आयबीपीएस ही केंद्रीय पातळीवरची बँकिंग परीक्षा आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आलेली होती. त्यासंदर्भात तोडगा काढावा अशी विद्यार्थ्यांची मूळ मागणी गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे. त्यामुळे पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. आयोगाच्या बैठकीमध्ये नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची पुढील तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
नक्की वाचा - MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, आयोगाच्या ट्विटनंतरही विद्यार्थ्यांचा विरोध कायम
आयबीपीएस आणि एपीएमसी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. नव्या तारखा लवकरच निश्चित होतील अशी माहिती आहे.