागा मिळतील असा शरद पवारांचा अंदाज
महाविकास आघाडीला 157 जागा मिळण्याचा शरद पवारांचा अंदाज
महाविकास आघाडीला 160 जागा मिळण्याचा उद्धव ठाकरेंचा अंदाज
नाना पटोले यांना आघाडीला 150 ते 155 जागा मिळण्याचा विश्वास
काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये आघाडीला 158 जागा मिळण्याचा अंदाज
आघाडीच्या नवोदित आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश
- आघाडीच्या सर्व नवोदित आमदारांना आजच मुंबई गाठण्याचे आदेश
- सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न
- काँग्रेस आमदारांना कर्नाटकमध्ये शिफ्ट करण्याची शक्यता नाही
- परब, पाटील, थोरात, पटोले, राऊत नव्या आमदारांसाठी मैदानात
जिंतूर आणि गंगाखेड येथे मतमोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या होणार
- राज्यात मतमोजणीसाठी सर्वाधिक फेऱ्या जिंतूर आणि गंगाखेडमध्ये
- जिंतूरमध्ये मतमोजणीच्या 32 फेऱ्या तर गंगाखेडमध्ये 31 फेऱ्या होणार
- दोन्ही मतदारसंघ परभणी जिल्ह्यातली आहेत.
शरद पवारांची ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक
- काँग्रेसकडून नवोदित आमदारांसाठी डीके शिवकुमार मैदानात
- फूट टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटक मॉडेलचा आधार
- शरद पवारांकडून ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक
- ठाकरेंकडूनही आमदारांसाठी ऑनलाइन बैठक
- सरकार स्थापनेसाठी दोन्हींकडून काळजीपूर्वक प्रयत्न
- महायुती आणि महाआघाडीत क्लोज फाईटची शक्यता
- सर्वात मोठ्या दोन पक्षांकडून फाइव्ह स्टार हॉटेल्स बुक
- नवोदित आमदारांना सर्टिफिकेटसह तातडीनं मुंबई गाठण्याचे आदेश
- नवोदित आमदारांसाठी चार्टड फ्लाईटसही तयार
- निकालानंतर फूट टाळण्यासाठी रिसॉर्टची तयारी
- त्रिशंकू स्थितीत अपक्ष आमदारांशी आतापासूनच संपर्क
- दोन्हींकडून अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्काची तयारी
- सरकार स्थापनेसाठी 48 तास, त्यामुळे तातडीच्या योजना
मविआ, महायुती की धक्कादायक निकाल? अहिल्यानगर जिल्ह्यात काय असेल निकाल? पत्रकारांसोबत खास चर्चा
सर्वाधिक मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले
Election Results 2024 Live Updates:
महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघामध्ये राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत.
यापैकी पुरुष मतदार 5 कोटी 22 हजार 739 तर महिला मतदारांची संख्या 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतकी आहे.
Maharashtra Election Results 2024 : या मतदारसंघात महिलांचा सहभाग सर्वाधिक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ आणि पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वाधिक दिसून आला.
Maharashtra Election 2024 Live:
महाराष्ट्रात मागील 30 वर्षांत यंदा सर्वाधिक 66.05 टक्के मतदान झाले
राज्यात मविआची सत्ता येणार - सचिन पायलट
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. तसेच बहुमत मिळाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांना मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही. कोणाला कोणते पद द्यायचे? या निर्णयाला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही - सचिन पायलट
हॉटेल, चॉपर, चार्टर्ड प्लेन... निकालाच्या आधी सर्वच पक्षांची तयारी सुरू
Maharashtra Assembly Result 2024 : महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला स्पष्ट बहुमत मिळेल? अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे बेरजेचं राजकारण इथे सर्वच पक्षांना सुरु केले आहे.
Election Results Live Updates:
कोण होणार किंग? कोण ठरणार किंगमेकर? आज होणार फैसला
Election Results 2024 Live Updates:
यवतमाळ येथील मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त, ठिकठिकाण पोलीस तैनात
Maharashtra Election Results 2024 LIVE:
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Results Live: निवडणुकीच्या निकालाचे सखोल विश्लेषण फक्त NDTV मराठीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 Live:
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज होणार मतमोजणी
Election Results 2024 Live:
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरुवात