महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुण्यात काल रात्रीपासून आंदोलन सुरू आहे. 25 ऑगस्ट रोजी एमपीएससीची परीक्षा होणार आहे. याचवेळी कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट कनिष्ठमधील 258 जागांसाठी परीक्षा व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. पण 25 तारखेच्या परीक्षेत पदांची वाढ होणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले. मात्र येथील पदांची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.
पुण्यातील शास्त्रीनगर परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होतं. आज सकाळी देखील काही संघटना आंदोलन करत आहेत. 25 तारखेला होणाऱ्या परीक्षेत पदांची वाढ करा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य झाली नसली तरी आयोगाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट ब कनिष्ठ समग्र संवर्गातील पदाच्या मागणी पत्राच्या अनुषंगानं आयोगानं येत्या दोन- तीन दिवसात जाहिरात काढू असं ट्विट केलं आहे.
नक्की वाचा - आईचा मृत्यू, कुलकर्णी भावंडांचं टोकाचं पाऊल; आदिवासींना मोठी मदत करून सोडला जीव
या ट्विटनंतर सुद्धा काही विद्यार्थी यावर समाधानी नाहीत. काही राजकीय संघटनाच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन आज सकाळी ही सुरूच आहे. 258 पदासाठी ही भरती होणार आहे, त्यात वाढ करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आलेत. विद्यार्थ्यांचा आंदोलन अजूनही सुरू आहे.
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 20, 2024
पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आयबीपीएस ही केंद्रीय पातळीवरची बँकिंग परीक्षा आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आलेली होती त्या संदर्भात तोडगा काढा अशी विद्यार्थ्यांची मूळ मागणी गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world