2 months ago

महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालं आहे, अनेक गावांना पुराचा वेढा पडल्यानं संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रावर मोठं संकट ओढवलं असून 36 पैकी 29 जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकांची काढणी करावी अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. 

Sep 23, 2025 14:03 (IST)

LIVE Update: कोकणात मनसेला धक्का, जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोकणातून मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर आज मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव हे सुद्धा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले आहेत.पक्ष प्रवेश पूर्वी त्यांनी आज त्यांच्या रायगड मधील इंदापूर या गावी शक्ती प्रदर्शन करत जल्लोष केलाय. सुबोध जाधव हे मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे असलेली मनसेची फळी सुद्धा आज भाजप मध्ये प्रवेश करण्यासाठी निघाली असून रायगड मध्ये मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Sep 23, 2025 14:02 (IST)

LIVE Update: मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात, 5 जण जखमी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले, गुजरात वाहिनीवर भरधाव वेगातील  कंटेनरने अचानक थांबलेल्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, कार  गुजरात वाहिनीवरून थेट मुंबई वाहिनीवर उडाली. अपघातातील जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहामार्गाच्या मुंबई वाहिनीवरील जैन मंदिरात वळण्यासाठी कार चालकाने ब्रेक घेतल्याने मागुन येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.

Sep 23, 2025 14:01 (IST)

LIVE Update: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा: उद्धव ठाकरे

सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे.

मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती.

पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप  पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली. 

Sep 23, 2025 14:00 (IST)

LIVE Update: आंदेकर टोळीला पोलिसांचा दणका, महापालिकेची मोठी कारवाई

आंदेकर टोळीला पुणे पोलिसांचा आणखीन एक दणका 

आंदेकर परिवारातल्या अनेकांच्या फोटो असलेली कमानीवर महापालिकेने केली कारवाई 

आंदेकर याच्या घराकडे जाताना रस्त्यात लावण्यात आली होती एक मोठी कमान 

या कमानीवर उदयकांत आंदेकर, आणि वनराज आंदेकर यांच्या फोटो लावण्यात आला होता  

आता हीच कमान कारवाई करत पुणे पोलिसांनी काढून टाकली आहे

Advertisement
Sep 23, 2025 13:58 (IST)

Maharashtra Rain Update: रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ

* रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ

* पूरमापक म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्यावर पाणी 

* गंगापूर धरणातून पाण्याचा केला जातोय विसर्ग 

* नाशिकमध्ये आज देण्यात आला आहे येलो अलर्ट 

* गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा 

* पावसाचा जोर कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गात होणार वाढ

Sep 23, 2025 13:57 (IST)

LIVE Updates: अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे, 

जिल्ह्यातील एकूण २ लाख ३४ हजार ९५५ शेतकऱ्यांना १८९ कोटी ६० लाख ६७ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.

धाराशिव तालुक्यातील ४३,०६५ शेतकरी व ४६,६३० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांसाठी ३९ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

तुळजापूर तालुक्यातील २४,२१० शेतकऱ्यांना २२ कोटी ६१ लाख ७८ हजारांची मदत मिळणार आहे. 

उमरगा तालुक्यात ५०२ शेतकऱ्यांना २३ लाख ३२ हजार

लोहारा तालुक्यातील २३,२५९ शेतकऱ्यांना २१ कोटी ८६ लाख ३ हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.

भुम तालुक्यातील ४२,३७६ शेतकरी बाधित असून त्यांना २८ कोटी ३१ लाख १५ हजारांची मदत मिळणार आहे. 

Advertisement
Sep 23, 2025 13:56 (IST)

LIVE Update: पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार 

जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार

शिवसेनेच्या वतीने १२ हजार ५०० कुटुंबांना करणार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Sep 23, 2025 12:22 (IST)

Live Update : बार्शी जिल्ह्यातील इंदापूर गावाचा संपर्क तुटला

सोलापूर बार्शी जिल्ह्यातील इंदापूर गावाचा संपर्क तुटला. नदीवरचा पूल वाहून गेला. लाईट वाहतूक बंद. 

Advertisement
Sep 23, 2025 10:48 (IST)

Rain Update : नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ.....

नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ.....

- रंगावली नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने रंगावली धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून ओव्हरफ्लो झाला आहे.....

- पावसाचे प्रमाण वाढल्याने १५, हजार ९१५ क्यूसेकने पाण्याच्या विसर्ग केला जात आहे.....

- पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आहे....

- नवापूर तालुक्यासह शेजारील असलेल्या गुजरात राज्यात होत असलेल्या पावसाच्या परिणाम रंगवली नदीच्या पाणी पातळी वाढला आहे....

- नवापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता.....

Sep 23, 2025 10:44 (IST)

Live Update : नारंगी धरण क्षेत्रातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प हा 85 टक्के भरल्याने त्यामधून आज काही प्रमाणात नारंगी नदीत पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठी असलेल्या नागरिकांना व गावांनी सतर्क राहावे अशी विनंती वैजापूर-गंगापूर विधानसभाचे आमदार रमेश बोरणारे यांनी केली आहे.

Sep 23, 2025 10:08 (IST)

Live Update : जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात होणार मोठी वाढ  

- नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवला 

- गोदावरी आणि दारणा नदीचे पाणी पुढे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडीला पोहोचते

- काल सायंकाळ पासून नाशिकमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची सुरू आहे संततधार

Sep 23, 2025 08:59 (IST)

Rain Update : बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर

बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आला असून, त्यामुळे नांदूर हवेलीसह खामगाव दिंडे वस्तीला पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे. गावात पाणी घुसले आहे.

Sep 23, 2025 08:00 (IST)

Rain Update : लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनाम्यांवर प्रश्नचिन्ह, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

लातूर जिल्ह्यात यावर्षी कधी नव्हे इतका पाऊस झाला असून शेकडो हेक्टरमधील पिकं उध्वस्त झाली आहेत. एवढं प्रचंड नुकसान झालं असतानाही अजून शेतकऱ्यांच्या हातात काहीच आलेलं नाही. प्रशासन पंचनामा झाल्याचा दावा करत असलं तरी पंचनामे झालेच नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. बांधावर कोणी जायला तयार नाही, आम्हाला मदत करा, अशी हाक शेतकरी देत आहेत. पिकांचं मोठं नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ अनुदान द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Sep 23, 2025 07:57 (IST)

Rain Update : गिरणा धरणाचे सहा दरवाजे 60 सेमीने उघडले

नाशिकसह खान्देशाला वरदान ठरलेल्या नाशिकच्या गिरणा धरण 100 टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी ६० सेमीने उघडण्यात आले असून धरणातून 14,830 क्युसेक्स पाण्याचा गिरणा नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 23, 2025 07:43 (IST)

Live Update : जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा संपूर्ण 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा संपूर्ण 27 दरवाजे उघडले 

पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरवाजे उघडले

जायकवाडी धरणातून 1 लाख 3 हजार 752 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

जायकवाडीचा विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीला पूर

Sep 23, 2025 07:43 (IST)

Live Update : वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव ढगफुटी सदृश्य पाऊस

छत्रपती संभाजीनगर 

वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तर कापूस वाडगाव- लाडगाव गावचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्या आहेत

Topics mentioned in this article